Thursday, July 14, 2016

पुरग्रस्त गावांची पालकमंत्र्यांकडून पहाणी
       अमरावती, दि.13 : जिल्ह्यात झालेल्या संतधार पावसानंतर पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. आज पालकमंत्री प्रविण पोटे यांनी पुरग्रस्त गावांची पहाणी केली. त्यामध्ये भातकुली तालुक्यातील कामनापूर, जावरा, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील भंडारज, जवर्डी, चवसाळा या गावातील पुरग्रस्त भागाची पहाणी केली. यामध्ये जावरा, कामनापूर या गावांच्या मध्यभागी वाहणारे रेणुका नदिमुळे पुर परिस्थितीत गावांचा संपर्क तुटतो अशी माहिती गावकऱ्यांनी दिली. यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते पालकमंत्र्यांसमवेत होते.
          अंजनगाव सुर्जी तालुक्यातील जवर्डी, भंडारज, चवसाळा, हंतोळा या गावात पहाणी केली. यावेळी आ.रमेश बुंदिले, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी उपस्थित होते. यावेळी पुरग्रस्त गावातील नागरीकांशी पालकमंत्र्यांनी संवाद साधुन त्यांच्या अडचणी जाणुन घेतल्या.
00000
वाघ/गावंडे/सवाई/सागर/दि.13-7-2016/19-35 वाजता










No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...