‘विकसित भारत संकल्प यात्रे’द्वारे जिल्ह्यात जनजागृती; 13 डिसेंबरपर्यंतचा नियोजित कार्यक्रम जाहिर

 ‘विकसित भारत संकल्प यात्रे’द्वारे जिल्ह्यात जनजागृती; 13 डिसेंबरपर्यंतचा नियोजित कार्यक्रम जाहिर


अमरावती, दि. 8 (जिमाका):   केंद्र सरकारच्या फ्लॅगशीप योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा यादृष्टीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ मोहिम राबविण्यात येत आहे. या यात्रेचा जिल्ह्यात दि. 23 नोव्हेंबरपासून शुभारंभ करण्यात आला आला असून आतापर्यंत 180 हून अधिक गावांत यात्रा पोहोचली आहे. तसेच तिसऱ्या टप्प्यातील दि. 13 डिसेंबरपर्यंतचा नियोजित कार्यक्रमानुसार जाहिर करण्यात आला आहे.  


‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही देशव्यापी मोहीम ग्राम व शहरी स्तरावर राबविली जाणार आहे. भारत सरकारच्या एकूण 17 फ्लॅगशिप योजनांचा लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचविण्यासाठी संकल्प यात्रेतून साध्य केले जाणार आहे. ही यात्रा दि. 23 नोव्हेंबरपासून ते दि. 26 जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या निश्चित केलेल्या ठिकाणी भेटी देणार आहे. तिसऱ्या हप्त्यातील संकल्प यात्रेचा नियोजित कार्यक्रम पुढील प्रमाणे.


यात्रेचा 13 डिसेंबरपर्यंतचा नियोजित कार्यक्रम


आज दि. 9 डिसेंबर रोजी अमरावती तालुक्यातील पार्डी व वडगांव जिरे, तिवसा येथील वाथोडा खु. व शेंदुरजना खु., नांदगाव खंडेश्वर येथील मांजरी मासला व ऐरंडगाव, मोर्शी येथील कस्टर व पातूर, अचलपूर येथील वसनी खु. व हिवरा पुर्णा, दर्यापूर येथील हिंगणा मिर्जा व पनोरा व धारणी येथील घुटी व बोदला या ठिकाणी भेट देणार आहेत. 

दि. 10 डिसेंबर रोजी अमरावती तालुक्यातील भानखेडा बु. व भानखेडा खु., तिवसा येथीलअंकवाडी व वऱ्हा, नांदगाव खंडेश्वर येथील सातरगाव व कंजरा, मोर्शी येथील लाडकी बु व पिंपलखुटा, अचलपूर येथील येलकी पुर्णा व सावलापूर, दर्यापूर येथील इतकी व उमरी ममदपूर व धारणी येथील सलाई व कलमखारा.

 दि. 11 डिसेंबर रोजी अमरावती तालुक्यातील कस्तुरा मोगरा व पोहरा, तिवसा येथील धोत्रा व सलोरा बु., नांदगाव खंडेश्वर येथील येनस व फुबगाव, मोर्शी येथील निंबी व नया वाथोडा, अचलपूर येथील खैरी व दोनोदा, दर्यापूर येथील जैनपूर व पिंपलोड व धारणी येथील गोंडवाडी व चिंचघाट या ठिकाणी भेट देणार आहेत.

दि. 12 डिसेंबर रोजी अमरावती तालुक्यातील बोदना व पिंपलखुटा, तिवसा येथील घोटा व शेंदोला बु., नांदगाव खंडेश्वर येथील वाघोडा व सुलतानपूर, मोर्शी येथील नाशीरपूर व पार्डी, अचलपूर येथील यूसूर्णा व निमधारी, दर्यापूर येथील  कलशी व खैरी व धारणी येथील  रतनपूर व खैरयतेंभुर.

दि. 13 डिसेंबर रोजी अमरावती तालुक्यातील इंदला व मसोद, तिवसा येथील शिरीजगाव व मोजरी, नांदगाव खंडेश्वर येथील धमक व बेलोरा धमक, मोर्शी येथील पोरगव्हाण व विश्नोर, अचलपूर येथील, दर्यापूर येथील कान्होली व नरदोला  व धारणी येथील टिंगरा व घुलघाट या गावांना आयईसी व्हॅन भेटी देणार आहे.


केंद्र शासनाच्या 17 योजनांची जनजागृती


  जिल्ह्यांकरिता विशेष लक्ष्य केंद्रीत केलेल्या योजना तसेच भारत सरकारच्या ज्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ ग्रामीण भागातील व शहरी लोकांपर्यंत यात्रेच्या माध्यमातून पोहोचविण्यात येणार आहे. यामध्ये आयुष्यमान भारत, पीएम गरीब कल्याण योजना, दीनदयाल अंत्योदय योजना, पीएम आवास योजना, पीएम उज्ज्वला योजना, पीएम विश्वकर्मा, पीएम किसान सन्मान, किसान क्रेडिट कार्ड, पीएम पोषण अभियान, हर घर जल-जल जीवन मिशन, स्वामित्व, जन धन योजना, जीवन ज्योती बिमा योजना, सुरक्षा बिमा योजना, अटल पेन्शन योजना, पीएम प्रणाम, नॅनो फर्टिलायजर या योजनांची माहिती देण्यात येणार आहे. 

000000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती