अमरावती जिल्ह्यातील 80 सिंचन प्रकल्पात
317.43 दलघमी पाणीसाठा – धरणे 35.56 टक्के भरली

       अमरावती, दि.9 : अमरावती जिल्ह्यात एक उर्ध्व वर्धा हा मोठा प्रकल्प, शहापूर, चंद्रभागा, पूर्णा आणि सपन हे चार माध्यम प्रकल्प आणि 75 लघु प्रकल्प असे एकुण 80 सिंचन प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पाची संकल्पीत क्षमला 892.77 द.ल.घ.मी.असून आतापर्यंत या प्रकल्पात 317.43 द.ल.घ.मी. पाणी साठा  निर्माण झाला असून याची धरणाची 35.56 टक्के धरणे भरली असल्याचीय माहिती जलसंपदा विभागाच्या पूरनियंत्रण कक्षातून प्राप्त झाली आहे. प्रकल्पनिहाय पाणीसाठ्याची माहिती द.ल.घ.मी. मध्ये पुढीलप्रमाणे 
          उर्ध्व वर्धा या मोठ्या प्रकल्पाचा प्रकल्पीय साठा 564.05 द.ल.घ.मी.असून आतापर्यंत या प्रकल्पात 203.30 द.ल.घ.मी.म्हणजे 36.04 टक्के पाणी साठा निर्माण झाला आहे. तसेच जिल्ह्यातील शहानूर प्रकल्पाची क्षमता 46.04  आतापर्यंत 14.96 द.ल.घमी. 32.49 टक्के, चंद्रभागा प्रकल्पाची क्षमता 41.25 द.ल.घ.मी.आहे  आतापर्यंत 10.97 द.ल.घ.मी. 26.59टक्के , पूर्णा प्रकल्पाची क्षमता 35.37 द.ल.घ.मी.आहे. आतापर्यंत 16.04 द.ल.घ.मी. म्हणजे 45.35 टकके, सपन प्रकल्पात 38.60 द.ल.घ.मी. क्षमते पैकी 17.95 द.ल.घ.मी. म्हणजे 46.50 टक्के साठा निर्माण झाला आहे.
          जिल्ह्यात 75 लघु सिंचन प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पाची क्षमता 167.46 द.ल.घ.मी.आहे. आतापर्यंत 54.21 द.ल.घ.मी. म्हणजे 32.37 टक्के पाणी साठा निर्माण झाला आहे.
                                                00000


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती