Friday, July 8, 2016

रविंद्र ठाकरे यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी
समितीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला
अमरावती, दि.8 :   विभागीय आयुक्त कार्यरत असलेले उपायुक्त रविंद्र ठाकरे यांनी आज विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समीतीचे अध्यक्ष म्हणुन पदभार स्वीकारला. 7 जुलै रोजीच्या महसुल व वनविभागाच्या शासन निर्णयानुसार अप्पर जिल्हाधिकारी या संवर्गात त्यांची पदोन्नतीने पदस्थापना अध्यक्ष जात प्रमाणपत्र पडताळणी समीती या रिक्त पदावर करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन त्यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी उपायुक्त बि. डी खंडाते व अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
0000000

वाघ/सवाई/दि. 08-07-2016/वाजता 4-10 वाजता

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...