पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा; ‍ प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये 147 उमेदवारांची प्राथमिक निवड

 

 पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा;

प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये 147 उमेदवारांची प्राथमिक निवड

 

 अमरावती, दि. 5 (जिमाका) :  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावाचे (प्लेसमेंट ड्राईव्ह)  दि. 28 नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले. या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये 147 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

 

मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील नामांकित कंपणीने सहभाग घेतला होता. यामध्ये डॉ. राजेंद्र गोडे इंस्टीटयुट अमरावती, जाधव ग्रुप ऑफ कंपनीज, रेडीयंट सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल, ॲक्झॉन हॉस्पीटल, करिअर पॉइंट कोटा, घरकुल इंडस्ट्रीज, आस्था फुड, इत्यादी खाजगी आस्थापनांच्या प्रतिनिधी सहभाग घेवून उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या. ऑनलाईन व ऑफलाईन प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये 355 उमेदवारांनी सहभाग नोंदवला. त्यापैकी 147 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आले.

 

रोजगार मेळावा कार्यक्रम प्रसंगी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, कौशल्य विकास अधिकारी अभीषक ठाकरे, वैशाली पवार तसेच गोळे इस्टीटयुटचे प्रतिनिधी श्रीमती राऊत, जाधव ग्रुप ऑफ कंपनीचे चंद्रकांत वाघमारे, रेडीयंट सुपरस्पेशलिस्ट हॉस्पीटलचे वैशाली लाहे, घरकुल इंडस्ट्रीजचे शशीकांत वानखडे आदी प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अश्वीनी गाढेकर यांनी केले. सुत्रसंचालन कृपा अरगुलेवार यांनी तर आभार प्रदर्शन पंकज कचरे यांनी केले.

000000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती