Monday, July 11, 2016


कै.वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष
किशोर तिवारी (राज्यमंत्री दर्जा) यांचा दौरा कार्यक्रम
* 13 जुलै रोजी घुईखेड येथे सुलभ पीक कर्ज अभियान
अमरावती दि 11 : कै.वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी (राज्यमंत्री दर्जा) हे दि.13 जुलै, 16 रोजी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असुन त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
दि.13 जुलै, 16 रोजी सकाळी 11 वाजता नागपूरवरुन घुईखेड ता.चांदूर रेल्वे कडे प्रयाण. दुपारी 2 वाजता घुईखेड ता.चांदूर रेल्वे येथे स्टेट बँक ऑफ इंडिया समोर सुलभ पीक कर्ज अभियान कार्यक्रमाला उपस्थित राहतील. या कार्यक्रमाला आ.विरेंद्र जगताप, जि.प. सदस्य प्रविण घुईखेडकर व जिल्हाधिकारी किरण गित्ते उपस्थित राहतील. मागील एप्रिल महिन्यात घुईखेड येथे घेण्यात आलेल्या सरकार आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये मांडलेल्या समस्यांवर झालेल्या पाठपुरावाबाबत संबंधित अधिकारी उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी बाभुळगावाला रवाना होतील.
00000
वाघ/गावंडे/दि.11-07-2016/17-55 वाजता


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...