Tuesday, July 5, 2016


अंशकालिन उमेदवारांनी डाटा बेससाठी माहिती द्यावी
* कौशल्य विकास विभागाचे आवाहन
       अमरावती, दि.05 :जिल्ह्यातील ज्या उमेदवारांनी सुशिक्षित बेरोजगारांना आर्थिक सहाय्य योजना भाग अ अंतर्गत शासनाच्या प्रचलित नियमाप्रमाणे तीन वर्ष काम पुर्ण केले आहे व ज्यांची नोंद सेवायोजन कार्यालयाच्या नोंदणी ओळखपत्रावर घेण्यात आली आहे व ज्यांची अभिलेख अद्यावत आहे. अशा उमेदवारांनी त्यांचा डाटा बेस तयार करण्यासाठी व शासनास शासकीय खाजगी क्षेत्रात नोकरी व्यवसाय करीत नसल्याचे शपथपत्र सादर करण्यासाठी दि.15 जुलै, 16 पर्यंत माहिती द्यावी.
          माहितीमध्ये अलिकडे काढलेला पासपोर्ट फोटो, अद्यावत असलेले नोंदणी ओळखपत्र, तहसिलदार यांनी दिलेले मुळ प्रमाणपत्र व कामाचे आदेशपत्र व सेवायोजन कार्यालयात नोंद केल्याबाबत कौशल्य विकास विभागाने दिलेले प्रमाणपत्र आदी माहिती द्यावी. शैक्षणिक अर्हतेच्या मुळ प्रमाणपत्र, त्यांच्या साक्षांकित प्रती व शपथपत्रासह (शपथ कार्यालयात उपलब्ध आहे) कार्यालयात संपर्क साधुन सादर करावे. अचुक व विहित मुदतीत माहिती द्यावी.
          उमेदवारांचा डाटा बेस तयार करण्यासाठी हे आवाहन तयार करण्यात आले आहे.
00000
वृत्त क्र.665                                                                दिनांक 05-07-2016
एडीफाय शाळेबाबत शिक्षण विभागतर्फे महत्वाची सुचना
अमरावती, दि.05 : देवी एज्युकेशन सोसायटी, कठोरा रोड अमरावती द्वारा संचालित एडीफाय शाळेला शासनाची जरी परवानगी असली तरी सदर शाळेनी एडीफायची फ्रेंचायसी घेतली असल्याने पालकांनी सदर शाळांमध्ये पाल्यांचा प्रवेश घेवु नये. शाळा शैक्षणिक सत्र सुरु असतांना शासनाने परवानगी काढल्यास विद्यार्थ्यांचे होणाऱ्या शैक्षणिक नुकसानास त्यांचे पालक स्वत: जबाबदार राहतील. विद्यार्थी समायोजनाची जबाबदारी शिक्षण विभाग घेणार नाही याची पालकांनी नोंद घ्यावी.
0000



वृत्त क्र.666                                                                            दिनांक 05-07-2016
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे राबविल्या जातात विविध उपक्रम
       अमरावती, दि.05 : राज्यात कायदे विषयक जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयाद्वारे राज्य विधी सेवा प्राधिकरणाद्वारे विविध उपक्रम व मोफत विधी सहाय्य देण्यात येते.
          मोफत विधी सहाय्यामध्ये न्यायालयीन प्रकरणाबाबत मोफत सल्ला व सहाय्य दिले जाते. सरकारी खर्चाने वकिलाची नेमणुक केली जाते. योग्य त्या प्रकरणामध्ये कोर्ट फी ची रक्कम पुरवली जाते. न्यायालयीन प्रकरणासंदर्भात टाईपिंग, झेरॉक्स व इतर दस्ताऐवजांसाठी लागणारा खर्च पुरविल्या जाते. साक्षीदारांना समंस पाठविण्याचा खर्च दिला जातो. न्यायालयीन वादाच्या अनुषंगाने होणारा इतर खर्च दिला जातो.
          महिला व मुले, अनुसुचित जाती व जमातीचे सदस्य, वार्षिक उत्पन्न 72 हजारापेक्षा जास्त नाही असे व्यक्ती, औद्योगिक कामगार, कारागृहातील बंदी कैदी, अपव्यापार किंवा भिक्षेकऱ्यांना बळी पडलेली व्यक्ती, विपत्ती, वांशिक हिंसाचार, जातीय अत्याचार, पूर, दुष्काळ, भुकंप बळी पडलेल्या व्यक्ती यांना मोफत विधी सहाय्य मिळू शकते. या अनुषंगाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्यामध्ये विधी साक्षरता व जागृकता शिबिरांचे आयोजन, विधीज्ञांची प्रशिक्षण कार्यशाळा व शिबिरांचे आयोजन करणे. सामाजिक व आर्थिक दृष्ट्या दुर्बल व लाभवंचित नागरिकांना विधी सल्ला व सहाय्य उपलब्ध करुन देणे. विवादांचा समेटाने समझोता करण्यासाठी जिल्ह्यामध्ये लोकअदालत व मध्यस्ती केंद्राची उपलब्धता करणे. कारागृहातील बंदी कैद्यांना मोफत सहाय्य व सल्ला देण्याकरीता विधी सहाय्य समुपदेशकांची नियुक्ती करणे. विधी साक्षरता कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी अशासकीय संघटनांना अधिस्विकृती देणे. लोकांना त्यांचे कायदेविषयी अधिकार, कर्तव्य व मोफत विधी सेवेविषयी विधी साक्षरता व जागृकता शिबिराचे आयोजन करणे.
          विधी सहाय्यासाठी संपर्क कार्यालय पुढीलप्रमाणे. अचलपूर 07223-227112, भातकुली 0721-2289364, चांदूर रेल्वे 07222-254070, धामणगाव रेल्वे 07222-237240, मोर्शी 07228-222317, तिवसा 07225-252577, अंजनगाव सुर्जी 07224-242774, चांदूर बाजार 07227-243157, दर्यापूर 07224-234303, धारणी 07226-224334, नांदगाव खंडेश्वर 07221-222798, वरुड 07229-232448 असे आहे तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अमरावती यांचा दु.क्र. 0721-2667175 असा आहे.
00000
वाघ/गावंडे-सवाई/दि.05-07-2016/13-45 वाजता



No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...