Friday, December 8, 2023

सेक्स वर्कर व तृतीयपंथीयांचे मतदार नोंदणी शिबीर संपन्न

 सेक्स वर्कर व तृतीयपंथीयांचे मतदार नोंदणी शिबीर संपन्न

 

अमरावती, दि. 8 (जिमाका):   उपविभागीय  कार्यालय अमरावतीमार्फत समर्पण ट्रस्ट व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळ यांच्या सहकार्याने प्रशांत नगर अमरावती येथे आज सेक्स वर्कर व तृतीयपंथी यांचेकरीता मतदार नोंदणी व मतदार जनजागृती अभियानांतर्गत शिबीरांचे आयोजन करण्यात आले. यावेळी  35 सेक्स वर्कर व तृतीयपंथी यांनी मतदार नोंदणी व मतदार कार्ड दुरुस्तीचे अर्ज भरुन शिबीरांचा लाभ घेतला. या अभियानाचे यशस्वीकरीता समर्पण ट्रस्टचे अध्यक्ष हेमंतकुमार टोकशा, प्रकल्प व्यवस्थापक राजेश तुपोने, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळाचे राजेंद्र साबळे, प्रतिक्षा मोहोड तसेच महसूल विभागाचे सत्यजित थोरात, भारत कांबळे आदीनी सहकार्य केले.

00000

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...