18 डिसेंबर अल्पसंख्यांक हक्क दिवस

 

18 डिसेंबर अल्पसंख्यांक हक्क दिवस

 

अमरावती, दि. 15 (जिमाका):  18 डिसेंबर हा अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून अल्पसंख्यांक नागरीकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणीव, माहिती देण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दि. 18 डिसेंबर रोजी होणार आहे.

 

जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयांत समाजसेवी संस्थांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी गट व विद्यार्थी यांच्याकरीता भित्तीपत्र स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे. या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषीके देण्यात यावी. तसेच अल्पसंख्यांक हक्क दिवसानिमित्त चर्चासत्र, व्याख्यानमाला व परिसंवादाचे आयोजन देखील करण्यात यावे. तसेच राज्य अल्पसंख्यांक आयोगामार्फत अल्पसंख्यांक समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी मेळावे व चर्चासत्राचे आयोजन करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिल्या.

000000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती