Friday, July 1, 2016


जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण
अमरावती दि 1 : दिवसेंदिवस होत असलेली वृक्षतोड यामुळे वनजमिनींचा नाश होत आहे तसेच त्याचा परिणाम म्हणून दिवसागणिक पावसाचे प्रमाण कमी होत असून राज्याला वारंवार दुष्काळाचा सामना करावा लागत आहे, यावर मात करण्यासाठी अर्थ मंत्री व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 1 जुलै,2016  संपूर्ण राज्यभरात एकाच दिवशी 2कोटी वृक्षलागवडीचा महत्वकांक्षी संकल्पानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयात किरण गित्ते यांच्या हस्ते बचत भवन लगतच्या परिसरात वृक्षरोपणाचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये सर्व अधिकारी, कर्मचारी उत्साहाने शामील झाले होते. तत्पुर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी 200 झाडे लावण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात 200 झाडे लावण्यात आली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर, उपजिल्हाधिकारी रामदास सिध्दभट्टी, जयंत देशपांडे, विनोद शिरभाते व अन्य वरीष्ठ अधिकारी, महसुल विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
00000
वाघ/धकाते/सागर/दि.01-07-2016/वेळ-15-00










No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...