जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात 60.76 टक्के पाणी साठा

       अमरावती, दि. 23 : गुरुवारी झालेल्या पावसाने अमरावती जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची पातळी वाढविण्यास मदत केली आहे. जिल्ह्यातील एक मोठा, 4 मध्यम आणि  77 लघु अशा एकुण 82 सिंचन प्रकल्पांमध्ये 60.76 टक्के पाणी साठा झालेला आहे. या प्रकल्प क्षेत्रात आतापर्यत 532 मि.मी. झालेल्या पावसाच्या आधारे सिंचन प्रकल्पांनी ही पातळी गाठली. उर्ध्व वर्धा प्रकल्पात प्रत्यक्ष 358.05 द.ल.घ.मी पाणी साठा आहे. मागील वर्षी प्रकल्पातील पाणी साठा 49.95 टक्के होता.
जिल्ह्यातील मोठा प्रकल्प उर्ध्व वर्धाची प्रकल्पीय संकल्पीत क्षमता 564.05 द.ल.घ.मी. इतकी असुन प्रकल्पात आजवर 358.05 द.ल.घ.मी. पाणी साठा उपलब्ध आहे. चार मध्यम प्रकल्पात 56.13 टक्के तथा 77 लघू प्रकल्प 56.41 टक्के पाणी साठा आहे. जिल्ह्यातील मोठा, चार मध्यम व 77 लघु प्रकल्पा या सर्व प्रकल्पाची उपयुक्त पाणी साठा क्षमता 905.15 द.ल.घ.मी. आहे. जिल्ह्यात 23 जुलै 16 पर्यत प्रत्यक्ष 510.2 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या सरासरी नुसार प्रकल्पांमध्ये 60.76 टक्के म्हणजे 550.01 द.ल.घ.मी. पाणी साठा निर्माण झाला आहे. मोठ्या प्रकल्पासोबतच जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प शहानूर मध्ये 64.68 टक्के, चंद्रभागा 51.59 टक्के, पूर्णा 37.80 टक्के, सपन 67.59 टक्के पाणी साठा आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या पावसामुळे पूर्णा मध्यम प्रकल्पाची पाणी पातळी वाढल्याने प्रकल्पाचे तीन गेट 10सेंमी उघडण्यात आले असुन सांडव्या वरुन 12.79 घ.मी.प्र. सें पाण्याचा विसर्ग झाला.  
00000
वृत्त क्र.748                                                          दिनांक 23-7-2016

अमरावती विभागात आतापर्यत 461.8 मि. मी. पाऊस
24 तासात सारसरी 28.3 मि. मी.
       अमरावती, दि. 23 : अमरावती विभागात आतापर्यत सरासरी 461.8 मि. मी. पाऊस झाला असुन मागील 24 तासात सरासरी 28.3 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.  
अमरावती विभागातील जिल्हानिहाय आज झालेला आणि आतापर्यतचा पाऊस पुढीलप्रमाणे. अमरावती 19.9 (510.2) मि. मी., अकोला 12.2 (454) मि. मी., यवतमाळ 31.7 (512.1) मि. मी. बुलढाणा 9.8 (352.3) आणि वाशिम जिल्ह्यात 68.2 (480.2) मि. मी. पाऊस झाला आहे.
अमरावती विभागाचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 779.9 मि. मी. आहे. आतापर्यत सरासरीच्या 59.4 टक्के म्हणजे 461.8 मि. मी. पाऊस झाला आहे.   
                                                          00000


वृत्त क्र.749                                                          दिनांक 23-7-2016
धारणी तालुक्यात सर्वाधिक 722.2 मि. मी. पाऊस
अमरावती जिल्ह्यात 510.2 मि. मी
       अमरावती, दि. 23 : काही दिवसाच्या प्रतिक्षेनंतर शुक्रवारी जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्याचे नंदनवन समल्या जाणाऱ्या मेळघाटात पावसाने तेथील वातावरण रम्य आणि मनमोहक केले आहे. काही दिवसापूर्वी मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद घेण्यात आली. तर शुक्रवारी झालेल्या पावसानंतर परिस्थिती बदलल्याने जिल्ह्यातील धारणी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद घेण्यात आली. येथे आतापर्यत 722.2 मि. मी. पाऊसाची नोंद झाली आहे  
            जिल्ह्यात अमरावती तालुक्यात 401.3, भातकुली 355.4, नांदगांव खंडेश्वर 401.1, चांदुर रेल्वे 432.5, धामणगांव रेल्वे 483.2, तिवसा 572.8, मोर्शी तालुक्यात 682.2 मि. मी. वरुड 376.9, अचलपुर 526.3, चांदुर बाजार 493.9, दर्यापुर 518.6, अंजनगांव सुर्जी 487.8, चिखलदरा 688 मि. मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यत सरासरी 510.2 मि. मी. पाऊस झाला असुन 62.6 टक्के आहे.  
            आज दिवसभरात प्रत्यक्ष पावसाची नोंद पुढीलप्रमाणे. धारणी तालुक्यात 23 जुलै 16 रोजी सर्वाधिक 85.4 मि. मी. पाऊस झाला आहे. मोर्शी तालुक्यात 49.1, अमरावती 29, चांदुर रेल्वे 2.6, चिखलदरा 3.2, चांदुर बाजार 25, धामणगाव रेल्वे 5.2, वरुड 7, भातकुली 16.6, दर्यापुर 36, अंजनगांव सुर्जी 2, नांदगांव खंडेश्वर 3 आणि तिवसा तालुक्यात 14.2 मि. मी. प्रत्यक्ष पाऊस पडला. अचलपुर तालुक्यात शुक्रवारी  पाऊस निरंक होता.

00000

काचावार/कोल्हे/राजपुत/दि. 23-07-2016-16.07

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती