दिलखुलास कार्यक्रमात ठाणे जिपचे सीईओ विवेक भीमनवार


          मुंबईदि. 6 : माहिती  व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलास  कार्यक्रमात  ठाणे जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी’ या विषयावर ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांची मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून सोमवार दि. 8 आणि  मंगळवार दि. 9 ऑक्टोबर रोजी  सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका उत्तरा मोने यांनी ही मुलाखत घेतली आहे.
         ठाणे जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेची उत्कृष्ट अंमलबजावणीग्रामीण भागात घर बांधण्याचे उद्दिष्टयोजनेच्या प्रसिद्धीसाठी प्रसार माध्यमांचे उपयोगसंपूर्ण लक्षांक साधण्यासाठीचे नियोजनडिजिटल क्रांतीस्वयंपूर्ण शाळा उपक्रमग्रामीण भागासाठी पाणी पुरवठा योजनाअभिलेख वर्गीकरण आणि डिजीटल मोहिमेचे नियोजन तसेच ठाणे जिल्हा परिषदेतील कामकाजात सकारात्मक बदल याबाबतची माहिती श्री. भीमनवार यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती