अमरावती जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात
 69.20 टक्के जलसाठा

       अमरावती, दि.27 : अमरावती जिल्ह्यात एक उर्ध्व वर्धा हा मोठा प्रकल्प, शहापूर, चंद्रभागा, पूर्णा आणि सपन हे चार माध्यम प्रकल्प आणि 77 लघु प्रकल्प असे एकुण 82 सिंचन प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांची उपयुक्त पाणी साठा क्षमता 905.15 द.ल.घ.मी. आहे. दि.27 जुलै, 16 पर्यंत जिल्ह्यात 604 मि.मी. पाऊस झाला आहे. सध्या या सर्व प्रकल्पामध्ये 69.20 टक्के म्हणजे 626.37 द.ल.घ.मी. पाणी साठा निर्माण झाला आहे.
            खबरदारी उपाययोजना म्हणून पुर्ण प्रकल्पाचे 3 गेट 10 सें.मी. नी उघडण्यात  आले आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या सांडव्यावरुन 13.45 घ.मी.प्र.से. पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सपन प्रकल्पाचे 4 गेट 10 सें.मी. ने उघडल्यामुळे 8.72 घ.मी.प्र.से. विसर्ग सुरु आहे.
            उर्ध्व वर्धा प्रकल्पात 76.32 टक्के, शहानुर 67.16 टक्के, चंद्रभागा 54.23 टक्के, पुर्णा 46.20 टक्के, सपन 64.27 टक्के आणि 77 लघु प्रकल्पात 56.41 टक्के भरले आहे.
00000
वृत्त क्र.765                                                        दिनांक 27-7-2016
अमरावती विभागातील सिंचन प्रकल्पात
47.09 टक्के जलसाठा
       अमरावती, दि.27 : अमरावती विभागात 9 मोठे प्रकल्प, 23 मध्यम प्रकल्प आणि 448 लघु प्रकल्प असे एकुण 480 सिंचन प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पाची उपयुक्त पाणी साठा क्षमता 3205.11 द.ल.घ.मी. आहे. दि.27 जुलै, 16 पर्यंत विभागात 534 मि.मी. पाऊस झाला आहे. सध्या या सर्व प्रकल्पामध्ये 47.09 टक्के म्हणजे 1509.27 द.ल.घ.मी. पाणी साठा निर्माण झाला आहे.
            मोठे प्रकल्पात अमरावती जिल्हा उर्ध्व वर्धा प्रकल्पात 76.32 टक्के, यवतमाळ जिल्हा-पुस प्रकल्प 58.14 टक्के, अरुणावती 45.55 टक्के, बेंबळा 31.18 टक्के, अकोला जिल्हा-काटेपूर्णा 25.91 टक्के, वाण 71.51 टक्के, बुलडाणा जिल्हा -नळगंगा 13.37 टक्के, पेणटाकळी 13.52 टक्के, खडकपूर्णा 00 टक्के, साठा निर्माण झाला आहे.
            मध्यम प्रकल्पात अमरावती जिल्हा - शहानूर 67.16 टक्के, चंद्रभागा 57.23 टक्के, पूर्णा 46.20 टक्के, सपन 64.27 टक्के. यवतमाळ जिल्हा - अधरपुस 77.51 टक्के, सायखेडा 100 टक्के, गोकी 90.85 टक्के, वाघाडी 78.70 टक्के, बोरगाव 100 टक्के, नवरगांव 100 टक्के. अकोला जिल्हा - निर्गूणा 34.11 टक्के, मोर्णा 18.67 टक्के, ऊमा 40.33 टक्के, अडाण 39.97 टक्के. वाशिम जिल्हा - सोनल 20.98 टक्के, एकबुर्जी 70.84 टक्के. बुलडाणा जिल्हा - ज्ञानगंगा 30.89 टक्के, पलढग 22.90 टक्के, मस 93.95 टक्के, कोराडी 22.22 टक्के, मण 44.26 टक्के, तोरणा 28.39 टक्के, उतावळी 46.89 टक्के आणि 448 लघु प्रकल्प 37.33 टक्के भरले आहे.
00000




वृत्त क्र.766                                                         दिनांक 27-7-2016
अमरावती विभागात आतापर्यंत 534 मि.मी.पाऊस
24 तासात सरासरी 28 मि.मी. 
       अमरावती, दि.27 : अमरावती विभागात आतापर्यत सरासरी 534 मि.मी.पाऊस झाला असून मागील मागील 24 तासात सरासरी 28 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
            अमरावती विभागातील जिल्हानिहाय आज झालेला आणि आतापर्यंतचा पाऊस पुढीलप्रमाणे. अमरावती 43 (604) मि.मी., अकोला 36 (527), यवतमाळ 15 (555), बुलडाणा 23 (436), वाशिम 33 (548) मि.मी. पाऊस झाला आहे.
            अमरावती विभागाचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 779.9 मि.मी. आहे. आजपर्यंत सरासरी च्या 69 टक्के म्हणजे 534 मि.मी. पाऊस झाला आहे.
00000
वृत्त क्र.767                                                                      दिनांक 27-7-2016
अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत 604 मि.मी.पाऊस
24 तासात सरासरी 43 मि.मी. 
       अमरावती, दि.27 : अमरावती जिल्ह्यात आतापर्यत सरासरी 604 मि.मी.पाऊस झाला असून मागील मागील 24 तासात सरासरी 43 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
            अमरावती 60 (519), भातकुली 39 (496), नांदगाव खंडेश्वर 48 (515), चांदुर रेल्वे 99 (574), धामणगाव रेल्वे 52 (569), तिवसा 15 (601), मोर्शी 23 (741), वरुड 27 (475), अचलपूर 82 (647), चांदुर बाजार 12 (557), दर्यापूर 61 (523), अंजनगाव सुर्जी 10 (502), धारणी 23 (806), चिखलदरा 46 (774), मि.मी. पाऊस झाला आहे. (कंसातील आकडेवारी  यावर्षी आतापर्यंतच्या सरासरी  पावसाची आहे.).
            जिल्ह्यात वार्षिक सरासरी पर्जन्यमान 814.5 मि.मी. आहे. आजपर्यंत सरासरी च्या 74 टक्के म्हणजे 604 मि.मी. पाऊस झाला आहे.
00000

काचावार/गावंडे/दि.27-07-2016/11-59 वाजता

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती