संत गाडगेबाबा विद्यापिठात वृक्ष लागवड करुन
पालकमंत्र्यांच्या हस्ते वनमहोत्सवाचा शुभारंभ
* दुपारी 1 वाजेपर्यंत जिल्ह्यात 5 लक्ष वृक्ष लागवड
* जलयुक्त शिवारच्या 250 गावात 1 लक्ष 80 हजार झाडे लावली
* वृक्ष संवर्धनासाठी मोर्शीत दिड लाख रुपये जमा
* विद्यापिठात 2016 वृक्ष लागवड करणार

अमरावती दि 1 : राज्यात दि.1 ते 7 जुलै, 16 पर्यंत वनमहोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त पालकमंत्री प्रविण पोटे यांच्याहस्ते संत गाडगेबाबा विद्यापिठाच्या परिसरात वृक्ष लागवड करुन शुभारंभ करण्यात आला.
 यावेळी खा.आनंदराव अडसुळ, आ.बच्चु कडू, जिल्हाधिकारी किरण गित्ते, नगरसेविका वैशाली झटाले, कुलगुरु डॉ.मुरलीधर चांदेकर, कुलसचिव डॉ. अजय देशमुख, माजी कुलगुरु व्हि.एस.सपकाळ, प्र.कुलगुरु जयकिरण तिडके, मुख्य वनसंरक्षक संजिव गौड, उपमुख्य वनसंरक्षक निनु सोमराज, उपसंचालक सामाजिक वनीकरण प्रदिप मसराम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अरुण राऊत आदी उपस्थित होते.
पोटे म्हणाले, विद्यापिठाचा भव्य परिसर आहे त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणावर प्राणवायू घेण्यासाठी येतात. शासनाकडून अन्न, वस्त्र, निवारा या प्रमुख गरजा पुर्ण करण्यासाठी दिशा मिळत आहे. गाडगेबाबांनी साक्षरता व वनीकरणाचा संदेश दिला. राज्यात वृक्ष लागवडीची चळवळ सुरु आहे. सर्वांनी या चळवळीत भाग घेण्याचे आवाहन केले.
खा.आनंदराव अडसुळ म्हणाले, वृक्षाचे अजन्म नाते आहे. 11 कोटी राज्याची लोकसंख्या आहे. प्रत्येक कुटुबांनी एक झाड लावल्यास उद्दिष्ट पुर्ण होईल.
कुलगुरु डॉ.मुरलीधर चांदेकर म्हणाले, वृक्षारोपण ही जागतिक गरज आहे. विद्यापिठाची 450 एकर जमीन व तरुण मनुष्यबळ व 25 हजार राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) विद्यार्थी विद्यापिठाकडे आहेत. या मनुष्यबळाचा वापर महसुल विभागाच्या सहकार्याने अमरावती विभागातील 70 टक्के रिकाम्या जागेवर वृक्ष लागवडीची सामुहिक चळवळ राबवू असे सांगून विद्यापिठ परिसर संपुर्ण हरित करण्यासाठी 2016 वृक्ष लागवड करणार असल्याचे सांगितले.
दुपारी 1 वाजेपर्यंत 5 लक्ष वृक्ष लागवड - जिल्हाधिकारी
 जिल्हाधिकारी किरण गित्ते म्हणाले, दोन कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात अमरावती जिल्ह्यात 4 लक्ष 80 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असतांना दुपारी 1 वाजेपर्यंत जिल्ह्यात 5 लक्ष वृक्ष लागवड करुन उद्दिष्टपुर्ती केली आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत 3 लक्ष 63 हजार झाडे लावण्यात आली होती. या सर्व झाडाचे संवर्धन करण्यासाठी 200 झाडामागे 1 मजुर तसेच तार कुंपण करुन वृक्षाचे जतन करण्यात येईल.
जलयुक्तच्या 250 गावात 1 लाख 80 हजार झाडे
 गित्ते म्हणाले, जिल्ह्यात 250 गावात मागील वर्षी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामे घेण्यात आली होती. या सर्व गावातील नाला सरळीकरण, नदी-नाले खोलिकरणाच्या जागेवर अशा 250 गावात 1 लक्ष 80 हजार वृक्ष लावगड करण्यात आली. या शिवाय शहरातही मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड घेण्यात येत आहे. वृक्ष संवर्धनासाठी लोकसहभाग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मोर्शी येथे वृक्ष संवर्धन समिती स्थापन करण्यात आली असुन दिड लक्ष रुपये लोकसहभागातून जमा झाले आहे. यातून किमान 75 टक्के तरी वृक्षाचे जतन होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. राज्यात 50 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आगामी काळात घेण्यासाठी लोकचळवळीची आवश्यकता आहे. राज्य शासन जलयुक्त शिवारानंतर वनयुक्त शिवार अभियान राबविणार असुन पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक झालेले जलयुक्त व वनयुक्त अभियान यशस्वीपणे राबवू असा विश्वास व्यक्त केला. आगामी काळात विद्यापिठ 25 हजार एनएसएस च्या विद्यार्थ्यामार्फत अमरावती विभागातील 70 टक्के रिकाम्या जागांवर वृक्ष लागवडीचा मानस व्यक्त केला त्याबद्दल धन्यवाद दिले. राज्यात 1950 पासून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम सुरु आहे. वृक्ष संवर्धनाची काळजी न घेतल्यामुळे तसेच वृक्ष तोडीवर टिका न झाल्यामुळे आपली ही अवस्था झाली आहे.
 प्र.कुलगुरु अजय देशमुख म्हणाले, हे 2016 चे वर्ष आहे या निमित्त विद्यापिठ परिसरात 2016 वृक्ष लागवडीचा कुलगुरुंनी केलेला संकल्प पुर्ण करु.   
मुख्य वनसंरक्षक संजिव गौड म्हणाले, पालकमंत्री पोटे यांचे मार्गदर्शन व जिल्हाधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे वृक्ष लागवड चळवळीस मोठा सहभाग मिळत आहे. बार असोसिएशनसह एनएसएस आदी संस्था पुढे येत आहे. सर्वांनी श्रमदानाऐवजी श्रमअर्पण करण्याचे आवाहन केले.
विद्यापिठ परिसरात 151 झाडे
 यावेळी विद्यापिठ परिसरात पालकमंत्री पोटे यांच्यासह खा.आनंदराव अडसुळ, कुलगुरु डॉ.मुरलीधर चांदेकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्यासह विद्यापिठातील सर्व विभाग प्रमुख व विद्यार्थ्यांनी परिसरात 151 झाडे लावलीत. तत्पुर्वी विद्यापिठ परिसरात वृक्षदिंडी काढण्यात आली. प्रारंभी उपस्थित पाहुण्यांनी वृक्ष पुजन करुन वनमहोत्सवाचा शुभारंभ केला. वृक्ष देऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले. उपसंचालक सामाजिक वनीकरण प्रदिप मसराम यांनी आभार प्रदर्शन केले. सुत्रसंचालन विलास नांदुरकर यांनी केले.
00000

काचावार/गावंडे/सागर/दि.01-07-2016/15-15 वाजता

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती