भरडधान्य खरेदी नोंदणीसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

 

भरडधान्य खरेदी नोंदणीसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

 

अमरावती, दि. 4 (जिमाका) :  आधारभूत किंमत खरेदी योजनेत भरडधान्य ज्वारी व मका खरेदीसाठी शेतकरी बांधवांची ऑनलाईन नोंदणीसाठी अर्ज मागविले होते. परंतु नोंदणी पुरेशी झालेली नसल्याने भरडधान्य खरेदीच्या ऑनलाईन नोंदणीकरीता मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी पात्र व इच्छूक शेतकऱ्यांनी दि. 31 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी, अमरावती यांनी केले आहे.

 

आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत राज्य शासनामार्फत भरडधान्य ज्वारी व मका खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यात अचलपूर, मोर्शी, वरुड, धामणगाव रेल्वे या चार तालुक्यात खरेदी केंद्रे उघडण्यात आली आहेत.

 

शेतकरी नोंदणी करतांना या हंगामापासून ज्या शेतकऱ्यांचा 7/12 त्यामध्ये पिकपेऱ्याची नोंद असावी,आधार कार्ड, ॲक्टीव बँक खातेची अचूक माहिती या सर्व तपसिल दयावा, त्याशिवाय नोंदणी पूर्ण होत नाही.  त्या शेतकऱ्याने लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी स्वत: खरेदी केंद्रावर उपस्थित राहण्याबाबत जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती