8 ऑॅगस्ट पासुन मानसेवी होमगार्ड सदस्य नोंदणी
* होमगार्ड संघटनेत दाखल व्हा व देश सेवा करा
          अमरावती दि.26 - जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयाच्या वतीने पुरुष/महिला होमगार्ड सदस्य नोंदणी दि. 8 ऑॅगस्ट 2016 पासुन दि. 10 ऑॅगस्ट 2016 पर्यत काँग्रेस नगर रोड अमरावती येथील प्रशिक्षण केंद्र होमगार्ड येथे करण्यात येणार आहे. 8 ऑॅगस्ट 2016 रोजी सकाळी 8 वाजल्यापासुन नोंदणीस सुरुवात होईल. उमेदवार हा 10 वीं उर्त्तीण, वय वर्ष 20 ते 50 पर्यत, उंची पुरुषांकरीता 162 से.मी. व महिला करीता 150 सें.मी., संबंधित उमेदवारास निर्धारित केलेल्या वेळेत धावणे व गोळाफेक शारीरिक चाचणी घ्यावी लागेल. धावणे पुरुषांसाठी 1600 मी. व महिलांसाठी 800 मी., नोंदणी चाचणी करीता येणाऱ्या उम्मेदवारांनी मुळ प्रमाणपत्र सोबत आणावे. चुकीचे प्रमाणपत्र आढळल्यास नोंदणी प्रवेश रद्द करण्यात येईल. उमेदवारास नोंदणी वेळी स्व:खर्चाने यावे लागेल. नोंदणीच्या वेळी कोणतीही अपघाती घटना घडल्यास उम्मीदवार स्वत: जबाबदार राहील.
            उमेदवाराची निवड पुर्णपणे गुणवत्तेवर करण्यात येईल. खेळाडू, एनसीसी प्रमाणपत्रधारक, माजी सैनिक, वाहन चालक, तांत्रिक प्रमाणपत्रधारक उम्मेदवार तसेच शासकीय/निमशासकीय प्रमाणपत्र तसेच पोलीस चारित्र्य पडताळणी अहवाल, वैद्यकिय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
जिल्ह्यामध्ये एकुण 162 अनुशेष शिल्लक आहे. होमगार्ड संख्या अचलपुर मध्ये 00 पुरुष, 19 महिला, अमरावती मध्ये 21 पुरुष, 16 महिला, दर्यापूर मध्ये 3 पुरुष 18 महिला, मोर्शी 23 पुरुष 17 महिला, धारणी 6 पुरुष 7 महिला, चांदुर रेल्वे 15 पुरुष 17 महिला, असे एकुण 68 पुरुष व 94 महिला होमगार्डचा नोंदणी अनुशेष असल्याने अधिक माहितीकरिता जवळच्या तालुका होमगार्ड कार्यालयाशी संपर्क साधावा. उमेदवारांनी भरलेले अर्ज दि. 1 ऑॅगस्ट पर्यत तालुका कार्यालयात जमा करावे नाव नोंदणी नि:शुल्क करण्यात येईल. उमेदवाराने कोणत्याही अपप्रचार/प्रलोभनास बळी पडु नये, असे आवाहन जिल्हा समादेशक होमगार्ड एम. ए. मकानदार तथा, अपर पोलीस अधिक्षक यांनी केले आहे. 
00000

वृत्त क्र. 757                                                               दिनांक 26-07-2016
परिवहन संवर्गातील वाहनांनी 31 जुलै पर्यंत वेगनियंत्रक बसविण्याचे
प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन
       अमरावती, दि.26 : केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या कलम 118 च्या पोटनियम (2) नुसार परिवहन वाहनांना वेगनियंत्रक बसविण्याबाबत तरतुद आहे. अशा वाहनांनी ज्यांची दि.1 ऑक्टोबर, 2015 पुर्वी नोंदणी झाली असुन त्यांना वेगनियंत्रक (वेग नियंत्रक यंत्र किंवा वेग मर्यादा यंत्रणा) बसविलेले नाहित आणि केंद्रीय मोटार नियम 1989 मधील नियम 118 च्या पोटनियम (1) अंतरर्भूत होत नाहीत अशा वाहनांना दि.31 जुलै, 16 रोजी किंवा त्यापुर्वी वेगनियंत्रक बसविण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे. वेळोवेळी सुधारण केल्यानुसार तसेच मानक एआएएस:18/2001 नुसार खाली नमुद असल्याप्रमाणे कमाल पुर्वनिर्धारित वेगमर्यादेचा वेग नियंत्रक (वेग नियंत्रक यंत्र किंवा वेग मर्यादा यंत्रणा) अनिर्वाय करण्यात आलेली आहे.
            सर्व स्कुल बसेसची कमाल वेग मर्यादा प्रती तास 40 कि.मी., घातक वस्तू वाहुन नेणारी परिहवन संवर्गातील वाहनांची कमाल वेग मर्यादात 60 कि.मी.प्रती तास, डंपर्स आणि टँकर्स या वाहनांची कमाल वेग मर्यादा 60 कि.मी.प्रती तास तसेच वरील वाहनांच्या प्रकारात मोडत नसलेली परिवहन संवर्गातील वाहनांची वेग मर्यादा 80 कि.मी. प्रती तास.
            दुचाकी वाहने, तीन चाकी वाहने, क्वाड्री सायकल, प्रवासी व त्याचे सामान वाहुन नेण्यासाठी उपयोगात आणलेली चारचाकी वाहने, ज्यांची आसन क्षमता चालकास धरुन 8 पेक्षा जास्त नसेल आणि त्याचे एकूण स्थूल वजन 3500 कि.ग्रॅ.पेक्षा जास्त नसेल (M1 संवर्गातील वाहने), अग्निशामक वाहने, रुग्णवाहिका, पोलिस विभागाची वाहने, नियम 126 मध्ये विहित केलेल्या तपासणी संस्थेने सत्यप्रती व प्रमाणित केलेल्या ज्याचा वेग 80 कि.मी.प्रती तास पेक्षा अधिक नसेल अशी वाहनांना वेग नियंत्रकामधून सुट देण्यात आलेली आहे.
            शासनाने दि.21 जुन, 16 रोजी परिवहन संवर्गातील दि.1 ऑक्टोबर, 15 पुर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना वेग नियंत्रक लावण्याबाबत अधिसुचना काढून वेगनियंत्रक बसविण्याकरीता दि.31 जुलै, 16 र्पंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तेव्हा वरील अधिसुचनेनुसार परिवहन संवर्गातील परिवहन वाहनांना दि.31 जुलै, 16 रोजी किंवा त्यापुर्वी वेगनियंत्रक बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे याची संबंधित सर्व वाहनधारकांनी नोंद घ्यावी असे प्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती यांनी कळविले आहे.
00000
वृत्त क्र. 758                                                                दिनांक 26-07-2016
स्वाईन फ्ल्यू व नियंत्रण संदर्भातील मार्गदर्शक सुचना
खबरदारी घेण्याचे जिल्हा शल्य चिकित्सक राऊत यांचे आवाहन
       अमरावती, दि.26 : अकोला जिल्ह्यामध्ये भंडारज व बार्शिटाकळी येथे स्वाईन फ्ल्यु चे काही रुग्ण नव्याने आढळून आल्याचे वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाले आहे. या पार्श्वभूमिवर जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती मार्फत नियंत्रण व उपायोजना करण्यात आल्या असुन त्याचा जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अरुण राऊत यांनी केली आहे.
            ते म्हणाले की, अमरावती जिल्ह्यामध्ये स्वाईन फ्ल्यु रुग्णाचे उपचाराकरीता 56-प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये, 4-उपजिल्हा/ग्रामीण रुग्णालये-9, महानगर पालिके अंतर्गत-3 असे एकूण 73 स्क्रिनिंग सेंटर सुरु करण्यात आलेले आहे. या स्क्रिनिंग सेंटरमध्ये स्वाईन फ्ल्यु रुग्णाच्या उपचाराकरीता टॅमी फ्ल्यु गोळ्या उपलब्ध आहे.
            जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये विशेष विलगीकरण कक्ष क्रमांक 9 निर्माण करण्यात आला असुन त्या कक्षाची जबाबदारी नाक, कान, घसा तज्ज्ञ व फिजीशियन यांचेकडे सोपविण्यात आलेली आहे. या कक्षामध्ये 5 खाटा दुषित रुग्णासाठी व 5 खाटा संशयित रुग्णासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहे. तसेच अत्यावश्यक सुविधा म्हणून व्हेंटिलिटर व ऑक्सीजन सिलेंडरची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
            संशयित स्वाईन फ्ल्यु रुग्णाचे थ्रोट स्वॉब नाक, कान, घसा तज्ज्ञामार्फत घेतले जावून खास दुतामार्फत जि.एम.सी. नागपूर येथे तपासणीकरीता पाठविण्यात येते.
            जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये टॅमी फ्ल्यु गोळ्या, व्हीटीएम किट, पीपीई किट, एन 95 मास्क व ऑर्डनरी मार्कस्‍ पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे.
जनतेला आवाहन
आरोग्य शिक्षण
        सध्या आढळून येते असलेल्या स्वाईन फ्ल्यु केसेस पाहता सर्वसामान्य जनतेसाठी वैयक्तीक पातळीवरील स्वाईन फ्ल्यु प्रतिबंधाच्या महत्वपुर्ण उपययोजना नव्याने सांगणे आवश्यक आहे.
            आरोग्य सेवक, सेविका, आरोग्य पर्यवेक्षक, वैद्यकिय अधिकारी यांनी आपआपल्या क्षेत्रिय भेटीत शाळा, आश्रम शाळा, वसतीगृहे आणि गरोदर माता यांचे कडे विशेष लक्ष देण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहे.
निकटसहवासितांचा शोध व उपचार
            स्वाईन फ्ल्यु अधिशयन कालावधी हा 1 ते 7 दिवसाचा आहे. स्वाईन फ्ल्यु रुग्णामध्ये लक्षणे आढळून येण्याच्या 1 दिवस आधी पासून ते लक्षणे आढळल्यानंतर पुढील 7 दिवसापर्यंत स्वाईन फ्ल्यु चा रुग्ण निकट सहवासितांमध्ये संसर्गसंक्रमीत करु शकतो. त्यामुळे या कालवधित स्वाईन फ्ल्यु बाधित रुग्णाच्या प्रत्यक्ष सहवासात आलेल्या निकट सहवासितांचा शोध घे-ण्यात येतो.
            ज्या निकट सहवासितांमध्ये इन्फ्ल्युएंन्झा सदृश्य लक्षणे आढळतील त्यांना तातडीने कॅप्सुल टॅमी फ्ल्यु उपचारात्मक मात्रेत सुरु करावी.
            ज्या निकट सहवासितांमध्ये कोणतेही लक्षणे नाही त्यांचे पुढील 10 दिवस बारकाईने निरिक्षण केले जाते. या कालावधीत ज्यांना इन्फ्ल्युएंझा सदृश्य लक्षणे आढळतील त्यांना टॅमी फ्ल्यु गोळ्या उपचारात्मक मात्रा पुर्ण कालावधीसाठी देण्यात येते.
            ज्या निकट सहवासितांना वरील कालावधीत फ्ल्युची लक्षणे आढळणार नाही त्यांना टॅमी फ्ल्यु गोळ्या देण्यात येत नाही.
स्वाईन फ्ल्यु टाळण्यासाठी हे करा
            वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवा, पौष्टिक आहार घ्या, लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या या सारख्या आरोग्यदायी पदार्थाचा आहारात वापर करा, पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या, भरपूर पाणी प्या, शिंकतांना/खोकतांना तोंडावर रुमाल धरावा.
स्वाईन फ्ल्यु टाळण्यासाठी हे करु नका
            हस्तांदोलन, सार्वजनिक ठिकाणी थुंकु नका, डॉक्टरांच्या सल्याशिवाय औषध घेवू नका, आपल्या फ्ल्यु सदृश्य लक्षणे असतील तर गर्दीच्या ठिकाणी जावू नका.
            वरील प्रकारे मार्गदर्शक सुचनांचा सुयोग्य उपयोग करुन स्वाईन फ्ल्यु प्रतिबंध व नियंत्रणासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अरुण राऊत यांनी कळविले आहे.
00000

काचावार/कोल्हे/राजपुत/गावंडे/दि.26-07-2016/19-05 वाजता

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती