Posts

Showing posts from February, 2020

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विभागीय ग्रंथालयात दुर्मिळ ग्रंथप्रदर्शन

Image
अमरावती, दि. 27 : विभागीय ग्रंथालय, जिल्हा ग्रंथालय व जिल्हा माहिती कार्यालयातर्फे  मराठी भाषा गौरव दिनानिमित्त येथील विभागीय ग्रंथालयात दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. त्याला विद्यार्थी, अभ्यासक, विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट दिली.   ग्रंथप्रदर्शनाचा शुभारंभ निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्या हस्ते झाला. विभागीय माहिती उपसंचालक राधाकृष्ण मुळी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सूरज मडावी, सहायक संचालक राजेश पाटील, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार आदी उपस्थित होते. प्रारंभी कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला डॉ. व्यवहारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ग्रंथप्रदर्शनात 1960 व तत्पूर्वीच्या अनेक साहित्यकृतींचा समावेश करण्यात आला. कवी कुसुमाग्रज यांच्या कवितासंग्रहांसह इतर वाङमयप्रकारातील साहित्यकृती मांडण्यात आल्या होत्या. अनेक प्रसिद्ध पुस्तकांच्या सुरुवातीच्या आवृत्ती प्रदर्शनात रसिकांना पाहता आल्या. ज्ञानेश्वरीच्या हिंदी अनुवादाची प्रत, लीळाचरित्रावरील ग्रंथ, विश्वकोशाचे खंड, विविध कोश

जनगणनेबाबत अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

Image
जनगणनेसाठी येणाऱ्या प्रगणकांना नागरिकांनी व्यवस्थित माहिती द्यावी                                                                                                                                                   -डॉ. नितीन व्यवहारे *जनसहभागातून ….जनकल्याण…. ब्रीद वाक्य *1 मे ते 15 जून दरम्यान जनगणना अमरावती, दि. 25 :  संपूर्ण भारत देशात 2021 वर्षच्या जनगणनेला 1 मे पासून शुभारंभ होणार आहे. दि. 1 मे ते 15 जून दरम्यान राज्यातील प्रत्येक घरांची गणना होणार असून दि. 9 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2021 दरम्यान प्रत्यक्ष व्यक्ती गणना (शीर गणती) करुन माहितीचे सत्यापण होणार आहे. जनगणनेच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या लोकसंख्येच्या माहितीच्या आधारे देशात कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी व ध्येय धोरणे ठरविण्यासाठी सहाय्य होते, त्यामुळे नागरिकांनी जनगणना करण्यासाठी येणाऱ्या प्रगणकांना व्यवस्थित व खरी माहिती द्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी कार्यशाळेत दिली. जनसहभागातून…जनकल्याण… हे या जनगणनेचे ब्रीद वाक्य आहे. म्हणजे तुमच्याच(नागरिकांच्या)

जिल्हाधिकारी कार्यालयात संत गाडगे बाबा महाराज यांना अभिवादन

Image
अमरावती, दि. 19-  संत गाडगे   बाबा  महाराज  यांच्या जयंतीनिमित्त   आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी   संत गाडगे  बाबा   महाराज   यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  विधी अधिकारी नरेंद्र बोहरा यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनी ही   संत   गाडगे   बाबा  महाराज  यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले. 00000

अचलपूर दूध संकलन-विक्री केंद्र

Image
                                            प्रकल्प निर्मितीसाठी निधीचे नियोजन करावे                                                    - राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू अमरावती, दि. 23 : अचलपूर येथे निर्माण होणाऱ्या दूध संकलन केंद्रासाठी प्रकल्प निर्मितीच्या अनुषंगाने निधीचे नियोजन करताना केंद्र सरकार, राज्य शासन व टाटा ट्रस्ट आदींकडून निधीची तरतूद करुन प्रकल्प पूर्णत्वास आणावा, असे निर्देश जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू यांनी आज बैठकीत दिले. येथील सिंचन भवन विश्रामगृहात पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय वाढ संदर्भात आढावा राज्यमंत्र्यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मोहन गोहोत्रे यांच्यासह यांच्यासह दुग्ध विकास विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.  श्री. कडू म्हणाले की, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन द्यायावयाचे असल्यास दूध उत्पादन वाढविणे व त्यावरील खर्च कमी होणे आवश्यक आहे. कोरडवाहू शेतीक्षेत्र व अपुरे सिंचन यामुळे चारा निर्मितीसाठी मर्यादा येते. अशा स्थितीत कमी पाण्यात अधिक चार

खनिज प्रतिष्ठान अंतर्गत येणारी प्रस्तावित विकास कामे गतीने पूर्ण करा - पालकमंत्री यशोमती ठाकूर

Image
अमरावती, दि. 20 : जिल्हा खनिज प्रतिष्ठानकडून 43 विकास कामे करण्यासाठी 13 कोटी 30 लक्ष निधी मंजूर करण्यात आलेला आहे. मंजूर निधीतून जिल्ह्यातील प्रस्तावित विकास कामे गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.   विभागीय आयुक्त कार्यालयात आज जिल्हा खनिज प्रतिष्ठाण अंतर्गत प्राप्त व वितरीत निधी संदर्भात आढावा पालकमंत्र्यांनी घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंत वानखडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.              श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत 13 कोटी 30 लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी 43 कामाकरीता रुपये 6 कोटी 65 लक्ष निधी विकास कामे पूर्ण करण्यासाठी संबंधीत शासकीय यंत्रणांना वितरीत करण्यात आला आहे. राज्य शासन राबवित असलेल्या पायाभूत सुविधा, शिक्षण, कौशल्य विकास आदी योजनेतून निधीची उपलब्धता झाल्याने लोककल्याणकारी कामे कुठल्याही परिस्थितीत पूर्ण झाली पाहिजे. प्राप्त निधीच्या अनुषंगाने चांदूरबाजार, भातकुली, अमरावती, तिवसा, मोर्शी, वरुड, दर्यापूर तस

पालकमंत्र्यांकडून विविध विकासकामांबाबत आढावा

Image
                     अपूर्ण कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश                     आवश्यक कामांसाठी निधी मिळवून देऊ -           पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर अमरावती, दि. 20 : जिल्ह्यात विविध विकास आराखड्यातील अपूर्ण कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. आवश्यक व नव्या कामांसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून अतिरिक्त निधी मिळवून देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले. जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंत वानखडे, विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.   पालकमंत्री श्रीमती ठाकूर यावेळी म्हणाल्या की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या पावनस्पर्शाने पुनित झालेल्या स्थळांचा विकास विविध प्रकल्पांच्या उभारणीतून होत आहे. आराखड्यानुसार  आधी अपूर्ण कामे पूर्णत्वास न्यावीत. नव्या कामांसाठी अतिरिक्त निधी

छत्रपती शिवाजी महाराज यांनापालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडून अभिवादन

Image
अमरावती, दि. 19- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी शिवटेकडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी आमदार सुलभाताई खोडके, किशोर बोरकर, हरीभाऊ मोहोड यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक आदी उपस्थित होते. उपस्थितांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार वाहून अभिवादन केले.  छत्रपती शिवाजी महाराज यांनी जनसामान्यांचे स्वराज्य स्थापन करत लोककल्याणकारी राज्यव्यवस्था निर्माण केली. ते आदर्श प्रशासक होते.  त्यांचे जीवन व कार्य संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले. विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 00000

जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

Image
अमरावती, दि. 19- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त  आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी  छत्रपती शिवाजी महाराज  यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे,  विधी अधिकारी नरेंद्र बोहरा यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही  छत्रपती शिवाजी महाराज  यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले. 00000

विभागीय प्रदर्शनी व विक्री ‘वैदर्भी’ चे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Image
महिलांनी धैर्याने संकटांचा सामना करावा                                                              -पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर * उत्कृष्ठ बचतगटांना राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार अमरावती, दि. 17 : महिलांमध्ये समाजाला पुढे नेण्याची मोठी ताकद आहे. महिलांची आर्थिक, सामाजिक उन्नती करण्यासाठी, त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी उमेद अभियान उपयुक्त आहे. महिलांनी सक्षमीकरणासाठी स्वत:चे निर्णय स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपून कणखर होणे व कुठल्याही परिस्थितीत संकटाला डगमगून न जाता धैर्याने सामना करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.             येथील सांयन्सकोअर मैदानावर विभागीय आयुक्त व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय प्रदर्शनी व विक्री  ‘  वैदर्भी ’ चे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार सुलभाताई खोडके, विभागीय आयुक्त पियूष सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, उप आयुक्त (व

शेतात भरणा-या शाळेला आता मिळणार छत

Image
                           वीटभट्टी मजूरांच्या मुलांच्या शाळेसाठी राज्यमंत्र्यांकडून 60 हजार रूपयांची मदत                     शाळेसाठी जूनमध्ये ठोस उपाययोजना करणार -           जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू अमरावती, दि. 15 :  शिक्षकांकडून अंजनगाव बारीजवळ वीटभट्टी मजुरांसाठी शेतात चालविल्या जाणा-या शाळेला जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी भेट दिली व ही शाळा तत्काळ स्थानिक परिसरातील पक्क्या इमारतीत हलविण्यासाठी साठ हजार रूपयांची मदत केली. याबाबत येत्या जूनमध्ये ठोस उपाययोजना करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. यामुळे शेतात भरणा-या या शाळेला हक्काचे छत मिळणार आहे.    अंजनगाव बारीनजिक एका शेतात वीटभट्टी मजुरांच्या मुलांसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांकडून शाळा भरवली जात आहे. याबाबत माध्यमांतून माहिती मिळताच राज्यमंत्री श्री. कडू यांनी स्वत: या शाळेला भेट दिली व तेथील शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शेतात भरणा-या या शाळेला तत्काळ स्थानिक परिसरात पक्की इमारत मिळावी यासाठी त्यांनी साठ हजार रूपयांची मदत केली. त्याचप्रमाणे, येत्या जूनमध्ये याबाबत ठोस उ

चमक येथे राहुटी उपक्रमाचा शेकडो नागरिकांना लाभ

Image
                                          राहुटी उपक्रमात सातत्य राखणार -जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू   अमरावती, दि. १5 : राहुटी उपक्रमाचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ मिळून त्यांच्या अनेक अडचणींचा निपटारा होत आहे. या उपक्रमात यापुढेही सातत्य राखण्यात येईल, असे जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज चमक येथे सांगितले.  जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी राहुटी उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने आज अचलपूर तालुक्यातील चमक येथे राहुटी उपक्रम घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. परिसरातील शेकडो नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. यावेळी शिधापत्रिका, आधारकार्ड, वयाचा दाखला यासह विविध कागदपत्रांसाठीच्या अर्जांचा, तसेच विविध विभागांशी संबंधित अडचणींचा निपटारा  करण्यात आला. राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी स्वतः नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व अधिका-यांना कार्यवाहीचे निर्देश दिले.             उपक्रमात येणा-या प्रत्येक नागरिकाच्या अडचणी, मागणी याबा

पालकमंत्र्यांकडून एमआयडीसी परिसराची पाहणी

Image
दूषित पाण्याचा उपद्रव तत्काळ रोखा                                           - पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे निर्देश अमरावती, दि. १५ : येथील एसएमएस कंपनीकडून नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीच्या परिसरात दूषित पाणी सोडले जात असल्याने आजूबाजूच्या शेतीचे नुकसान होत असल्याची तक्रार होत आहे.    याबाबत तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी येथे दिले.   कंपनीकडून दूषित पाणी सोडले जात असल्याच्या तक्रारीची दखल घेत पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी काल नांदगावपेठ एमआयडीसीला भेट दिली व पाहणी केली, तसेच यावेळी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना कार्यवाहीचे निर्देश दिले.                कंपनीकडून दूषित पाणी नांदगाव पेठ औद्योगिक वसाहत परिसरामध्ये सोडले जात असल्याने पाणी स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन    पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत होती तसेच या भागातील विहिरीमध्ये सुद्धा या पाण्याचा निचरा होऊन विहिरींचे पाणी दूषित होत असल्याच्या तक्रारी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांना प्राप्त झाल्या. त्याअनुषंगाने लवकरात लवकर याबाबतीत उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी संबं

राहुटी उपक्रमाद्वारे नागरिकांच्या विविध अडचणींचे निराकरण - जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

Image
अमरावती, दि. १४ : जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी राहुटी उपक्रम राबविण्यात येत आहे. अचलपूर तालुक्यात आज आयोजित राहुटी उपक्रमाचा आज शेकडो नागरिकांनी लाभ घेतला.  जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू यांनी स्वत: यावेळी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व प्रशासनाला तत्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले. आज सकाळी अचलपूर तालुक्यातील कविठा बु. ग्राम पंचायतीत, त्यानंतर मेघनाथपूर बसस्टॉप येथे राहुटी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध शासकीय विभागांचे अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते. शिधापत्रिका, आधारकार्ड यासह विविध कागदपत्रांसाठीच्या अर्जांचा, तसेच विविध विभागांशी संबंधित अडचणींचा निपटारा राहुटी उपक्रमातून होत आहे. गेल्या पंधरवड्यापासून विविध गावांत हा उपक्रम सुरू असून, राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू हे स्वतः नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत. सर्व कार्यालयांचा राहुटी उपक्रमात सहभाग असून, विविध विभागांबाबतच्या तक्रारींचे निवारण एकाच