Friday, December 15, 2023

अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन

अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन

 

            अमरावती, दि. 15 (जिमाका): पोलिस ठाणे सिटी कोतवाली अमरावती (शहर) अंतर्गत एका अनोळखी इसमाचा मृतदेह, एकता ज्वेलर्स समोर, जयस्तंभ चौक रोड,अमरावती येथे सापडला. मृतकाचे अंदाजे वय 60 वर्षे असून मृतकाचा बांधा सडपातळ, गोरा, उंची 5 फुट 2 इंच, डोक्याचे केस व दाळी काळे व पांढरी, अंगात पाढऱ्या रंगाचा फुल बाह्याचा  शर्ट व निळा रंगाचा हाप पँन्ट आहे. मृतकाच्या नातेवाईकाचा शोध लागावा व अनोळखी इसमाची ओळख पटविण्यास पोलीस नियंत्रण कक्ष , अमरावती शहर दुरध्वनी क्रमांक - 0721-2672001 किंवा पोहेकाँ मनोज काळपांडे भ्रमणध्वनी क्रं. 7083091678 या क्रमांकावर संपर्क साधावा. यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस स्टेशन सिटी कोतवाली, अमरावती  यांनी केले आहे.

00000


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...