Friday, July 15, 2016

गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील
15 जुलै रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर

       अमरावती, दि.14 : गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील शुक्रवार दि.15 जुलै, 16 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असुन कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
            दि.15 जुलै, 16 रोजी सकाळी 11 वाजता जागतिक कौशल्य दिनानिमित्त बुलडाणा येथील सिद्धीविनायक इंजिनिअरिंग कॉलेजमधील कार्यक्रमाला उपस्थित राहुन दुपारी 3-30 वाजता शेगाव येथुन मोटारीने चिखलदराकडे प्रयाण. सायं.5-30 वाजता चिखलदरा येथे आगमन व भाजपा प्रशिक्षण शिबिरास उपस्थिती व चिखलदरा येथे मुक्काम.
00000
वृत्त क्र.720                                                         दिनांक 14-7-2016
अंशकालिन उमेदवारांनी डाटा बेससाठी माहिती द्यावी
* कौशल्य विकास विभागाचे आवाहन
       अमरावती, दि.14 :जिल्ह्यातील ज्या उमेदवारांनी सुशिक्षित बेरोजगारांना आर्थिक सहाय्य योजना भाग अ अंतर्गत शासनाच्या प्रचलित नियमाप्रमाणे तीन वर्ष काम पुर्ण केले आहे व ज्यांची नोंद सेवायोजन कार्यालयाच्या नोंदणी ओळखपत्रावर घेण्यात आली आहे व ज्यांची अभिलेख अद्यावत आहे. अशा उमेदवारांनी त्यांचा डाटा बेस तयार करण्यासाठी व शासनास शासकीय खाजगी क्षेत्रात नोकरी व्यवसाय करीत नसल्याचे शपथपत्र सादर करण्यासाठी दि.16 जुलै, 16 पर्यंत माहिती द्यावी.
            माहितीमध्ये अलिकडे काढलेला पासपोर्ट फोटो, अद्यावत असलेले नोंदणी ओळखपत्र, तहसिलदार यांनी दिलेले मुळ प्रमाणपत्र व कामाचे आदेशपत्र व सेवायोजन कार्यालयात नोंद केल्याबाबत कौशल्य विकास विभागाने दिलेले प्रमाणपत्र आदी माहिती द्यावी. शैक्षणिक अर्हतेच्या मुळ प्रमाणपत्र, त्यांच्या साक्षांकित प्रती व शपथपत्रासह (शपथ कार्यालयात उपलब्ध आहे) कार्यालयात संपर्क साधुन सादर करावे. अचुक व विहित मुदतीत माहिती द्यावी.
            उमेदवारांचा डाटा बेस तयार करण्यासाठी हे आवाहन तयार करण्यात आले आहे.
00000
वृत्त क्र.721                                                         दिनांक 14-7-2016
आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्त
मा.सरन्यायाधिश यांची मुलाखत 18 जुलै रोजी
       अमरावती, दि.14 : आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्त दि.18 जुलै, 16 रोजी भारताचे मा.सरन्यायाधिश यांची मुलाखत रात्री 9-30 ते रात्री 10 दरम्यान ऑल इंडिया रेडीओ वर प्रसारित होणार आहे. ही मुलाखत आकाशवाणी इंद्रप्रस्थ चॅनल मिडीयम 363.3 मीटर्सवर, आकाशवाणी एफ.एफ रेन्बो 102.6 मीटर्सवर संपुर्ण देशात एकाच वेळी प्रमुख ए.आय.आर. च्या सर्व प्रमुख चॅनल्सवर तसेच दुरदर्शन डी.टी.एच. च्या ए.आय.आर. चॅनलवर प्रसारित करण्यात येणार आहे असे जिल्हा विधी प्राधिकरणाद्वारे कळविण्यात आले आहे.
00000

वाघ/गावंडे/दि.14-7-2016/16-17 वाजता

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...