जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक
* यंत्रणेला सतर्कतेचे आदेश 
       अमरावती, दि.11 : गेल्या 3-4 दिवसातील पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पुर परिस्थिती व इतर नैसर्गिक आपत्ती आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी आज तातडीने जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेतली व यंत्रणेला सतर्क व सुसज्ज रहाण्याचे निर्देश दिले.
           या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल पाटील, पोलिस अधिक्षक लखमी गौतम व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
          यामध्ये अमरावती जिल्ह्यात आतापर्यत सरासरी 402 मि.मी.पाऊस झाला असून मागील मागील 24 तासात सरासरी 56 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरी पर्जन्यमान 814.5 मि.मी. आहे. आजपर्यंत सरासरी च्या 49.3 टक्के म्हणजे 402 मि.मी. पाऊस झाला असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
          जिल्ह्यातील पुर सदृश्य परिस्थिती पाहता जिल्हास्तरीय आपत्ती निवारण कक्षामध्ये 24 तास अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. नागरिकांनी आपत्कालिन परिस्थितीत नियंत्रण कक्षाच्या दुरध्वनी क्रमांक 2662025, 2660166 यावर संपर्क करावा. टोल फ्री 18002336448 या क्रमांकावर सुद्धा संपर्क करता येईल. विद्युत भवनच्या नियंत्रण कक्षाचा क्रमांक 2663640 तर अग्नीशमन दलाच्या नियंत्रण कक्षाचा क्रमांक 2576426 असे आहेत. तसेच नियंत्रण कक्षात आपत्कालिन परिस्थितीत सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
00000

वाघ/गावंडे/झिमटे/दि.11-7-16/17-40 वाजता


Comments

  1. When.2nd.dose.of.covexiton.will.be.available.pls.do.the.needful


    ReplyDelete
  2. When.2nd.dose.of.covexiton.will.be.available.pls.do.the.needful


    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती