Friday, December 8, 2023

दिव्यांग जनजागृती रॅलीचे आयोजन

 

दिव्यांग जनजागृती रॅलीचे आयोजन

 

अमरावती, दि. 07 (जिमाका):   जिल्हा परिषद समाज कल्याण कार्यालय व दिव्यांग विशेष शाळा व कार्यशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. 8 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9 वाजता  दिव्यांग जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, इर्विन चौक येथून सुरु होणार आहे. तरी नागरिक व विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधव यांनी केले आहे.

 

            रॅलीचा मार्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, इर्विन चौक येथून सुरु होऊन गर्ल्स हायस्कूल चौक,जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद,एनसीसी भवन, पोलिस आयुक्त कार्यालय मार्गे सामाजिक न्याय भवन असा राहिल. जनजागृती रॅलीमध्ये विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त व समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त उपस्थित राहणार आहे. तसेच जिल्ह्यातील अंध प्रवर्ग, मुकबधिर, मतिमंद, अस्थिव्यंग अशा 13 शाळेतील विद्यार्थी, कर्मचारी सहभागी होणार आहे.

00000

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...