भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी 31
डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करा
अमरावती, दि. 21 (जिमाका) : सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2023-24 या वर्षातील नवीन
प्रवेशित व नुतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज घेणे सुरू झाले आहे. तरी सर्व अनुसूचित
जाती व नवबौध्द घटकांच्या विद्यार्थ्यांनी swadharyojana.com या वेबसाईटवर ऑनलाईन
पद्धतीने अर्ज भरावा. विद्यार्थांनी अर्जाची हार्डकॉपी सर्व हार्डकॉपी सर्व कागदपत्रासह
दि. 31 डिसेंबर 2023 पर्यंत कार्यालयात सादर करावे, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण माया केदार यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment