‘विकसित भारत संकल्प यात्रा’ मोहिमेच्या माध्यमातून शासकीय योजनाचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा - जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 




‘विकसित भारत संकल्प यात्रा’ मोहिमेच्या माध्यमातून

शासकीय योजनाचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा

- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 

अमरावती, दि. 12 (जिमाका): विविध योजनांमध्ये पात्र असलेल्या परंतु आतापर्यंत लाभ न मिळालेल्या व्यक्तींपर्यंत  केंद्र शासनाच्या योजनांचे लाभ पोहोचविण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ मोहिम राबविण्यात येत आहे. ही यात्रा शहर व ग्रामीण भागात पोहोचत असून या यात्रेच्या माध्यमातून शासकीय योजनाचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी संबंधिताना दिले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे विकसित भारत संकल्प यात्रेच्या अंमलबजावणी संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, मनपा आयुक्त देविदास पवार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश सोले, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक पंकज कुमार,जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे तसेच विविध विभागप्रमुख, ऑनलाईनव्दारे उपविभागीय अधिकारी, मुख्यधिकारी, गटविकास अधिकारी, तहसिलदार यावेळी उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी सौरभ कटियार म्हणाले की, विकसित भारत संकल्प यात्रेचा दि. 23 नोव्हेंबरपासून शुभारंभ करण्यात आला आला असून शहरी व ग्रामीण भागात आतापर्यंत 200 हून अधिक गावांत यात्रा पोहोचली आहे. यात्रेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना योजनाचा लाभ दिला जात आहे. नागरिकांचा यात्रेला उर्त्स्फूत प्रतिसाद मिळत आहे. लाभार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात जनजागृती करावी. दुर्गम व लाभ न मिळालेल्या ठिकाणी सर्व विभागाच्या समन्वयाने विशेष शिबिरांचे आयोजन करावे. शासनाच्या योजनापासून पात्र लाभार्थी वंचित राहता कामा नये. शासकीय योजना नागरिकापर्यंत पोहोचविण्याची उत्तम संधी असून शासकीय यंत्रणानी मिशन मोडवर काम करावे, असे निर्देश श्री. कटियार यांनी यावेळी दिले.

 

‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही देशव्यापी मोहीम ग्राम व शहरी स्तरावर राबविली जात आहे. भारत सरकारच्या एकूण 17 फ्लॅगशिप योजनांचा लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचविण्यासाठी संकल्प यात्रेतून साध्य केले जात आहे. ही यात्रा दि. 26 जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या निश्चित केलेल्या ठिकाणी भेटी देणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके यांनी दिली.

000000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती