Posts

Showing posts from February, 2023

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी 10 मार्चपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

 महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी 10 मार्चपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन अमरावती, दि. 24 : वीरशैव लिंगायत समाजासाठी समाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, समाज संघटनात्मक, आध्यात्मिक प्रबोधन व आर्थिकदृष्ट्या कल्याणासाठी काम करणाऱ्यांना महात्मा बसवेश्वर सामाजिक समाता-शिवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यासाठी नामवंत कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, आध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्य क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्ती अथवा संस्थांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यामध्ये व्यक्तीसाठी एक व सामाजिक संस्थेसाठी एक असे दोन पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारासाठी दि. 10 मार्चपर्यंत अर्ज मागविण्यात येत असल्याचे समाज कल्याण सहायक आयुक्त माया केदार यांनी कळविले आहे.  महात्मा बसवेश्वर सामाजिक समात-शिवा पुरस्कारासाठी पात्रता व नियमावली दि. 8 मार्च 2019 रोजीच्या शासन निर्णयासह महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर असून त्याचा सांकेतांक क्रमांक 201903082039003522 असा आहे.  व्यक्ती पुरस्कारासाठी पात्रता या पुरस्कारासाठी पुरुषाचे वय 50 वर्ष अथवा त्यापेक्षा जास्त असावे. व स्त्रियांचे वय 40 वर

कुंड सर्जापूर रस्त्याच्या बांधकामामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद पर्यायी रस्ता वापरण्याचे आवाहन

 कुंड सर्जापूर रस्त्याच्या बांधकामामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद                                                पर्यायी रस्ता वापरण्याचे आवाहन अमरावती दि 24: अमरावती शहरातील कुंड सर्जापूर रस्त्याच्या तवक्कल किराणापासून लालखडी चौकापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण व नालीचे बांधकाम सुरू आहे. यामुळे कुंड सर्जापूर रस्त्याच्या तवक्कल किराणापासून लालखडी चौकापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण व नाली बांधकामासाठी हा रस्ता दिनांक 18 मार्च 2023 पर्यंत वाहतुकीस बंद करण्यात येत आहे. यासाठी नागरिकांनी वाहतुकीसाठी पर्यायी खुल्या मार्गाचा वापर करून सहकार्य करण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता यांनी केले आहे.

ऑनलाईन सात-बारासारख्या सुविधा केवळ एका क्लिकवर

Image
  ऑनलाईन सात-बारासारख्या सुविधा केवळ एका क्लिकवर   या सुविधेचा नागरिकांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन तहसील कार्यालयात सुविधा सुरू   अमरावती, दि. 21 : शेतकरी तसेच नागरिकांना ऑनलाईन सात-बारा तसेच तत्सम सुविधांसाठी आता शासकीय तसेच तलाठी कार्यालयात वेळ खर्च करण्याची गरज नाही. केवळ मशिनच्या एका क्लिकवर ऑनलाईन स्वरुपातला सात-बारा तसेच अन्य सुविधा सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ऑनलाईन सात-बारा प्राप्त होणाऱ्या मशिनचे जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके, उपजिल्हाधिकारी रणजीत भोसले, अतिरिक्त जिल्हा सूचना अधिकारी मनिष फुलझेले, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक प्रफुल्ल मेहेर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी श्रीमती कौर म्हणाल्या, शेतकरी तसेच नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ त्वरित मिळावा तसेच आवश्यक कागदपत्रांसाठी त्यांचा वेळ वाया जाऊ नये, यासाठी अद्ययावत माहिती

सामाजिक न्याय विभागातर्फे 600 विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप

 सामाजिक न्याय विभागातर्फे 600 विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप   अमरावती, दि. 20 : सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाज्योतीतर्फे इतर मागासवर्ग, विमुक्त जाती , भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी पूर्व तयारी व ऑनलाईन प्रशिक्षणासाठी टॅबचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये व यापूर्वी जवळपास 600 विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अंतर्गत स्वायत्त संस्था महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, नागपूर यांच्यामार्फत JEE/NEET/MHT-CET परीक्षा पूर्व प्रशिक्षण अंतर्गत विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले.  कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी  आमदार सुलभाताई खोडके, आमदार प्रताप अडसड, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे, अंकुश मानकर, प्रविण गुल्हाने,  सहायक आयुक्त माया केदार,  विशेष अधिकारी राजेंद्र भेलाऊ आदी मान्यवर उपस्थित होते.  कार्यक्रमाच्या प्रा

शहरात कलम 37 (3) लागू

 शहरात  कलम 37 (3) लागू          अमरावती, दि. 20 :  शहरात शांतता व सुव्यावस्थाी अबाधित राहावी, यासाठी दिनांक 21 फेब्रुवारी ते 7 मार्च 2023 या कालावधीत महाराष्ट्र पोलिस कायद्याचे  कलम 37 (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे.       उद्या (मंगळवार), दि. 21 फेब्रुवारी ते 25 मार्चपर्यंत माध्यमिक व उच्च माध्यमिक 12 वी, 10 वी शालांत प्रमाणपत्र परीक्षा होणार असल्याने असामाजिक तत्त्वांकडून परीक्षा केंद्रावर शांतता भंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच दि.6 मार्च रोजी होळी उत्सव व दि. 7 मार्च रोजी धुलीवंदन उत्सव साजरा करण्यात येत असल्याने कायदा व सुव्यवथेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  तरी वरील बाबी लक्षात घेता जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्थेची परीस्थिती अबाधित राहावी, यासाठी पोलीस आयुक्तालय परिक्षेत्र वगळून अमरावती जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (3) प्रमाणे प्रतिबंधक आदेश दि. 21 फेब्रुवारी ते 7 मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील.          हा आदेश शासकीय, निम शासकीय कर्मचारी, लग्न, नाटक, अत्यंयात्रा, धार्मिक, शासकीय कार्यक्र

राज्य वाङमय पुरस्कार स्पर्धेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

 राज्य वाङमय पुरस्कार स्पर्धेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ         अमरावती, दि. 20 : मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङमयनिर्मितीसाठी 2022 मध्ये प्रकाशित पुस्तकासाठी स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार देण्यात येत आहेत. त्यासाठी अर्ज करण्याची मुदत दि. 2 मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे.           स्पर्धेसाठी दि. 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400025 यांच्या कार्यालयात, तसेच जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामूल्य उपलब्ध होतील. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नवीन संदेश या सदरात स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कार 2022 नियमावली व प्रवेशिका या शीर्षाखाली व ‘व्हाटस् न्यू’या सदरात पुरस्काराच्या शीर्षाखाली, तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशि

उत्कृष्ट निर्यात पुरस्कारासाठी 23 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावे

 उत्कृष्ट निर्यात पुरस्कारासाठी 23 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावे अमरावती, दि. 20: महाराष्ट्र शासनाव्दारे उत्कृष्ट निर्यातदारांना राज्यस्तरीय निर्यात पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात येते. यासाठी निर्यात घटक, व्यापारी, निर्यातदार आणि व्यापार निर्यात संस्था यांनी 23 फेब्रुवारीपर्यंत  अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.  उत्कृष्ट निर्यातदारांना राज्यस्तरीय निर्यात पुरस्कार प्रदान करताना सन 2018-19, सन 2019-20, सन 2020-21 तसेच 2021-22 या आर्थिक वर्षांचे पुरस्कार देण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी संबंधितांनी विहित मर्यादेत अर्ज सादर करावेत. अर्जाचा नमुना व लागणारी कागदपत्रे यांची तपशीलवार माहिती www.maharashtra.gov.in तसेच https://maitri.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  उत्कृष्ट निर्यात पुरस्करांतर्गत इंजिनिअरींग उत्पादने, इलेक्ट्रीकल व ईलेक्टॉनिक्स उत्पादने, मुलभूत रासायनिक उत्पादने, औषधे व सौंदर्य प्रसाधन उत्पादने, केमिकल व अलाईड उत्पादने, प्लास्टिक लिनोलीयम उत्पादने, लेदर उत्पादने, ताज्या भाज्या व फळे, प्रोसेस फुड अॅण्ड ॲग्रो उत्पा

‘आपदा मित्रां’नी समाजाचे मित्र म्हणून काम करावे - निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके

Image
  ‘आपदा मित्रां ’ नी समाजाचे मित्र म्हणून काम करावे - निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके   अमरावती, दि. 17: गावस्तरावर एखादी आपत्ती उद्भवल्यास त्या ठिकाणी मदत व जलद प्रतिसादाकरिता कार्य करण्यासाठी तसेच समुदायाला आपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन व सहकार्य करण्यासाठी आपदा मित्र यांचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. आपदा मित्रांनी आपत्ती काळात समाजाचे मित्र म्हणून काम करावे, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके यांनी आज येथे केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागात आयोजित आपदा मित्र कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रम प्रसंगी श्री. घोडके बोलत होते. विद्यापीठात 50 आपदा मित्रांच्या तिस-या बॅचच्या समारोप प्रसंगी सहायक जिल्हा सूचना अधिकारी मनीष फुलझेले, आपत्ती समन्वयक अमरजीत चौरपगार , आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यावेळी उपस्थित होते. आपदा मित्रांची आपत्तीमधील भूमिका याबाबत मार्गदर्शन करताना श्री. घोडके म्हणाले, कोणतीही आपत्ती आल्यास सर्वप्रथम आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. आपत्ती काळात जीवित व आर्थिक टाळण्यासाठी स्थानिकांची मदत घेणे, राष्ट्

उत्पादन तंत्रज्ञान व बाजार संमेलनात मूल्यसाखळीबाबत चर्चा

  उत्पादन तंत्रज्ञान व बाजार संमेलनात मूल्यसाखळीबाबत चर्चा   अमरावती, दि. १६ : मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत विभागीय अंमलबजावणी कक्षातर्फे विभागीय उत्पादन तंत्रज्ञान व बाजार संमेलन (टेक मार्केट मीट) नुकतेच येथे झाले. त्यात मूल्यसाखळीबाबत चर्चा करण्यात आली.            मूल्यसाखळी, तिच्या विकासाच्या शक्यता व आवश्यकता याबाबत कार्यशाळेत सादरीकरण करण्यात आले. सोयाबीन पिकाच्या मूल्यसाखळीबाबत गटचर्चा होऊन खरेदीदार, निर्यातदारांच्या अडचणी व अपेक्षांवर विचारमंथन करण्यात आले.    विभागीय कृषी सहसंचालक अध्यक्षस्थानी किसन मुळे अध्यक्षस्थानी होते. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी   अनिल खर्चान, दुर्गापूरच्या कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ पी. एस. जायले, नोडल अधिकारी    राहुल सातपुते आदी उपस्थित होते.              प्रथम सत्रात स्मार्ट प्रकल्प व मूल्य साखळीच्या अनुषंगाने सादरीकरण राहूल ठाकरे यांनी केले. प्रशांत गिरी यांनी निंजा मार्केटिंग ॲपबाबत माहिती दिली. डॉ. किशोर दुबे यांनी पतंजली समूहाच्या फळ प्रक्रियेसंदर्भात माहिती दिली. नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारीला 63 रिक्तपदांवर होणार भरती

  युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह ’ येत्या 21 फेब्रुवारीला 63 रिक्तपदांवर होणार भरती               अमरावती, दि. 16 : अमरावती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दर महिन्याच्या, तिसऱ्या मंगळवारी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मोहिमे ’ चे आयोजन करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत पहिली ‘प्लेसमेंट ड्राईव्ह ’ येत्या 21 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे. स्थानिक तसेच अन्य जिल्ह्यातील नामवंत खाजगी कंपन्या, कारखाने आणि उद्योग समूहामध्ये काम करण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.           जिल्हयातील युवक-युवतींना नोकरीच्या संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार मेळाव्यामधून नोकरी देण्याचा प्रयत्न जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे करण्यात येतो. त्याचाच पुढील टप्पा म्हणून आता प्रत्येक महिन्याच्या तिस-या मंगळवारी "जागेवरच निवड" (On Spot Selection) मोहीम आयोजित करण्यात येणार आहे

बाल सुरक्षा अभियानात जिल्ह्यात होणार 4 लाख बालकांची आरोग्य तपासणी - जिल्हाधिकारी पवनीत कौर

Image
  बाल सुरक्षा अभियानात जिल्ह्यात होणार 4 लाख बालकांची आरोग्य तपासणी - जिल्हाधिकारी पवनीत कौर   अमरावती, दि. 15 : सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे बाल सुरक्षा अभियान अर्थात जागरूक पालक-सुदृढ बालक मोहिमेत जिल्ह्यातील 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालके, तसेच किशोरवयीन मुलामुलींची सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. विविध विभागांच्या समन्वयाने ही मोहिम यशस्वी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे दिले.  बाल सुरक्षा अभियान, नियामक रुग्ण कल्याण समिती, एड्स नियंत्रण समिती व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंधक समिती आदी विविध विषयांवरील बैठका आज महसूलभवनात जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या, त्यावेळी त्या बोलत होत्या. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती कौर म्हणाल्या की, अभियानात जिल्ह्यातील ४ लक्ष २ हजार ९५८ बालके, किशोरवयीन मुलांची प्राथमिक आरोग्य तपासणी, आजारी आढळल्यास उपचार, गरजूंना संदर्भ सेवा देऊन उपचार, प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा पुरविणे व सुरक्षित सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करण्यात येईल.

स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांर्तगत ‘मॅरेथॉन स्पर्धा’ संपन्न

  स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांर्तगत ‘ मॅरेथॉन स्पर्धा ’ संपन्न         अमरावती, दि. 14: कुष्ठरोगाविषयी जनजागृती होण्यासाठी ‘स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान ’ संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत कुष्ठरोगाविषयी जनजागृती होण्यासाठी विविध कार्यक्रम तसेच कुष्ठरुग्णांबाबत समाजात असलेली भिती व गैरसमज दूर होण्यास मदत मिळावी, यासाठी सहाय्यक संचालक (कुष्ठरोग), आय. एम. ए. व आर.डी. आय. के. आणि के. डी. महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य जनजागृती मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी मॅरेथॉनला हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन केले.       मॅरेथॉन उद्घाटन प्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव श्री. पाटील, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. अकुंश सिरसाट, पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. देशमुख, आय. एम. ए. चे अध्यक्ष डॉ. राठी, डॉ. देशमुख, डॉ. मुरके, आर. डी. आय. के. तसेच के. डी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देशमुख आदी मान्यवर यावेळी   उपस्थित होते.       कार्यक्रमाच्या प्रारंभी नूतन कन्या शाळेच्या स्काऊट गाईडच्या विद्

भित्तीचित्रकला व व्हिडीओ मेकिंग स्पर्धेचे बक्षीसवितरण मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा - विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

Image
  भित्तीचित्रकला व व्हिडीओ मेकिंग स्पर्धेचे बक्षीसवितरण मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा -        विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे अमरावती, दि. १३ : लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचे कर्तव्य पार पाडणे आवश्यक असते. मतदानाविषयीची उदासीनता दूर करून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे केले. राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे आयोजित भित्तीचित्रकला व व्हिडीओ मेकिंग स्पर्धेचा बक्षीसवितरण कार्यक्रम बचतभवनात झाला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी पवनीत कौर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके, उपजिल्हाधिकारी रणजीत भोसले, तहसीलदार संतोष काकडे, नायब तहसीलदार श्याम देशमुख आदी उपस्थित होते. लोकशाहीने आपल्याला दिलेला मतदानाचा अधिकार अनेकांकडून बजावला जात नाही. जागरूक नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडण्यासाठी मतदानाविषयी उदासीन राहून चालणार नाही. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे, असे आवाहन विभागीय