केंद्र व राज्यांचे संबंध अधिक सुदृढ - मुख्यमंत्री




नवी दिल्ली दि. 6 : केंद्र आणि राज्यांचे संबंध आता अधिक सुदृढ झाले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या  प्रगती व्हिडिओ कॉन्फरसिंगमुळे केंद्र व राज्यांमध्ये योग्य सुसंवाद निर्माण झाला आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
          हिंदुस्थान टाईम्स लीडरशीप समीट  कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमास पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर  सिंगकर्नाटक चे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी उपस्थित होते. केंद्र व राज्य संबंधजीएसटीइंधन दरवाढ राज्यांचे विकास प्रकल्प आदी विषयांवर यावेळी आयोजित चर्चासत्रात मुख्यमंत्र्यांनी आपले विचार मांडले.
          मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणालेकेंद्र व राज्य यामधील संबंध आता अधिक सुदृढ  झाले आहेतराज्यांना आपल्या समस्यांविषयी आता केंद्राकडे जावे लागत नाहीकारण प्रधानमंत्र्यांनी प्रगती व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून सुसंवाद घडवून आणला आहे. या प्रयत्नांमुळे अनेक राज्यांना विविध  विकास कामांच्या परवानग्या सहज मिळू लागल्या आहेत. गेल्या चार वर्षात महाराष्ट्राला अनेक विकास प्रकल्पाचे मंजुरी आदेश केंद्राच्या प्रगती धोरणामुळे मिळालेले आहेत.
          जीएसटी बद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणालेपेट्रोल व डिझेल ला जीएसटी अंतर्गत समाविष्ट करण्याचे महाराष्ट्र समर्थन करतेपरंतु निव्वळ पारंपरिक व्यवस्थेवर अवलंबून न राहता आता पर्याय शोधण्याची वेळ आली आहे. इथेनॉलचे धोरण हा भविष्यातला योग्य पर्याय आहेयामुळे पुढील पाच वर्षात आपण 30 टक्क्यांपर्यंत निर्यात कमी करु शकतो. देशात अन्न-धान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहेत्यामुळे जैव इंधन निर्मित करणे काळाची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
          मुंबईचे शांघाय कधी होणार ?  या प्रश्नावर मुख्यमंत्री  म्हणालेमुंबई ही मुंबईच राहिली पाहिजेमुंबई शहराची एक वेगळी ओळख आहे,त्यामुळे मुंबईला कोणतेही दुसरे शहर न बनविता मुंबईच राहू द्यावी असे सांगुन मुंबईचा विकास हे शासनाचे धोरण आहेयासाठी आम्ही मेट्रो,मोनोरेलसागरी मार्गजलमार्ग प्रकल्प हाती घेतले आहेत,अशी माहिती मुख्यमंत्री यांनी यावेळी दिली. गेल्या 60 वर्षाच्या तुलनेत मागील चार वर्षात मुंबईत 1 लाख कोटींची विकास कामे सुरु करण्यात आलेली आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यास आमचे प्राधान्य आहे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या चर्चासत्राचे समन्वय सीएनएन  न्यूज 18 चॅनलचे उपकार्यकारी संपादक आनंद नरसिंम्हन यांनी केले.
००००

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती