आयटीआय (मुलींची) अमरावती येथे ॲप्रेटिस भरती मेळावा
       अमरावती, दि.14 : औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) अमरावती येथे दि.15 जुलै, 16 रोजी सकाळी 11 वाजता पासुन फक्त मुलींकरीता ॲप्रेटिस भरती मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्याकरीता कॅरीअर प्लेसमेंट सर्व्हिसेस औरंगाबाद येथील कंपनी मार्फत अप्रेटिस जागा भरती करण्यात येणार आहे. त्याकरीता इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक आय.सी.टी.एस.एम., ड्राफ्टसमन मेकॅनिक, कोपा, विजतंत्री, तारतंत्री, फिटर संधाता आ.रे.सी. टर्नर पत्रेकारागिर या व्यवसायातील उर्तीण झालेल्या मुलींनी मेळाव्याकरीता हजर रहावे. गरजुंनी संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन संस्थेचे प्राचार्य कुमरे यांनी केले आहे.
00000
वृत्त क्र.716                                               दिनांक 14-7-2016
तालुकानिहाय क्रीडा स्पर्धेचे आयोजन
20 जुलै पासुन
          अमरावती, दि.14 : क्रीडा व युवक संचालनालय, पुणे जिल्हा क्रीडा परीषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती यांच्याद्वारे शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
            त्यामध्ये अमरावती मनपा दि.20 जुलै दुपारी 12 वाजता, विभागीय क्रीडा संकुल अमरावती. चांदूर बाजार दि.21 जुलै रोजी दुपारी 3 वाजता, जि.आर.काबरा हायस्कुल चांदूर बाजार. अमरावती दि.21 जुलै रोजी दुपारी 12 वाजता विभागीय क्रीडा संकुल, अमरावती. भातकुली दि.21 जुलै रोजी दुपारी 12 वाजता विभागीय क्रीडा संकुल, अमरावती. तिवसा दि.21 जुलै रोजी दुपारी 3 वाजता देवरादादा हायस्कुल तिवसा. वरुड दि.21 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वसंतराव हायस्कुल जरुड. मोर्शी दि.21 जुलै रोजी दुपारी 3 वाजता शिवाजी हायस्कुल मोर्शी. धारणी दि.21 जुलै रोजी दुपारी 1 वाजता पोस्ट बेसिक आश्रमशाळा हरिसाल. चिखलदरा दि.21 जुलै रोजी दुपारी 4 वाजता गिरीजन शारिरीक शिक्षण महाविद्यालय चिखलदरा. नांदगाव खंडेश्वर दि.21 जुलै रोजी सकाळी 11 वाजता शिवाजी विद्यालय नांदगाव खंडेश्वर. चांदूर रेल्वे दि.21 जुलै रोजी दुपारी 3 वाजता माध्यमिक विद्यालय पळसखेड. दर्यापूर दि.21 जुलै सकाळी 11 वाजता प्रबोधन विद्यालय दर्यापूर. अंजनगाव सुर्जी दि.21 जुलै रोजी दुपारी 3 वाजता निर्मला विद्यालय कापुसतळणी अंजनगाव सुर्जी. धामणगाव रेल्वे दि.22 जुलै रोजी सकाळी 11 वाजता लाभचंद मुलचंद राठी विद्यालय कावली धामणगाव रेल्वे.
            या स्पर्धा आयोजनाच्या तारखेबाबतची नोंद प्राचार्य, मुख्याध्यापक, शारिरीक शिक्षक, तालुका क्रीडा स्पर्धा संयोजक यांनी घ्यावी व आपल्या तालुक्यातील शारिरीक शिक्षकांना सुचित करण्यात यावे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.
00000


वाघ/गावंडे/सवाई/सागर/दि.13-7-2016/19-35 वाजता

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती