Friday, July 22, 2016

 महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 अंतर्गत
या वर्षात 31 पोलिस स्टेशनमध्ये 56 गुन्हे दाखल,
825 गोवंश जप्त व 760 किलो मांस जप्त
जिल्हाधिकारी किरण गित्ते
गाय, बैल यांची अवैध वाहतुक, कत्तलची माहिती देण्यासाठी नियंत्रण कक्षाचे नंबर 0721-2551000, 2665041, 2662032, 2662025

       अमरावती, दि. 22 : महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 दि.4 मार्च, 2015 पासुन राज्यात लागु केला आहे. या अधिनियमाच्या तरतुदिनुसार जिल्ह्यात 31 पोलिस स्टेशन अंतर्गत गुन्हे दाखल असुन नागरिकांनी गाय, बैल या गोवंशीय प्राण्यांची अवैधरित्या वाहतुक, कत्तल याबाबतची माहिती प्राप्त झाल्यास नागरिकांनी पोलिस आयुक्त कार्यालयातील नियंत्रण कक्षातील दु.क्र. 0721-2551000, पोलिस अधिक्षक अमरावती (ग्रामीण) कार्यालयातील नियंत्रण कक्ष 0721-2665041, प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचा दु.क्र. 0721-2662032 तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षातील दु.क्र.0721-2662025 या क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केले आहे.
          जिल्हाधिकारी गित्ते यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 दि.4 मार्च, 15 पासुन राज्यात लागु केला आहे. या अधिनियमाच्या जिल्ह्यातील अंमलबजावणीबाबत आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक घेण्यात आली. या बैठकीत पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पोलिस अधिक्षक (ग्रामीण) लखमी गौतम, मनपा आयुक्त हेमंत पवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी वाडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त अमरावती उपस्थित होते. या अधिनियमाच्या अंमजलबजावणी करीता खालील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत.
          जिल्ह्यांतर्गत होणाऱ्या वाहतुकीवर करडी नजर ठेवून अवैध वाहतुक होणार नाही यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग, पोलिस विभाग, पशुसंवर्धन विभाग व महसुल विभाग यांनी संयुक्त कार्यवाही करावी. उपविभागीय अधिकारी यांनी उपविभागस्तरावर तपासणी पथक तयार करावे. त्यामध्ये प्रादेशिक परिवहन विभाग, पोलिस विभाग, पशुसंवर्धन विभाग व महसुल विभाग यामधील अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश करावा.
          बाजारात जनावरांची खरेदी विक्री करतांना त्याबाबतच्या पावत्या संबंधितांकडे असणे आवश्यक आहे. बाजार समितीने याबाबतची तपासणी करुन अवैध गोवंश वाहतुक आढळल्यास पोलिस विभागास सुचित करावे. अवैध वाहतुकीमध्ये पकडलेली जनावरे कोंडवाड्यात न ठेवता गौरक्षण संस्थेला देण्यासंदर्भात महाराष्ट्र शासन राजपत्र दि.4 मार्च, 2015 मधील कलम 7 मधील तरतुदीनुसार कार्यवाही करावी.
नियंत्रण कक्षाचे दुरध्वनी क्रमांक
          नागरिकांना गाय, गायीची वासरे, वळु किंवा बैल या गोवंशीय प्राण्यांची अवैधरित्या वाहतुक, कत्तल याबाबत माहिती प्राप्त झाल्यास याबाबतची माहिती पोलिस आयुक्त कार्यालय नियंत्रण कक्ष दु.क्र.0721-2551000, पोलिस अधिक्षक अमरावती (ग्रामीण) कार्यालयीन नियंत्रण कक्ष दु.क्र.0721-2665041, प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरावती कार्यालय दु.क्र.0721-2662032 तसेच जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्षातील दु.क्र.0721-2662025 वर देण्यात यावी.
          महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 दि.4 मार्च, 2015 पासुन राज्यात लागु केला आहे. या अधिनियमाच्या तरतुदीनुसार जिल्ह्यात करण्यात आलेली कार्यवाही व दाखल गुन्हे याबाबत खालील प्रमाणे माहिती प्रसिद्ध करण्यात येत आहे.
          जानेवारी 2016 पासुन अमरावती (ग्रामीण) जिल्ह्यात केलेली कार्यवाही गुन्हे दाखल असलेल्या पोलिस स्टेशन संख्या 31, प्राण्यांना निर्दयतेने वागविणे दाखल गुन्हे 50, गोवंश मांस गुन्हे 6, गोवंश जप्त जनावरे 825, जप्त मांस 760 किलो, इतर जनावरे 19 अशी कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती पोलिस अधिक्षक लखमी गौतम यांनी बैठकीत दिली.
          पोलिस आयुक्त अमरावती कार्यक्षेत्रात पोलिस मित्रांच्या मदतीने पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये विशेषत: ज्या भागात असा गैरप्रकार चालतो त्या भागात पोलिस मित्रांच्या मदतीने पायी पेट्रोलिंग केली जाते. तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम अंतर्गत सन 2015 मध्ये एकूण 15 गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. तसेच सन 2016 मध्ये 10 गुन्हे नोंद करण्यात आले असुन महाराष्ट्र प्राणी रक्षण सुधारणा अधिनियम 1995 अंतर्गत 2 गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
          प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 86 अंतर्गत विभागीय कार्यवाही दंडसुची (प्रस्तावित/सुधारित) नुसार कत्तलीसाठी गाय, बैल, वळुची अवैध वाहतुक करणे व गोवंश मांस अवैध वाहतुक करणे हे गुन्ह्याचे स्वरुप आहे. पहिला गुन्ह्यासाठी 30 दिवस परवाना निलंबन, दुसरा गुन्हा 60 दिवस परवाना निलंबन, तिसरा गुन्हा परवाना रद्द असल्याची माहिती दिली.
00000

काचावार/गावंडे/सागर/दि.22-07-2016/19-45 वाजता



No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...