वृक्षलागवडीनिमीत्त वनमंत्र्यांतर्फे नागरिकांचे जाहिर आभार

अमरावती दि.2: काल झालेल्या वृक्षलागवड मोहिमेला जनतेनी दिलेल्या अभुतपुर्व प्रतिसादाबद्दल वनमंत्र्यानी जाहिर आभार व्यक्त केले आहेत. आभार मानतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे की,
 राज्याच्या यावर्षीचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर करतांना मी 1 जुलै, 2016 राजी कृषि दिन व वनमहोत्सवाचे  औचित्य साधुन राज्यात एकाच दिवशी दोन कोटी वृक्ष लागवड करुन हरित महाराष्ट्र ही संकल्पना साकार करण्याचा संकल्प जाहीर केला होता.
मी जाहीर केलेल्या शासनाच्या या संकल्पाच्या पूर्ततेसाठी राज्यातील जनतेसह विविध सामाजिक संस्था, संघटना, शासकीय विभाग, मा.केंद्रीय मंत्री सर्वांनी सहकार्य केले आणि 1 जुलै रोजी राज्यात       2 कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य पूर्ण केले. त्याबद्दल मी सर्वांचा शतश: आभारी आहे. यापूढील काळात आपण येत्या 3 वर्षात 50 कोटी वृक्ष लागवड करणार आहोत. प्रत्येक वर्षी ह्याचे स्वरुप मोठे व भव्य होईल. आपण वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट तर पूर्ण केले व यापुढे वृक्ष संवर्धन व त्याच्या संगोपनाची जबाबदारी आपल्या सर्वांना पार पाडायची आहे.
लोक सहभागाच्या माध्यमातुन 2 कोटी वृक्ष लागवडीचे हे शिवधनुष्य आपण पेलले आहे. सेल्फी विथ ट्री ह्या स्पर्धेचे पारितोषीक वितरण आपण करण्यासाठी हाती घेतली नसुन केवळ यातुन पर्यावरणाचा समतोल साधत आनंद मिळविण्यासाठी हाती घेतली आहे.
नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या मोहिमेत सहभागी होत केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द अपुरे आहेत. या मोहिमेच्या शुभारंभाचे निमंत्रण मा.पंतप्रधानांना देण्यासाठी मी नवी दिल्लीत गेलो असता त्यांनी या कार्याला ईश्वरीय कार्य म्हणून दिलेली कौतुकाची थाप माझ्यासाठी उत्साहवर्धक ठरली.
जलयुक्त शिवार अभियानाप्रमाणे महाराष्ट्रात वनयुक्त शिवार आपल्याला फुलवायचे आहे. ही मोहीम आज संपली नसुन आजपासुन सुरु झाली आहे. या प्रक्रियेत आपले असेच उदात्त सहकार्य लाभेल हीच अपेक्षा, विश्वास आहे.
आपणा सर्वांच्या सहकार्यासाठी कोटी कोटी धन्यवाद !
आपणा सर्वांच्या आपुलकीचा आदर करत मी एवढचं  म्हणेन…

या आपुलकीच्या आपुल्या
कसे मोल करावे कुणी
मी मनात ठेवीन माझ्या
अन सदैव राहिल ऋणी
00000
वाघ/धकाते/दि.07-06-2016/16-40 वाजता


                       

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती