Tuesday, October 16, 2018

‘आपलं मंत्रालय’ या अभिनव उपक्रमाद्वारे मंत्रालयीन अधिकारी कर्मचाऱ्यांची प्रतिमा उंचावण्यास मदत होईल. तसेच या माध्यमातून मंत्रालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुप्त प्रतिभेला वाव मिळण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी आज येथे काढले.
आपलं मंत्रालय मासिकाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन व या मासिकाच्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, आपलं मंत्रालय टीम व पुरस्कार्थींचे श्री. गगराणी यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...