पालकमंत्री प्रविण पोटे 13 ते 16 जुलै रोजी   
अमरावती जिल्हा दौऱ्यावर
          अमरावती, दि.12 : अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग, खनिकर्म, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळुन) राज्यमंत्री प्रविण पोटे हे दि.13 ते 16 जुलै, 16 पर्यंत अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा तपशिल दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
          दि.13 जुलै, 16 रोजी सकाळी 8 वाजता राठीनगर निवासस्थान येथे आगमन. सकाळी 11 वाजता भाजपा विद्यापिठ मंडळ अमरावती शहर कार्यकर्ता मेळावा. दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी अमरावती यांच्या सोबत चर्चा व अतिवृष्टी व पुरग्रस्त भागाची पहाणी.
          दि.14 जुलै, 16 रोजी सकाळी 11 वाजता केम प्रकल्पाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक. दुपारी 1 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व अभ्यागतांना भेटी. दुपारी 4 वाजता भाजपा कार्यालय राजापेठ येथे भेट. सायं.5 वाजता स्थानिक विविध कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 8 वाजता शासकीय विश्रामगृह येथे भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा.
          दि.15 जुलै, 16 रोजी दुपारी 12 वाजता निवासस्थानावरुन मोटारीने चिखलदराकडे प्रयाण. दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृह, चिखलदरा येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वाजता भारतीय जनता पार्टी प्रशिक्षण वर्गाच्या समारंभास उपस्थिती. सायं.7 वाजता चिखलदरा येथुन अमरावतीकडे आगमन व राठीनगर येथे मुक्काम.
          दि.16 जुलै, 16 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील पीक कर्ज कार्यशाळेला उपस्थिती. दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृहावर आगमन व अभ्यागतांना भेटी. सायं.5 वाजता निवासस्थानी आगमन व राखीव. सायं.7-15 वाजता शासकीय वाहनाने बडनेरा रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. सायं.7-57 वाजता विदर्भ एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
00000
वाघ/गावंडे/दि.12-7-2016/17-58 वाजता


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती