'जय महाराष्ट्र' मध्ये गृहविभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता


 मुंबईदि. १५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात राज्यातील कायदा व सुव्यवस्था’ या  विषयावर गृहविभागाचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि. १६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७.३० ते ८ या वेळेत प्रसारित होणार आहे. श्रीमती अर्चना शंभरकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.
             राज्यात सणासुदीच्या काळात कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याचे नियोजनअफवांना बळी पडून होणाऱ्या मॉब लिंचिंगच्या घटनांवर नियंत्रणासाठी पोलीस विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनासोशल मीडियावर अफवा पसरविणा-यांवर करण्यात येणारी कारवाईराज्यातील महिलाबालके आणि वृध्दांच्या सुरक्षिततेसाठी गृह विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनासामाजिक ऐक्य व शांतता राखण्यासाठी जिल्हास्तरावर तसेच गावस्तरावर केले जाणारे प्रयत्नट्रान्सफॅार्म महाराष्ट्र  संकल्पना याबाबतची माहिती श्री. गुप्ता यांनी 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती