Posts

Showing posts from 2023

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

Image
  कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा नागरिकांनी घाबरून न जाता कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन अमरावती दि. 29 : कोविड जेएन-वन या व्हेरियंटचा प्रसार जगभर वेगाने होत आहे. यासाठी पुर्वानूभव लक्षात घेता वेळीच दक्षता आणि सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील कोविड संबंधित यंत्रणा सुसज्ज ठेवावी. येणाऱ्या संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी डॉक्टरांचे पथक, मुबलक औषधसाठा व कोविड तपासणी किट उपलब्ध करून देण्यात येईल .नागरिकांनी घाबरून न जाता कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे केले . कोविड - 19 च्या नव्याने उद्भवलेल्या व्हेरियंटचा प्रादुर्भावाबाबत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या अध्यक्षतेखाली महसूल भवन येथे आढावा बैठक घेण्यात आली , त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी संजय आसोले तसेच विविध विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.            कोविडच्या नव्याने निर्माण झालेल्या जेएन-

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रम’ जास्तीत जास्त शाळांनी उपक्रमात सहभाग घ्यावा - मुख्य कार्यकारी अधिकरी अविश्यांत पंडा

Image
  ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रम ’ जास्तीत जास्त शाळांनी उपक्रमात सहभाग घ्यावा -     मुख्य कार्यकारी अधिकरी अविश्यांत पंडा               अमरावती, दि. 29 (जिमाका) :   सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक ,पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे , यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा ’ हे अभियान राबविण्याचे निर्देश शासनाकडून प्राप्त आहेत. हे अभियान दि. 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबविल्या जाणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत - जास्त शाळांनी या उपक्रमात सहभाग घेण्याच आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज येथे केले आहे.             या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत कार्यवाहीचा आढावा जिल्हा परिषदेचे सभागृहामध्ये श्री. अविश्यांत पंडा यांच्याकडून घेण्यात आला. गट शिक्षणाधिकारी यांनी तालुकानिहाय मुख्याध्यापकांच्या सभा घेऊन त्यांना या अभियानात सहभागी होण्याबाबत स

जिल्हा लोकशाही दिन येत्या सोमवारी

  जिल्हा लोकशाही दिन येत्या सोमवारी             अमरावती, दि. 29 (जिमाका): जिल्हा लोकशाही दिन महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार जानेवारी महिन्यातील जिल्हा लोकशाही दिन सोमवार, दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी अहवालासह व्यक्तिश: उपस्थित राहण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके यांनी केले आहे. 00000

वराहांवरील आफ्रिकन स्वाईन फिवर रोगाबाबत मार्गदर्शक सूचना

  वराहांवरील आफ्रिकन स्वाईन फिवर रोगाबाबत मार्गदर्शक सूचना वराहपालन करणाऱ्या सर्व आस्थापनांनी स्वच्छता व जैव सुरक्षा उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करावी - जिल्हाधिकारी सौरभ कटियार               अमरावती, दि. 29 (जिमाका) : अचलपूर तालुक्यातील मौजा फरमानपूर येथील मृत वराहाच्या घेण्यात आलेल्या नमुन्यामध्ये प्राप्त अहवालात आफ्रिकन स्वाईन फिवर हा रोग आढळून आलेला आहे. रोगाचा प्रार्दुभाव रोखणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी मौजा फरमानपूर या भागाचे एक कि.मी. परिघातील क्षेत्रास बाधितक्षेत्र व दहा कि.मी. परिघातील क्षेत्रास संनियंत्रण क्षेत्र घोषित करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आदेशित केले आहे. आफ्रिकन स्वाईन फिवर रोगाबाबत मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे :              बाधित क्षेत्राच्या एक कि.मी. परिसरातील सर्व वराहांचे कलिंग करुन त्याची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने लावून त्या परिसराचे   निर्जंतूकीकरण करावे. आफ्रिकन स्वाईन फिवर या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधित परिसरातील सक्रिय संनिरीक्षण व्यापक प्रमाणावर करावे व सुयोग्य जैवसुरक्षा उपाय योजना कराव्यात. पाळीव

शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होताना गुणवत्ता टिकून रहावी - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Image
  शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होताना गुणवत्ता टिकून रहावी -           केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Ø    कृषिरत्न डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 125 वा जयंती उत्सव Ø    खासदार शरद पवार यांना डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार प्रदान अमरावती, दि. 27 : कृषिरत्न डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी कृषी क्षेत्राच्या विकासासह विदर्भातील खेड्यापाड्यापर्यंत शिक्षणाचे जाळे निर्माण केले. यामुळे आज विद्यार्थ्यांना विविध ज्ञानक्षेत्राचा लाभ मिळत आहेत. शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होताना त्याची गुणवत्ता टिकून रहावी, असे प्रतिपादन केंद्रीय दळणवळण व रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली श्री शिवाजी शारिरीक शिक्षण महाविद्यालयातील क्रीडांगणावर शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. सत्कारमुर्ती खासदार शरद पवार, खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके, आमदार किरण सरनाईक, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, माजी मंत्री अनिल देशम

जिल्हाधिकारी कार्यालयात 29 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक दिन

  जिल्हाधिकारी कार्यालयात 29 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक दिन अमरावती, दि. 27 : राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त शुक्रवार, दि. 29 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे ‘राष्ट्रीय ग्राहक दिन ’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्राहकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी केंद्र शासनामार्फत ‘कंन्झ्युमर प्रोटेक्शन ईन द इरा ऑफ ई-कॉमर्स डिजीटल ट्रेड ’ ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त ग्राहकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांनी केले आहे. 00000

अटल भुजल योजना; चांदुर बाजार येथे तालुकास्तरीय प्रशिक्षणात तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन

  अटल भुजल योजना; चांदुर बाजार येथे तालुकास्तरीय प्रशिक्षणात तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन       अमरावती, दि. 27 (जिमाका): भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागामार्फत शुक्रवार दि. 22 डिसेंबर रोजी चांदुर बाजार येथील तहसील सभागृहामध्ये अटल भूजल योजना अंतर्गत तालुकास्तरीय प्रशिक्षण घेण्यात आले.   यावेळी विविध विषय तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.           तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांच्या हस्ते जलपूजन करून करण्यात आले. यावेळी   उपविभागीय महसूल श्रीकांत उंबरकर, चांदुर बाजार तहसीलदार गीतांजली गरड, गट विकास अधिकारी मोहन शृंगारे आदी उपस्थित होते.   ‘पाण्याचे मागणी व्यवस्थापन ’ या विषयावर कृषी तज्ञ जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्ष दिनेश खडसे यांनी मार्गदर्शन केले. तसेच योजनेतंर्गत शेतकरी मेळावा व तृणधान्य मेळावा ग्रामपंचायतस्तरावर सुरू असून त्यामध्ये ठिंबक व तुषार सिंचनाचे महत्व सांगितले. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून अनुदानाचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन केले. ‘पाणी बचतीसाठी आंतरव्यक्ती संवाद ’ या विषयावरील उपक्रमाबाबतची माहि

अभय योजनेंतर्गत थकीत मुद्रांक शुल्क व दंड सवलत योजना; योजना दोन टप्प्यात राबविण्यात येणार:योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

  अभय योजनेंतर्गत थकीत मुद्रांक शुल्क व दंड सवलत योजना;   योजना दोन टप्प्यात राबविण्यात येणार:योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन   अमरावती, दि. 27 (जिमाका): मालमत्तेचे हस्तांतरण करतांना नियमापेक्षा कमी मुद्रांक शुल्क भरलेल्या अथवा नोंदणी न केलेल्या दस्तांसाठी   अभय योजनेंतर्गत मुद्रांक शुल्क व दंड माफी योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा पहिला टप्पा   दि. 1 डिसेंबर 2023 ते दि.31 जानेवारी 2024 आणि दुसरा टप्पा दि. 1 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 अशा दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा   मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल औतकर यांनी केले आहे. अभय योजनेंतर्गत पहिल्या टप्पात सन 1980 ते 2000 या कालावधीत नोंदणीसाठी दाखल केलेले अथवा न केलेले दस्ताकरीता दि. 1 डिसेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम रूपये 1 लाखापर्यंत असल्यास मुद्रांक शुल्क व दंडाची संपुर्ण रक्कम माफ केली आहे. देय होणारी रक्कम 1 लाख रुपयेवरील असल्यास 50 टक्के व दंडाच्या रक्कमेत संपुर्णत: 100 टक्के सुट देण्या

मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम;दावे व हरकती दि.12 जानेवारीपर्यंत निकाली काढण्यास मुदतवाढ

  मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम;दावे व हरकती दि.12 जानेवारीपर्यंत निकाली काढण्यास मुदतवाढ अमरावती, दि. 27 (जिमाका): राज्य निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहिर केला आहे. कार्यक्रमामध्ये निवडणूक आयोगाने अंश:त बदल करुन सुधारित कार्यक्रमानुसार दावे व हरकती निकाली काढण्याचे शुक्रवार दि. 12 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली. सुधारीत कार्यक्रम याप्रमाणे : दावे व हरकती शुक्रवार दि. 12 जानेवारीपर्यंत निकालात काढणे.   बुधवार दि. 17 जानेवारी 2024 पर्यंत मतदार यादीचे तपासणे आणि अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी घेणे तसेच डेटा बेस अद्यावत करणे व पुरवणी याद्यांची छपाई करणे.   तर अंतीम मतदार यादी सोमवार दि. 22 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्धी होईल. 00000

जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख यांना अभिवादन

Image
  जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख यांना अभिवादन                अमरावती, दि. 27 (जिमाका): देशाचे माजी कृषी मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार भाग्यश्री देशमुख यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.          यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनीही स्व. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून आदरांजली वाहिली. 00000

रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांचा अमरावती जिल्हा दौरा

Image
  रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांचा अमरावती जिल्हा दौरा अमरावती, दि. 26 (जिमाका): रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हे आज,   दि. 27 डिसेंबर 2023 रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौरा   पुढीलप्रमाणे : बुधवार, दि. 27 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 2 वाजता बेलोरा विमानतळ येथे आगमन व   अमरावती विभागातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाची पाहणी. दुपारी 2.30 वाजता श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, पंचवटी चौक, अमरावतीकडे प्रयाण व आगमन.   दुपारी 3 वाजता डॉ. पंजाबराव देशमुख यांची 125 व्या   जयंती निमित्त शिवाजी शिक्षण संस्था अमरावती येथील कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळ 4.30 वाजता श्रीकृष्ण पेठकडे प्रयाण. सायंकाळ 4.35 वाजता महिन्द्रा राहटगांवकर यांचा निवासस्थानी सदिच्छा भेट. दुपारी 4.50 वाजता अमरावती बेलोरा विमानतळकडे प्रयाण. सायंकाळ 5.15 वाजता अमरावती बेलोरा विमानतळ, अमरावती येथून नागपूरकडे प्रयाण करतील. 00000

सहकारी व्यवस्थापन पदविकासाठी प्रवेश सूरू;30 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

  सहकारी व्यवस्थापन पदविकासाठी प्रवेश सूरू;30 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन             अमरावती, दि. 26 (जिमाका) : सहकारी संस्थांमध्ये काम करण्यासाठी सहकारी व्यवस्थापन पदविका अनिवार्य केले आहे. या अभ्यासक्रमासाठी भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्र, अमरावती येथे दि. 1 जानेवारी ते 30 जुन 2024 या मुदतीसाठी प्रवेश देणे सुरू आहे. इच्छुकांनी दि. 30 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन   भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य यांनी केले आहे. सहकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे कामकाज सांभाळून हा अभ्यासक्रम दुरूस्थ शिक्षण पध्दतीने पुर्ण करता यावा. तसेच राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांना सहकार क्षेत्रातील विविध सहकारी संस्थामध्ये या पदविका अभ्यासक्रमामुळे नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी संघाने 13 सहकार प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातुन हा अभ्यासक्रम पोस्टल पध्दतीने सुरू केला आहे. या अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या. पुर्ण अंतर्गत भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्र अमरावती येथे दि. 1 जानेवारी 2024 ते

कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 28 डिसेंबर रोजी 91 रिक्तपदांवर होणार भरती; युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

  कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 28 डिसेंबर रोजी 91 रिक्तपदांवर होणार भरती; युवक-युवतींना रोजगाराच्या संधी                 अमरावती, दि. 26 (जिमाका): अमरावती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’चे आयोजन करण्यात येते. त्याअनुषंगाने ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ गुरुवार दि. 28 डिसेंबर 2023 रोजी होणार आहे. स्थानिक तसेच अन्य जिल्ह्यातील नामवंत खाजगी कंपन्या, कारखाने आणि उद्योग समूहामध्ये काम करण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.             जिल्ह्यातील युवक-युवतींना नोकरीच्या संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार मेळाव्यामधून नोकरी देण्याचा प्रयत्न जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे करण्यात येतो. त्याचाच पुढील टप्पा म्हणून आता प्रत्येक महिन्यात "जागेवरच निवड" (On Spot Selection) मोहीम आयोजित करण्यात येत आहे. त्यात विविध उद्योजकांना आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या पात

शहरात कलम 37 (1) व (3) लागू

  शहरात    कलम 37 (1)    व (3) लागू                अमरावती, दि. 21 (जिमाका):    शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस आयुक्त    (अमरावती शहर) यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.                  सदर प्रतिबंधात्मक आदेश शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता अमरावती पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात    लागू    करण्यात आला असून तो दि. 23 डिसेंबरचे   मध्यरात्रीपासून ते दि. 6 जानेवारी 2024 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त (अमरावती शहर)    नविनचंद्र रेड्डी    यांनी कळविले आहे. 000000

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करा

  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करा            अमरावती, दि. 21 (जिमाका) :   सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणारी भारतरत्न    डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2023-24 या वर्षातील नवीन प्रवेशित व नुतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज घेणे सुरू झाले आहे. तरी सर्व अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या विद्यार्थ्यांनी swadharyojana.com या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा. विद्यार्थांनी अर्जाची हार्डकॉपी सर्व हार्डकॉपी सर्व कागदपत्रासह दि. 31 डिसेंबर 2023 पर्यंत कार्यालयात सादर करावे, असे आवाहन    सहायक आयुक्त समाज कल्याण माया केदार यांनी केले आहे. *****

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची सुवर्ण संधी

  भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची सुवर्ण संधी   अमरावती, दि. 21 (जिमाका): भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील नवयुवक, नवयुवतीसाठी       दि. 8 ते 17 जानेवारी, 2024 या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. 56 आयोजित करण्यात आले आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क व्यवस्था करण्यात आली आहे.   अमरावती जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधीचा लाभ घेण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अमरावती येथे दि. 3 डिसेंबर 2024 मुलाखतीस हजर रहावेत. मुलाखतीस येते वेळी सैनिक कल्याण विभाग, पूणे (Department of Sainik Welfare, Pune) या वेबसाईट वर सर्च करुन त्यामधील एसएसबी-56 कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा; प्रशासकीय विभागांनी समन्वयाने उपक्रम यशस्वी करा- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

Image
‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा; प्रशासकीय विभागांनी समन्वयाने उपक्रम यशस्वी करा- जिल्हाधिकारी सौरभ कटियार   अमरावती, दि. 21 (जिमाका):   शासकीय योजनाची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ अभियान शासनामार्फत राबविण्यात येत आहे. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहचून त्यांना सहाय्य व्हावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या अनुषंगाने शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे जिल्हास्तरीय आयोजन अमरावती येथे लवकरच करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने प्रशासकीय विभागांनी समन्वय साधून जिल्हास्तरावरील ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे केले.   जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या आयोजनाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी श्री. कटियार बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, पोलीस अधीक्षक विशाल सिंगुरी , अतिरिक्त जिल्हाधिकारी सूरज वाघमारे, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रिचर्ड यानथन, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभ

‘ईव्हीएम व व्हीव्हीपॅट’ प्रात्यक्षिक केंद्राचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे हस्ते शुभारंभ

Image
  ‘ईव्हीएम व व्हीव्हीपॅट’ प्रात्यक्षिक केंद्राचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे हस्ते शुभारंभ   अमरावती, दि. 21 (जिमाका):   लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रणा मतदारांना अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या ईव्हीएम प्रात्यक्षिक सेंटरचे उद्घाटन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते आज करण्यात आले. मतदारांनी या यंत्रणेची प्रात्यक्षिके पाहून शंकानिरसन करून घ्यावे, असे आवाहन श्री. कटियार यांनी यावेळी केले.   जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अमरावती येथे ‘ईव्हीएम व व्हीव्हीपॅट’ प्रात्यक्षिक केंद्राचे शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी सूरज वाघमारे, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रिचर्ड यानथन, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पी.एम. मिनू, उपजिल्हाधिकारी रणजीत भोसले, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, प्रदीप पवार, मनोज लोणारकर, रविंद्र जोंगी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांच्यासह गटविकास अधिकारी व तहसिलदार उपस्थित होते.   लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून अमरावती जिल्ह्यात

कृषी पुरस्कारःप्रस्ताव मागविले

कृषी पुरस्कारःप्रस्ताव मागविले               अमरावती, दि. 20 (जिमाका):   कृषी विभागामार्फत कृषी व कृषी पूरक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या शेतकरी,व्यक्ती, संस्था, अधिकारी व कर्मचारी यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न, वसंतराव नाईक कृषी भूषण, जिजामाता कृषी भूषण, कृषी भूषण (सेंद्रिय शेती), वसंतराव नाईक   शेतीमित्र, उद्यान पंडित पुरस्कार, वसंतराव नाईक शेती निष्ठ शेतकरी पुरस्कार व युवा शेतकरी पुरस्कार देऊन दरवर्षी   गौरविले जाते.   सन 2023 या वर्षासाठी पुरस्काराचे प्रस्ताव कृषी विभागाने मागविले असून प्रस्ताव दि. 31 जानेवारी 2024 पर्यंत पाठवावयाचे आहेत. शेतकऱ्यांनी पुरस्कार प्रस्ताव सादर करण्याकरिता व अधिक माहितीसाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यक ,कृषी पर्यवेक्षक किवा नजीकच्या मंडळ कृषी अधिकारी,तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा   अधीक्षक   कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे. ०००००