अटल भूजल योजनेंतर्गत वरुड येथे तालुकास्तरीय प्रशिक्षण

 

अटल भूजल योजनेंतर्गत वरुड येथे तालुकास्तरीय प्रशिक्षण

 

अमरावती, दि. 6 (जिमाका) : अटल भूजल योजनेंतर्गत वरुड नगर परिषद सभागृह येथे एक दिवसीय तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. त्यात 152 प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला.  

 

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा व जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्ष अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने प्रक्षिणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाला अटल भूजल योजनेसंबंधीत विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्हा अंमलबजावणी भागीदार संस्थेचे समन्वयक, विषय तज्ज्ञ तसेच समुह संघटक प्रशिक्षणार्थी म्हणून उपस्थित होते. आमदार देवेंद्र भुयार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

 

तहसिलदार चारुदत्त पाटील यांनी अटल भूजल योजनेंतर्गत ग्रामसमृद्ध स्पर्धेत सहभाग होण्याबाबत मार्गदर्शन केले. स्पर्धेत जास्तीत जास्त ग्रामपंचायतीने सहभागी होण्यासाठी ग्रामस्तरावर जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या. ग्रामसमृद्ध स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन श्री. पाटील यांनी प्रशिक्षण कार्यशाळेत केले.

 

कृषी तज्ज्ञ दिनेश खडसे यांनी पाणी बचत व उपाययोजनाबाबत याबाबत मार्गदर्शन केले. तसेच भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा 2023-24 बाबत सविस्तर माहिती  देऊन सद्यास्थितीत सहभाग घेतलेल्या ग्रामपंचायतीना स्पर्धेच्या तयारीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जलसंधारण तज्ज्ञ सचिन चव्हाण यांनी जल संधारण मधील कामाची गाव निहाय माहिती दिली. तर कृषी तज्ज्ञ श्री. बावनकुळे यांनी शेतकरी मेळावा व तृणधान्य मेळावाबाबत सविस्तर माहिती देऊन तृणधान्याचे महत्व सांगितले. यावेळी गट विकास अधिकारी वासुदेव कनाटे, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक, कृषि विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक आदी उपस्थित होते. प्रशिक्षणाचे सुत्रसंचालन प्रमोद झगेकर यांनी तर आभार प्रदर्शन अश्वमेघ संस्थेचे समन्वयक श्री. मेश्राम यांनी केले.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती