महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची वन स्टॉप सेंटर व मुलींच्या निरीक्षण गृहाला भेट; महिला व मुलींशी साधला संवाद

 






महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची वन स्टॉप सेंटर व मुलींच्या निरीक्षण गृहाला भेट;

महिला व मुलींशी साधला संवाद

 

 अमरावती, दि. 9 (जिमाका) : येथील जिल्हा महिला सक्षमीकरण केंद्र ‘वन स्टॉप सेंटर व शासकीय मुलींचे निरीक्षण व बालगृहाला राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी येथील महिला व मुलींशी संवाद साधून त्यांची आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या .

महिला व बालविकास विभागातंर्गत जिल्हा महिला सक्षमीकरण केंद्र ‘सखी वन स्टॉप सेंटरच्या भेटी दरम्यान श्रीमती तटकरे यांनी येथील  सोयीसुविधेबाबत माहिती जाणून घेतली. सेंटरमध्ये राहत असलेल्या महिलाशी त्यांनी यावेळी संवाद साधून त्यांची विचारपूस केली. तसेच महिला व बालविकास आयुक्तालयातंर्गत शासकीय मुलींचे निरीक्षण व बालगृहातील मुलींशीही संवाद साधून त्यांच्या समस्या व अडीअडचणी जाणून घेतल्या. मुलींनी स्वत: तयार केलेल्या विशेष कलाकृती व साहित्याचे श्रीमती तटकरे यांनी कौतुक केले.   

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखाताई ठाकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, महिला व बाल विकास अधिकारी डॉ. उमेश टेकाडे, तहसिलदार विजय लोखंडे, विधी सल्लागार जितेंद्र चौधरी, बाल संरक्षण अधिकारी अजय डबले, सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक ॲड. मीना र्निमले, शासकीय मुलींचे निरीक्षण व बालगृहाचे अधिक्षक अरुण गांधी आदी यावेळी उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती