Friday, July 15, 2016

अमरावती जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात
 53.72 टक्के जलसाठा

       अमरावती, दि.15 : अमरावती जिल्ह्यात एक उर्ध्व वर्धा हा मोठा प्रकल्प, शहापूर, चंद्रभागा, पूर्णा आणि सपन हे चार माध्यम प्रकल्प आणि 77 लघु प्रकल्प असे एकुण 82 सिंचन प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांची उपयुक्त पाणी साठा क्षमता 905.15 द.ल.घ.मी. आहे. दि.15 जुलै, 16 पर्यंत जिल्ह्यात 461 मि.मी. पाऊस झाला आहे. सध्या या सर्व प्रकल्पामध्ये 53.72 टक्के म्हणजे 486.21 द.ल.घ.मी. पाणी साठा निर्माण झाला आहे.
            खबरदारी उपाययोजना म्हणून पुर्ण प्रकल्पाचे 9 गेट 10 सें.मी. नी उघडण्यात  आले आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या सांडव्यावरुन 37.60 घ.मी.प्र.से. पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सपन प्रकल्पाचे 4 गेट 10 सें.मी. ने उघडल्यामुळे 8.72 घ.मी.प्र.से. विसर्ग सुरु आहे.
            उर्ध्व वर्धा प्रकल्पात 53.81 टक्के, शहानुर 58.71 टक्के, चंद्रभागा 46.88 टक्के, पुर्णा 37.29 टक्के, सपन 64.27 टक्के आणि 77 लघु प्रकल्पात 54.69 टक्के भरले आहे.
00000
वृत्त क्र.723                                                         दिनांक 15-7-2016
अमरावती विभागातील सिंचन प्रकल्पात
35.77 टक्के जलसाठा
       अमरावती, दि.15 : अमरावती विभागात 9 मोठे प्रकल्प, 23 मध्यम प्रकल्प आणि 448 लघु प्रकल्प असे एकुण 480 सिंचन प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पाची उपयुक्त पाणी साठा क्षमता 3205.11 द.ल.घ.मी. आहे. दि.15 जुलै, 16 पर्यंत विभागात 408 मि.मी. पाऊस झाला आहे. सध्या या सर्व प्रकल्पामध्ये 35.77 टक्के म्हणजे 1144.30 द.ल.घ.मी. पाणी साठा निर्माण झाला आहे.
            मोठे प्रकल्पात अमरावती जिल्हा उर्ध्व वर्धा प्रकल्पात 53.81 टक्के, यवतमाळ जिल्हा-पुस प्रकल्प 37.51 टक्के, अरुणावती 26.82 टक्के, बेंबळा 23.85 टक्के, अकोला जिल्हा-काटेपूर्णा 11.64 टक्के, वाण 64.28 टक्के, बुलडाणा जिल्हा -नळगंगा 12.32 टक्के, पेणटाकळी 7.44 टक्के, खडकपूर्णा 00 टक्के, साठा निर्माण झाला आहे.
            मध्यम प्रकल्पात अमरावती जिल्हा - शहानूर 58.71 टक्के, चंद्रभागा 46.88 टक्के, पूर्णा 37.29 टक्के, सपन 64.27 टक्के. यवतमाळ जिल्हा - अधरपुस 52.44 टक्के, सायखेडा 100 टक्के, गोकी 62.44 टक्के, वाघाडी 44.65 टक्के, 67.62 टक्के, नवरगांव 66.11 टक्के. अकोला जिल्हा - निर्गूणा 15.36 टक्के, मोर्णा 12.81 टक्के, ऊमा 16.78 टक्के, अडाण 28.58 टक्के. वाशिम जिल्हा - सोनल 1.48 टक्के, एकबुर्जी 15.29 टक्के. बुलडाणा जिल्हा - ज्ञानगंगा 23.28 टक्के, पलढग 12.12 टक्के, मस 51.06 टक्के, कोराडी 7.14 टक्के, मण 30.60 टक्के, तोरणा 24.97 टक्के, उतावळी 30.72 टक्के आणि 448 लघु प्रकल्प 33.62 टक्के भरले आहे.
00000
काचावार/गावंडे/दि.15-7-2016/13-45 वाजता


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...