Saturday, October 6, 2018

फळांचा राजा “हापूस” ला भौगोलिक मानांकन


नवी दिल्ली 5 : फळांचा राजा असलेला हापूस आंब्याला बौध्दिक संपदा कायद्याअंतर्गत भौगोलिक मानांकन जाहीर झाले आहे. केंद्रीय आद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाने आज मानांकनाची अधिकृत घोषणा केली. या मानांकनामुळे हापूस आंब्याची ओळख आता जागतिक पातळीवर अधोरेखित करण्यात आली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले होते.
रत्नागिरीसिंधुदूर्ग व लगतच्या परिसरातील हापूस आंब्यास हे मानांकन  जाहिर करण्यात  आले आहेहे भौगोलिक मानांकन अशा उत्पादनांवर वापरले जाणारे चिन्ह आहेज्यामध्ये त्या उत्पादनाचा दर्जा आणि गुणवत्ता ही त्याच्या मुळ भौगोलिक स्थानावरुन ओळखली जाते. हापूस आंब्यास भौगोलिक मानांकन मिळाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची वेगळी ओळख निर्माण होणार आहे. कोकणातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला या भौगोलिक मानांकनामुळे बळकटी मिळणार आहे. केंद्र शासनाच्या औद्योगिक धोरण व प्रोत्साहान विभागाने हापूस आंब्यास हे मानांकन मिळावे यासाठी प्रयत्न केले होते. नुकतेच केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभु यांनी भौगोलिक मानांकनाचा लोगो व टॅग लाईनचे अनावरण केले होते. 
हापूसला कायद्याचे कवच
या मानांकनामुळे कोकण आणि लगतच्या भागातील आंबे वगळता इतर कोणत्याही आंब्यांना हापूस असे संबोधता येता येणार नाही किंवा त्यांची विक्री करताना हापूस असा उल्लेख करता येणार नाही. याआधी हापूस आंबा म्हणून कर्नाटकआंध्रप्रदेश किंवा गुजरातचा आंबाही सरसकट विकला जायचा. यामुळे ग्राहकांची फसवणूक तर व्हायचीच तसेच कोकणातील हापूस उत्पादकांची ही नकुसान व्हायचे. त्यावर कायदेशीर कारवाही करणे शक्य होत नव्हते. हापूस आंब्याला आता भौगोलिक मानांकन मिळाल्यामुळे कायदेशीर कारवाही करणे शक्य होणार आहे.
सयुक्त अरब अमिराती हापूसचा सर्वाधिक चाहता
कोकणच हापूस आंब्यास विदेशात सर्वाधिक मागणी आहे. सन 2018-19 या वर्षात परदेशात 26 हजार 937 मेट्रीक टन आंबा महाराष्ट्रातून निर्यात करण्यात आला होतायामध्ये सर्व प्रकारच्या आंब्यांचा समावेश होता.  हापूस ला सर्वाधिक मागणी ही सयुक्त अरब अमिरातीतून आहे. यावर्षी या भागात 13 हजार 984 मेट्रीक टन आंबा निर्यात केला गेलायापैकी 60 टक्के आंबा हा हापुस होता. हापुसला जगभरातील इंग्लडओमानकतारकुवैतसौदी अरेबियाकॅनडाफ्रान्ससिंगापूरजर्मनीबहरीन,हाँगकाँग या देशातून मोठ्या प्रमाणात मागणी असते. इंग्लडमध्ये यावर्षी 3310 मेट्रीक टन आंबा निर्यात केला गेलायामध्ये 40 टक्केहुन अधिक हापूस आंब्याचा समावेश होता.
हापूस आंब्यास भौगोलिक मानांकन मिळाल्यामुळे आता हा आंबा निर्यात करताना हापूस या नावाने निर्यात केला जाईलयापूर्वी भारतीय आंबा या नावाखाली निर्यात होत होती. या मानांकनामुळे जागतिक बाजारपेठेत हापूस आंब्याची वेगळी ओळख निर्माण होणार आहे.
महाराष्ट्रातील 31 उत्पादनांना भौगोलिक मानांकन
देशातील 325 उत्पादनांना आजपर्यंत भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहेयामध्ये महाराष्ट्रातील 31 उत्पादनांचा समावेश आहे. या उत्पादनात सोलापूरी चादर,सोलापूरी टॉवेलउपडा जमदानी साडीपुणेरी पगडीपैठणी साडीमहाबळेश्वरची स्ट्रॉबेरीनासिकची द्राक्षेवारली पेटींगकोल्हापूरी गुळआजरा घनसाळ तांदुळवायगाव हळदमंगळवेढा ज्वारीभीवापूर मिरचीसिंधुदुर्ग व रत्नागिरी कोकमवाघ्या घेवडानवापूर तुरडाळआंबेमोहर तांदुळवेर्गुला काजूसांगली मनुकालासलगाव कांदाडहाणू घोळवड चिक्कुबीडचे सिताफळजालन्याचे गोड संत्रीजळगावची केळीमराठवाड्याचे केसर आंबेपुरंदरचे अंजीरजळवागचे वांग्याचे भरीतसोलापूरचे डाळिंबनागपूरची संत्रीकरवत काटी साडी आणि आता कोकणच्या हापूस आंब्यास भौगोलिक मानांकन जाहीर झाले आहे.
०००० 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...