Tuesday, July 26, 2016

अचलपूर व अमरावती येथून
60 हजार रुपयाचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू जप्त
* अन्न व औषध प्रशासनाची कार्यवाही
          अमरावती दि.26 - अन्न व औषध प्रशासन, अमरावती कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी विश्वजित शिंदे, रा.श्री.वाकडे व नि.रा.ताथोड यांनी दि.25 जुलै, 16 रोजी अचलपूर येथील देवडी परिसरात अब्दुल अबीद अन्सारी व साजीद खान या व्यक्तींकडून तसेच अमरावती येथील रतनगंज येथे सय्यद जब्बार सय्यद अन्वर या व्यक्तींकडून एकूण 60 हजार रुपये किंमतीचा गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू हा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा जप्त केला. प्रतिबंधित साठा विक्रीसाठी साठविल्याचे आढळल्यामुळे हा साठा अन्न सुरक्षा मानदे कायद्यांतर्गत जप्त करण्यात आला.
            तपास झाल्यानंतर संबंधित व्यक्तींवर मा.न्यायालयात खटले दाखल करण्यात येणार आहे. ही कार्यवाही पदावधित अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त (अन्न) मि.श.देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
00000
वृत्त क्र.760                                                         दिनांक 26-7-2016
अमरावती जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात
 65.68 टक्के जलसाठा

       अमरावती, दि.26 : अमरावती जिल्ह्यात एक उर्ध्व वर्धा हा मोठा प्रकल्प, शहापूर, चंद्रभागा, पूर्णा आणि सपन हे चार माध्यम प्रकल्प आणि 77 लघु प्रकल्प असे एकुण 82 सिंचन प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांची उपयुक्त पाणी साठा क्षमता 905.15 द.ल.घ.मी. आहे. दि.26 जुलै, 16 पर्यंत जिल्ह्यात 561 मि.मी. पाऊस झाला आहे. सध्या या सर्व प्रकल्पामध्ये 65.68 टक्के म्हणजे 594.46 द.ल.घ.मी. पाणी साठा निर्माण झाला आहे.
            खबरदारी उपाययोजना म्हणून पुर्ण प्रकल्पाचे 3 गेट 10 सें.मी. नी उघडण्यात  आले आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या सांडव्यावरुन 13.58 घ.मी.प्र.से. पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सपन प्रकल्पाचे 4 गेट 10 सें.मी. ने उघडल्यामुळे 10.44 घ.मी.प्र.से. विसर्ग सुरु आहे.
            उर्ध्व वर्धा प्रकल्पात 71.15 टक्के, शहानुर 66.55 टक्के, चंद्रभागा 53.43 टक्के, पुर्णा 39.36 टक्के, सपन 65.05 टक्के आणि 77 लघु प्रकल्पात 56.41 टक्के भरले आहे.
00000



वृत्त क्र.761                                                         दिनांक 26-7-2016
अमरावती विभागातील सिंचन प्रकल्पात
44.91 टक्के जलसाठा
       अमरावती, दि.26 : अमरावती विभागात 9 मोठे प्रकल्प, 23 मध्यम प्रकल्प आणि 448 लघु प्रकल्प असे एकुण 480 सिंचन प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पाची उपयुक्त पाणी साठा क्षमता 3205.11 द.ल.घ.मी. आहे. दि.26 जुलै, 16 पर्यंत विभागात 504 मि.मी. पाऊस झाला आहे. सध्या या सर्व प्रकल्पामध्ये 44.91 टक्के म्हणजे 1439.41 द.ल.घ.मी. पाणी साठा निर्माण झाला आहे.
            मोठे प्रकल्पात अमरावती जिल्हा उर्ध्व वर्धा प्रकल्पात 71.15 टक्के, यवतमाळ जिल्हा-पुस प्रकल्प 55.82 टक्के, अरुणावती 44.07 टक्के, बेंबळा 26.81 टक्के, अकोला जिल्हा-काटेपूर्णा 23.61 टक्के, वाण 68.70 टक्के, बुलडाणा जिल्हा -नळगंगा 12.74 टक्के, पेणटाकळी 13.19 टक्के, खडकपूर्णा 00 टक्के, साठा निर्माण झाला आहे.
            मध्यम प्रकल्पात अमरावती जिल्हा - शहानूर 66.55 टक्के, चंद्रभागा 53.43 टक्के, पूर्णा 39.36 टक्के, सपन 65.05 टक्के. यवतमाळ जिल्हा - अधरपुस 76.76 टक्के, सायखेडा 100 टक्के, गोकी 90.40 टक्के, वाघाडी 69.82 टक्के, बोरगाव 100 टक्के, नवरगांव 99.36 टक्के. अकोला जिल्हा - निर्गूणा 30.92 टक्के, मोर्णा 18.67 टक्के, ऊमा 32.79 टक्के, अडाण 38.17 टक्के. वाशिम जिल्हा - सोनल 19.80 टक्के, एकबुर्जी 54.30 टक्के. बुलडाणा जिल्हा - ज्ञानगंगा 30.12 टक्के, पलढग 17.98 टक्के, मस 62.03 टक्के, कोराडी 22.22 टक्के, मण 43.04 टक्के, तोरणा 28.01 टक्के, उतावळी 45.78 टक्के आणि 448 लघु प्रकल्प 37.33 टक्के भरले आहे.
00000
वृत्त क्र.762                                                         दिनांक 26-7-2016
अमरावती विभागात आतापर्यंत 504 मि.मी.पाऊस
24 तासात सरासरी 18 मि.मी. 
       अमरावती, दि.26 : अमरावती विभागात आतापर्यत सरासरी 504 मि.मी.पाऊस झाला असून मागील मागील 24 तासात सरासरी 18 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
            अमरावती विभागातील जिल्हानिहाय आज झालेला आणि आतापर्यंतचा पाऊस पुढीलप्रमाणे. अमरावती 33 (561) मि.मी., अकोला 10 (491), यवतमाळ 13 (540), बुलडाणा 16 (413), वाशिम 20 (515) मि.मी. पाऊस झाला आहे.
            अमरावती विभागाचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 779.9 मि.मी. आहे. आजपर्यंत सरासरी च्या 65 टक्के म्हणजे 504 मि.मी. पाऊस झाला आहे.
00000
वृत्त क्र.763                                                                      दिनांक 26-7-2016
अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत 561 मि.मी.पाऊस
24 तासात सरासरी 33 मि.मी. 
        अमरावती, दि.26 : अमरावती जिल्ह्यात आतापर्यत सरासरी 561 मि.मी.पाऊस झाला असून मागील मागील 24 तासात सरासरी 33 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
            अमरावती 24 (459), भातकुली 94 (458), नांदगाव खंडेश्वर 46 (467), चांदुर रेल्वे 25 (476), धामणगाव रेल्वे 25 (517), तिवसा 9 (586), मोर्शी 25 (718), वरुड 33 (448), अचलपूर 30 (565), चांदुर बाजार 6 (545), दर्यापूर 14 (562), अंजनगाव सुर्जी निरंक (492), धारणी 105 (837), चिखलदरा 22 (728), मि.मी. पाऊस झाला आहे. (कंसातील आकडेवारी  यावर्षी आतापर्यंतच्या सरासरी  पावसाची आहे.). जिल्ह्यात वार्षिक सरासरी पर्जन्यमान 814.5 मि.मी. आहे. आजपर्यंत सरासरी च्या 69 टक्के म्हणजे 561 मि.मी. पाऊस झाला आहे.
00000

काचावार/कोल्हे/राजपुत/गावंडे/दि.26-07-2016/19-7 वाजता

No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...