दिलखुलास कार्यक्रमात ‘महाराष्ट्र आणि महात्मा गांधी’ ग्रंथातील श्राव्य लेख


मुंबईदि.20 : माहिती  व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलास कार्यक्रमात    महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंती निमित्त माहिती  व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या महाराष्ट्र आणि महात्मा गांधी’ या ग्रंथातील श्राव्य लेख आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून सोमवार दि.22 आणि मंगळवार दि.23 ऑक्टोबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका श्रीमती पुनम चांदोरकर यांनी निवेदन केले आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंती निमित्त महाराष्ट्र आणि महात्मा गांधी’ या शीर्षकाचा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला. या ग्रंथात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या युगपुरुषाचा आदर्श’ या लेखात महात्मा गांधीजींच्या विचारातून मिळणाऱ्या प्रेरणेबाबत माहिती देण्यात आली आहे. नरेंद्र बेडेकर यांनी  या लेखाचे वाचन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती