दिवंगत नेते रा.सु.गवई यांच्या प्रस्तावित स्मारक संकुलाचे
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी भुमिपूजन

       अमरावती, दि. 21 : अमरावती येथे दि.25 जुलै, 16 रोजी दिवंगत नेते रा.सु.गवई यांचे मौजे म्हसला वडाळी येथील मार्डी रोड लगत अमरावती विद्यापिठ शेजारी असलेल्या स.नं.5, 8 व 9 येथील 3.94 हे.आर. जागेवर श्री.देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते स्मारक संकुलाचे भुमिपूजनाचा सोहळा प्रस्तावित आहे.
          भुमिपूजन सोहळ्याकरीता श्री.प्रविण पोटे-पाटील, राज्यमंत्री उद्योग आणि खनिकर्म (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा पालकमंत्री अमरावती जिल्हा, डॉ.श्री.रणजित पाटील, गृह राज्यमंत्री (शहरे) नगर विकास, विधी व न्याय आणि संसदिय कार्य, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार डॉ.सुनिल देशमुख, अन्य लोकप्रतिनिधी तसेच डॉ.श्रीमती कमलाताई गवई व डॉ.श्री. राजेंद्र गवई यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
          स्मारकाच्या ठिकाणी दिवंगत नेते रा.सु.गवई यांचा पुर्णाकृती पुतळा राहणार असुन स्मारकाला भेटी देणाऱ्या नागरिकांना दिवंगत नेते रा.सु.गवई यांच्या कार्याची माहिती होण्यासाठी त्यांचे जीवनपट दर्शविणारे स्मृति सभागृह, कन्व्हेन्शन सेंटर, सभागृह, प्रेक्षागृह, प्रकल्पाचे सुशोभिकरण, सौंदर्यीकरण करण्यासाठी लँडस्केपींगसह उद्यान, निवासी विश्रामगृह आदी सुविधा राहणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती