Posts

Showing posts from July, 2016
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रहाटकर आज शहरात * ‘महिला आयोग आपल्या दारी’ अंतर्गत साधणार संवाद         अमरावती, दि.28 : महाराष्ट्र राज्य आयोगाच्या अध्यक्षा (राज्यमंत्री दर्जा प्राप्त) श्रीमती विजया रहाटकर दि.29 जुलै, 16 रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यत शासकीय विश्रामगृह येथे  ‘ महिला आयोग आपल्या दारी ’  अंतर्गत  त्या जनतेशी संवाद साधणार आहेत. ज्या महिलांच्या काही समस्या असतील, तक्रारी असतील,  त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.           महिलांचा घरात होणारा छळ, समाजातून होणारे अपमानास्पद प्रसंग अशा अनेक अनुभवात तक्रार केली तर आपलीच बदनामी होते म्हणुन महिला तक्रार करण्याचे टाळतात. राज्य महिला आयोग त्यांच्यासाठी काम करते, मात्र महिला आयोगाचे कार्यालय मुंबई येथे असल्याने व अनेक महिलांना आयोगाची माहिती नसल्याने महिला आयोगापर्यंत पोहोचता येत नाही. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर ह्या अमरावती दौऱ्यावर येणार असुन अशा महिलांशी संवाद साधतील. 00000 विभागातील अमरावती, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टी 24 तासा
विभागातील अमरावती, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टी 24 तासात सरासरी 28 मि.मी. पाऊस         अमरावती, दि.28 : अमरावती विभागातील अमरावती, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कुठल्याही तालुक्यामध्ये 65 मि.मी. व त्यापेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्यास या भागात अतिवृष्टी झाल्याची नोंद घेण्यात येते. त्यानुसार  अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात दि.28 जुलै, 16 रोजी घेण्यात आलेल्या नोंदीनुसार 77.2 मि.मी., बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा मध्ये 93 मि.मी., मेहकर मध्ये 69 मि.मी. तर सिंदखेडराजा मध्ये 196 मि.मी., वाशिम जिल्ह्यातील मालेगाव मध्ये 75 मि.मी पाऊस झाला आहे. अमरावती विभागात आतापर्यत सरासरी 562 मि.मी.पाऊस झाला असून मागील 24 तासात सरासरी 28 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.             विभागातील जिल्हानिहाय आज झालेला आणि आतापर्यंतचा पाऊस पुढीलप्रमाणे. अमरावती 22 (626) मि.मी., अकोला 31 (558), यवतमाळ 17 (572), बुलडाणा 47 (483), वाशिम 24 (571) मि.मी. पाऊस झाला आहे.             अमरावती विभागाचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 779.9 मि.म

Image
जलयुक्त शिवार अभियानाला गती देण्यासाठी ग्रामपंचायत ने पुढाकार घ्यावा पोरगव्हाण जलयुक्त शिवार कामांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी * एकदरा ग्रामस्थांशी साधला संवाद           अमरावती, दि. 27 : जलयुक्त शिवार अभियानाला गती देण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केले. वरुड तालुक्यातील पोरगव्हाण या गावात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या विविध कामांची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर एकदरा गावास भेट देवून तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, वरुडचे तहसिलदार आशिष बिजवल, गटविकास अधिकारी बोपटे, जि.प.सभापती गिरीश कराड, एकदराचे सरपंच रामभाऊ गायधणे आदी उपस्थित होते.           यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पोरगव्हाण ये थील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याची पाहणी केली. या गावात लोकसहभागातून जलसंधारण, विहिर पुनर्भरण, पांदण रस्ते, आरोग्य सुविधा, स्वच्छतेची कामे, महिला सबलिकरण, बेरोजगारांना रोजगार आदी सर्व कामांचे नियोजन करण्यात आले असुन मा. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधुन ही कामे करण्यात येणार आहेत.       
अमरावती जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात  69.20 टक्के जलसाठा         अमरावती, दि.27 : अमरावती जिल्ह्यात एक उर्ध्व वर्धा हा मोठा प्रकल्प, शहापूर, चंद्रभागा, पूर्णा आणि सपन हे चार माध्यम प्रकल्प आणि 77 लघु प्रकल्प असे एकुण 82 सिंचन प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांची उपयुक्त पाणी साठा क्षमता 905.15 द.ल.घ.मी. आहे. दि.27 जुलै, 16 पर्यंत जिल्ह्यात 604 मि.मी. पाऊस झाला आहे. सध्या या सर्व प्रकल्पामध्ये 69.20 टक्के म्हणजे 626.37 द.ल.घ.मी. पाणी साठा निर्माण झाला आहे.             खबरदारी उपाययोजना म्हणून पुर्ण प्रकल्पाचे 3 गेट 10 सें.मी. नी उघडण्यात  आले आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या सांडव्यावरुन 13.45 घ.मी.प्र.से. पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सपन प्रकल्पाचे 4 गेट 10 सें.मी. ने उघडल्यामुळे 8.72 घ.मी.प्र.से. विसर्ग सुरु आहे.             उर्ध्व वर्धा प्रकल्पात 76.32 टक्के, शहानुर 67.16 टक्के, चंद्रभागा 54.23 टक्के, पुर्णा 46.20 टक्के, सपन 64.27 टक्के आणि 77 लघु प्रकल्पात 56.41 टक्के भरले आहे. 00000 वृत्त क्र.765                                                        दिनांक 27-7-2016 अमराव
अचलपूर व अमरावती येथून 60 हजार रुपयाचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू जप्त * अन्न व औषध प्रशासनाची कार्यवाही           अमरावती दि.26 - अन्न व औषध प्रशासन, अमरावती कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी विश्वजित शिंदे, रा.श्री.वाकडे व नि.रा.ताथोड यांनी दि.25 जुलै, 16 रोजी अचलपूर येथील देवडी परिसरात अब्दुल अबीद अन्सारी व साजीद खान या व्यक्तींकडून तसेच अमरावती येथील रतनगंज येथे सय्यद जब्बार सय्यद अन्वर या व्यक्तींकडून एकूण 60 हजार रुपये किंमतीचा गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू हा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा जप्त केला. प्रतिबंधित साठा विक्रीसाठी साठविल्याचे आढळल्यामुळे हा साठा अन्न सुरक्षा मानदे कायद्यांतर्गत जप्त करण्यात आला.             तपास झाल्यानंतर संबंधित व्यक्तींवर मा.न्यायालयात खटले दाखल करण्यात येणार आहे. ही कार्यवाही पदावधित अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त (अन्न) मि.श.देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 00000 वृत्त क्र.760                                                         दिनांक 26-7-2016 अमरावती जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात  65.68 टक्के जलस