हर्मन फिनोकेम कंपनीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक; उद्योग उभारणी संदर्भात येणाऱ्या अडचणी तातडीने मार्गी लावू- सौरभ कटियार

 








हर्मन फिनोकेम कंपनीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक;


उद्योग उभारणी संदर्भात येणाऱ्या अडचणी तातडीने मार्गी लावू- सौरभ कटियार


अमरावती, दि. 14 (जिमाका):  नांदगाव पेठ पंचतारांकित औद्योगिक वसाहत येथे मे. हर्मन फिनोकेम कंपनीचे औषधी निर्मिती प्रकल्प प्रस्तावित होता. परंतु तांत्रिक कारणास्तव कंपनीने माघार घेतल्याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले होते. यासंदर्भात प्रशासनाने दखल घेऊन कंपनीच्या प्रतिनिधींसोबत तातडीने या संदर्भात बैठक घेतली. या बैठकीत कंपनीच्या प्रतिनिधींशी विस्तृत चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रकल्प सुरु करण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी तातडीने मार्गी लावून भविष्यात कोणत्याही अडचणी येणार नसल्याचे ग्वाही जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी यावेळी दिली. तसेच या बैठकीत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी यांनीही कंपनीच्या तांत्रिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला.


हरमन फिनोकेम कंपनीचे प्रतिनिधींसोबत आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक पार पडली , त्यावेळी श्री. कटियार बोलत होते. पोलीस अधीक्षक विशाल सिंगुरी, औद्योगिक विकास महामंडाळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन शर्मा, सहमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, हरमन फिनोकेम लि. कंपनीचे महाव्यवस्थापक चंद्रकांत नारकर  तसेच जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.


मे. हर्मन फिनोकेम कंपनीला औषध निर्मितीसाठी नांदगाव पेठ पंचतारांकित औद्योगिक वसाहत येथे 118 एकर जागा महामंडळ मार्फत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. कंपनीला येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडविण्याच्या हमीनंतर कंपनीचे प्रतिनिधी महाव्यवस्थापक चंद्रकांत नारकर यांनी प्रशासनाचे आभार व्यक्त करुन उद्योग सुरु करण्याबाबत सकारात्मकता दर्शविली. बैठकीनंतर नांदगाव पेठ औद्योगिक वसाहत येथे हरमन फिनोकेम लि. कंपनीला दिलेल्या जागेची जिल्हाधिकारी श्री . कटियार तसेच संबंधित अधिकार्‍यांनी पाहणी केली.  

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती