शहरात कलम 37 (1) व (3) लागू
शहरात कलम 37 (1) व (3) लागू
अमरावती, दि. 21 (जिमाका): शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस आयुक्त (अमरावती शहर) यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3)
अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
सदर प्रतिबंधात्मक आदेश शहरातील
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता अमरावती पोलिस आयुक्तालयाच्या
परिक्षेत्रात लागू करण्यात आला असून तो दि. 23 डिसेंबरचे मध्यरात्रीपासून
ते दि. 6 जानेवारी 2024 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या
व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त (अमरावती शहर) नविनचंद्र रेड्डी यांनी कळविले आहे.
000000
Comments
Post a Comment