Wednesday, December 13, 2023

दुकानांचे नामफलक मराठीत लावणे बंधनकारक

 

दुकानांचे नामफलक मराठीत लावणे बंधनकारक

 

अमरावती, दि. 11 (जिमाका):   महाराष्ट्र  दुकाने व आस्थापना अधिनियमांतर्गत सर्व  व्या‍वसायिक दुकान आणि आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये  लावण्याबाबतची अधिसूचना  शासनाने  निर्गमित केली आहे. या अधिनियमांतर्गत दुकानदारांनी अंमलबजावणी  करण्याचे आवाहन कामगार उपआयुक्त यांनी केले आहे.

 

अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील  सर्व दुकाने व आस्थापनांचे  नामफलक मराठी भाषेमध्ये  ठळक अक्षरात दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. मराठी भाषेतील नामफलक इतर भाषेत असलेल्या  नामफलकापेक्षा मोठ्या व  ठळक अक्षरात असावे. तसेच ज्या आस्थापनामध्ये मद्य पुरविल्या किंवा विकेल जाते अशा आस्थापनाधारकांनी नामफलकावर महान व्यक्तीचे किंवा गड किल्यांची नावे लिहणार नाही. आस्थापनाधारक आपल्या आस्थापनेचे नामफलक मराठी भाषेमध्ये दर्शनी भागावर लावणार नाहीत, त्या आस्थापना मालकावर अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल. याबाबत प्रत्येक आस्थापनाधारकाने दक्षता घ्यावी.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...