शिधावस्तू व केरोसीनचे निर्धारित वाटप जाहीर
अमरावती दि.2: जिल्ह्यातील पुरवठा विभागाचे सर्व पात्र कौटुंबिक शिधापत्रिकाधारकांचे माहे जून, 2016 च्या वितरणाकरिता रास्तभाव दुकानदारांना दि.21 जुन, 2016 पासून धान्याचा पुरवठा सुरु झाला असून रास्तभाव दुकानदारांनी जिल्ह्यातील कार्यरत शिधापत्रिकाधारकांना तातडीने वितरण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
            अंत्योदय कार्ड संख्येनुसार धारकांसाठी  प्रति शिधापत्रिका 20 किलो गहू, 15 किलो तांदूळ वितरित करण्यात येतील. गव्हाचा प्रतिकिलो दर 2 रुपये असून तांदूळ प्रतिकिलो 3 रु. या दराने वितरित करण्यात येईल. प्राधान्य गटातील लाभार्थी संख्येनुसार धारकांसाठी 2 रु. प्रति किलो या दराने प्रति व्यक्ती 3 किलो गहू वितरित करण्यात येणार असुन  3 रु. प्रति किलो तांदुळ या दराने प्रति व्यक्ती 2 किलो तांदुळ वितरित करण्यात  करण्यात येणार आहे तर साखरेचा दर प्रति किलो 13.50 रु. आहे. एपीएल शेतकरी लाभार्थी संख्येनुसार 3 किलो गहु 2 रु.प्रति किलो दराने तर 2 किलो तांदुळ 3 रु.प्रति दराने वितरीत करण्यात येणार आहे.
माहे जून, 2016 करीता अंत्योदय लाभार्थ्यांना प्रतिकार्ड 20 किलो गहू व प्रतिकार्ड 15 किलो तांदूळ तसेच प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती 3 किलो गहु व 2 किलो व एपीएल शेतकरी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती गहू 3 किलो व तांदुळ 2 किलो मंजूर केलेला आहे. माहे जून, 2016 करीता पिवळ्या शिधापत्रिकाधारकांना प्रति माणसी 500 ग्रॅम/ उपलब्धतेनुसार साखरेचे वाटप करण्यात येईल.
शासन निर्णय दि.20 ऑगस्ट, 2015 पासुन शहरी व ग्रामीण भागातील बिगर गॅस शिधापत्रिकासाठी प्रती महा 1 व्यक्तीसाठी 2 लिटर, 2 व्यक्तीसाठी 3 लिटर व 3 व्यक्ती किंवा त्याहुन अधिक व्यक्तीसाठी 4 लिटर केरोसिन उपलब्धतेनुसार देण्यात येईल. 1 गॅस तसेच 2 गॅस जोडणी शिधापत्रिकाधारकास वार्षिक 12 गॅस सिलेंडर सवलतीच्या दराने अनुज्ञेय असल्यामुळे त्यांना केरोसीन देण्यात येणार नाही असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
00000

वृत्त क्र.  657                                                                                              दिनांक 02-07-2016
एन.सी.सी.तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम

            अमरावती दि.2 : वनमहोत्सव अभियानाची शुक्रवार दि.1 जुलै, 2016 रोजी 3 सिग्नल कंपनी तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला. या दिवसाचे औचित्‍य साधुन एन.सी.सी. कॅडेटनी रॅलीने आयोजन केले होते. ही रॅली एन.सी.सी. भवनापासून मालटेकडी पर्यंत काढण्यात आली. एन.सी.सी. कॅडेटनी एक पेड एक जिंदगी जहा हरीयावी वहाँ खुशीहाली अश्या घोषणा देत वृक्षाचे पर्यावरण किती महत्वाचे स्थान आहे. हा संदेश समाजापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. या रॅलीनंतर एन.सी.सी. भवनाच्या परिसरात विविध वृक्षाचे रोपण करण्यात आले व सर्व एन.सी.सी. कॅडेटनी शपथ घेतली की, जिवनात एक झाड अवश्य लावीन व त्याचे संगोपन करील, मी माझ्या मित्रांना व परिवाराला सांगील एक झाड अवश्य लावा जे तुमच्या पिढीला कामी येईल आणि पर्यावरणाचा समतोल साधील.
            या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी 3 सिग्नल कंपनीचे कमाडींग ऑफीसर कर्नल आर.एस.जाधव, ए.एन.ओ. नितीन बन्सोड, ए.एन.ओ. वाटाने, ए.एन.ओ. इंगोले, सुबेदार मेजर एस.के.सिंग, हवालदार नरेंद्र, मोहोर सिंग, मंतेश तुक्कर, नाईक हसन अली, लष्कर पप्पु ठाकुर, सिनीयर कर्ल्क करमसिंग गिल यांचे सहकार्य लाभले.
00000
वाघ/सवाई/दि.07-06-2016/17-00 वाजता


                       

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती