Tuesday, October 9, 2018

दिलखुलास कार्यक्रमात गृहविभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता


मुंबईदि. 9 : माहिती  व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलास कार्यक्रमात राज्यातील कायदा व सुव्यवस्था’ या  विषयावर गृहविभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांची मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून बुधवार दि.10 आणि गुरूवार दि.11 ऑक्टोबर  रोजी  सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. विभागीय संपर्क अधिकारी श्रीमती अर्चना शंभरकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.
राज्यात सणासुदीच्या काळात कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याचे नियोजनअफवांना बळी पडून मारहाणीच्या व हिंसेच्या घटनांवर नियंत्रणासाठी पोलीस विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनासोशल मीडियावर अफवा पसरविणा-यांवर करण्यात येणारी कारवाईराज्यातील महिलाबालके आणि वृध्दांच्या सुरक्षिततेसाठी  गृहविभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनासामाजिक ऐक्य व शांतता राखण्यासाठी जिल्हास्तरावर तसेच गावस्तरावर केले जाणारे प्रयत्नट्रान्सफॅार्म महाराष्ट्र संकल्पना याबाबतची माहिती श्री. गुप्ता यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.
००००

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...