शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी
राष्ट्रीयकृत बँका पात्र शेतकऱ्यांना कर्ज देणार
किशोर तिवारी
आरोग्य विभागातील रिक्त पदे महिन्यात भरा

       अमरावती, दि.9 : राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी पात्र शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन द्यावेत असे निर्देश कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिले.

          येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात किशोर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनच्या कामाचा आढावा घेण्यात आला यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त किरण गित्ते, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल पाटील, कृषि सहसंचालक एस आर सरदार, आरोग्य उपसंचालक लव्हाळे, आदिवासी विकास विभागाचे उपआयुक्त सरोदे,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत तसेच विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

          मिशनचे अध्यक्ष तिवारी म्हणाले कि राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. शासनाच्या प्रयत्नाला यश मिळत आहे. ज्या ज्या भागात तुर पिक चांगले आले आले त्या भागात तसेच ज्या भागातील शाळा चांगल्या सुरु आहेत. तसेच ज्या भागात आरोग्य विषयक सुविधा चांगला आहेत त्या भागातील आत्महत्या कमी झाल्याचे समाधान कारक चित्र दिसुन येत आहे. यासाठी पालकांना करावा लागणारा शिक्षणावरील खर्च विभागाने कमी करावा. शिक्षण शुल्क समितीने ज्या शाळांना मान्यता दिली नाही त्याच्यावर कारवाई करावी. शिक्षकांना सामाजिक जबाबदारी द्यावयाची आहे. शिक्षणावरील अवकळा कमी होईल. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी आदिवासी विकास विभागाने वस्तीगृहे उभारावीत.

          ग्रामीण भागात डॉक्टरांची तसेच वैद्यकिय कर्मचाऱ्यांची निवासस्थाने उपलब्ध नसल्यामुळे तसेच नादुरुस्त असल्यामुळे ते मुख्यालयी राहत नाही. यासाठी त्यांची निवासस्थाने दुरुस्त करावीत. आदिवासी विकास विभाग नेहमी चर्चेत असतो. यासाठी त्यांनी कामकाजात पारदर्शकता ठेवावी. मत्स्य व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, पशु संवर्धन या विभागामध्ये प्रचंड रोजगार निर्मितीची क्षमता आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात. कृषि विभागातील रिक्त पदे तातडीने भरावीत. सर्व दवाखाने सुस्थितीत ठेवून औषधी साठा पुरेसा ठेवावा. भुईखेडा येथे सुलभ पिक कर्जवाटप मेळावा लवकरच घेण्यात येणार असून त्या दृष्टीने नियोजन करावे.
         


राजीव गांधी जिवनदायी आरोग्य योजनेत सर्व समावेषक अशी दुरुस्ती करण्यात येणार असून सर्व शेतकऱ्यांना सर्व आजार या योजनेत कव्हर करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने आरोग्य विभागाने आवश्यक सुधारणा सुचवाव्यात. 108 ही आरोग्‍य सेवा शासनाकडून शासनाच्या दवाखान्यासाठी वापरावी त्यांच्या दुरुपयोग होऊ नये. जिल्हयात 80 हजार शेतकरी जिल्हा प्रशासनाकडून सावकार मुक्त करण्यात आले आहेत ही अत्यंत समाधानाची बाब आहे. या शेतकऱ्यांना बँकांनी कर्ज उपलब्‍ध करुन द्यावे. शेतकरी अडचणीत असल्यामुळे आदिवासी विकास विभागाने नव्याने खावटी कर्ज द्यावे. शक्य झाल्यास नगदी स्वरुपात त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करावी. जिल्हयात चांगल्या पाऊस झाल्यामुळे पेरणीही चांगली झाली आहे. रब्बी हंगामासाठी लागणारे बि बियाणांची तयारी आतापासूनच करावी.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृषि विभागाने कृषि लागवड खर्च कमी करण्याच्या उपाययोजना सुचवाव्यात. आदिवासी विकास विभागाने परंपरागत बियाण्याचे प्रकल्प हाती घ्यावेत. दाळवर्गीय बियाणे शेतकऱ्यांना द्यावेत अशा सुचना केल्या.

जलयुक्त शिवार अभियानामुळे जिल्ह्यात सर्व ठिकाणी जलसाठे दिसत आहेत. खरीपाच्या उत्पादन वाढेल अशी चित्र असून रब्बी पिकाचेही 20 टक्के क्षेत्र वाढेल असा विश्वास तिवारी यांनी व्यक्त केला. मागील वर्षी जलयुक्तच्या पाणामुळे चना, तुर उत्पादन वाढले त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती पैसे मिळाले त्यामुळे आत्महत्या कमी झाल्या.

शेवटी अप्पर जिल्हाधिकारी परदेशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
000000
काचावार/सवाई/सागर/दि.9-7-16/19 वा.




Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती