अमरावती जिल्ह्यात खरिपाच्या 81 टक्के पेरण्या
सोयाबिन नंतर कापूस लागवडीस प्राधान्य


 दिनांक 06-07-2016


अमरावती दि 6 : अमरावती जिल्ह्यात 5 जुलै अखेर खरिपाच्या 81 टक्के पेरण्या झाल्या असून शेतक-यांनी सोयाबिन पिकाला पहिले प्राधान्य दिले आहे. त्यानंतर कापूस, तूर, मुग, खरीप ज्वारी नंतर ऊडीद या पिकाची शेतक-यांनी पेरणी केली आहे अशी माहिती कृषि विभागाने दिली आहे.
जिल्ह्यात 728112 हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्यापैकी 5 जुलै अखेर 592181 हेक्टर क्षेत्रात म्हणजे 81 टक्के पेरण्या पुर्ण झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र सोयाबिन या पिकाचे आहे. जिल्ह्यात 323300 हेक्टर क्षेत्र सोयाबिन पिकाखाली आहे. आतापर्यंत 243534 हेक्टर मध्ये  सोयाबिनची पेरणी झाली आहे. त्या खालोखाल कापूस 164709 हेक्टर त्यानंतर तूर 108862 हेक्टर, मुग 25942 हेक्टर, खरीप ज्वारी 20862 हेक्टर, ऊडीद 18823, भात 6889 हेक्टर मध्ये पेरण्या झालेल्या आहेत.
अमरावती जिल्ह्यात एकुण खरीप पिकापैकी भुईमुग, तीळ, सोयाबिन या खरीप पिकाखाली तेल बियाचे क्षेत्र सर्वाधिक म्हणजे 244749 हेक्टर मध्ये आहेत. त्याखालोखाल तूर, मुग, ऊडीद इतर कडधान्य 153627 हेक्टर मध्ये पेरणी झाली आहे. कापूस 164709 हेक्टर, भात, खरीप ज्वारी, मका या तृण धान्याची 29096 हेक्टर मध्ये पेरणी झाली आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक 93 टक्के पेरणी धारणी तालुक्यात झाल्या आहेत. त्या खालोखाल अंजनगाव 86 टक्के, धामणगाव रेल्वे 85 टक्के, वरुड 84 टक्के, दर्यापूर 83 टक्के,  अमरावती 84 टक्के, चादुरबाजर 83 टक्के, नांदगाव खंडेश्वर 82 टक्के, भातकुली 82 टक्के, अचलपूर 81 टक्के, चांदुर रेल्वे 88 टक्के, तिवसा 77 टक्के, मोर्शी 75 टक्के, चिखलदरा 56 टक्के पेरण्या झाल्या आहेत.
जिल्ह्यात 5 जुलै रोजी सरासरी 23 मि. मी. पाऊस झाला होता. 5 जुलै पर्यंत 254 मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. पेरणीलायक पाऊस झाल्यामुळे शेतकरी जोमाने पेरणीच्या कामाला लागले आहेत. कृषि विभागाकडून बि बियाण्याची निवड, खते, किटकनाशके यांच्या वापराबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
000000
काचावार/सागर/सवाई/दि.06-07-2016/18-00 वाजता



Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती