Posts

Showing posts from November, 2017
Image
एड्सग्रस्तांचे प्रमाण कमी करण्यात आरोग्य यंत्रणेला यश बाधित मातांची अपत्ये संक्रमणापासून सुरक्षित            अमरावती, दि. 30 : तपासणी, योग्य उपचार व स्वयंसेवी संस्थांचे भक्कम सहकार्य यामुळे एचआयव्हीबाधित रुग्णांचे प्रमाण कमी करण्यात जिल्हा आरोग्य यंत्रणेला यश मिळाले आहे. सतत देखरेख व उपचार यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या बाधित 109 गर्भवती मातांची अपत्ये संक्रमणापासून सुरक्षित राहू शकली.     ‘राईट टू हेल्थ’ असे ब्रीद घेऊन एड्स नियंत्रण कार्यक्रम अधिक जोरकसपणे राबवला जात आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी पत्रकारांना दिली. ते म्हणाले की, 2014-15 मध्ये तपासणी केलेल्या 83,501 रुग्णांपैकी 442, 2015-16 मध्ये 1 लाख 10 हजार 686 पैकी 390, 2016- 17 मध्ये 1, 14, 682 पैकी 381 रुग्ण बाधित असल्याचे आढळले. एप्रिल 2017 पासून आतापर्यंत तपासणी केलेल्या 68 हजार 912 रुग्णांपैकी 241 रुग्ण बाधित असल्याचे आढळले. जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, सर्व उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, 39 खासगी दवाखाने व 5 रक्तपे
Image
जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेचे वाचन अमरावती, दि. 27: जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांच्या उपस्थितीत संविधान दिवसा निमित्त संविधानातील उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. प्रारंभी जिल्हाधिकारी श्री.बांगर यांनी संविधान दिनाची माहिती दिली त्यानंतर संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपजिल्हाधिकारी रामदास सिध्दभट्टी, उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिचे, उपविभागीय अधिकारी मोर्शी उपविभागीय अधिकारी मनोहर कडू, व अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते. 00000
Image
मुदत संपणा-या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर अमरावती दि.22 : जिल्ह्यातील जानेवारी- फेब्रुवारी 2018 मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या  निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. तसे पत्र  उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी तहसीलदारांना पाठवले आहे.             जिल्ह्यातील चांदूर रेल्वे, मोर्शी, अंजनगाव सुर्जी, अचलपूर व धारणी या तालुक्यातील एकूण 13 ग्रामपंचायतीचा या निवडणुकीत समावेश आहे.             निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे : तहसीलदार 24 नोव्हेंबरला निवडणूक नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा कालावधी 5 ते 11 डिसेंबर 2017 असा आहे. नामनिर्देशनपत्रांची छाननी 12 डिसेंबरला होईल. नामनिर्देशन 14 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत मागे घेता येईल. त्यानंतर याचदिवशी दुपारी तीननंतर उमेदवारांची यादी व चिन्हे जाहीर करण्यात येतील.  आवश्यक असल्यास 26 डिसेंबरला मतदान होईल. 27 डिसेंबरला मतमोजणी होईल. निवडणुकीचा निकाल 28 ते 30 डिसेंबरदरम्यान जाहीर होईल. 00000
Image
शहरातील विकासकामांबाबत मंत्रालयात आढावा  कामांना गती देण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश बेलोरा विमानतळा करीता 15 कोटी अमरावती राज्यात अव्वल ठरेल -    पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील अमरावती, दि. 22 : शहराची भविष्यातील लोकसंख्या व वाढीच्या शक्यता लक्षात घेऊन शासनाने विविध विकासकामांचे नियोजन केले आहे. विमानतळ, रस्तेविकास, भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठी योजना, विविध स्थळांचे सौंदर्यीकरण यामुळे अमरावती शहर व जिल्हा राज्यात अव्वल ठरेल, असे प्रतिपादन उद्योग राज्यमंत्री तथा पालकमंत्री पोटे- पाटील यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत केले.    श्री. पोटे- पाटील यांनी अमरावती शहर व जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणा-या विविध विकासकामांचा आढावा मंत्रालयात    घेतला. मुख्यमंत्र्यांचे        अपर मुख्य सचिव    प्रवीणसिंह परदेशी, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, अमरावती मनपा आयुक्त हेमंतकुमार पवार, मनपा स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बेलोरा विमानतळा करीता 15 कोटी    यावर्षी मिळणार असून, 60 कोटी रुपये पुढील आर्थिक वर्षात ‍मिळणार आहेत.    या निधी
Image
‘ग्रंथोत्सव  2017 ’परिवर्तनाला अनुकूल    समाजमन   तयार करण्याचे कार्य कवितेतून -          ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके अमरावती, दि.  20  : चांगले विचार पोहोचवत राहणे आणि    परिवर्तनाला अनुकूल समाजमन तयार करण्याचे काम कविता करत असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा अ. भा. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनी येथे केले. जिल्हा ग्रंथालय कार्यालय, शिक्षण विभाग व जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ग्रंथोत्सव 2017’मध्ये आज श्री. डहाके यांची मुलाखत डॉ. रमेश अंधारे यांनी घेतली. त्यावेळी ते बोलत होते. श्री. डहाके यांनी कविता, समीक्षा, दृश्यकला व कलांविषयी मनमोकळेपणे उत्तरे दिली.    या मुलाखतीला शहर व जिल्ह्यातून वाचक-रसिक, विद्यार्थी व अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.              श्री. डहाके म्हणाले की, कुठलीही क्रांती ताबडतोब होत नाही. कविता चांगले विचार सतत मांडून बदलाला अनुकुल अशी मनोभूमी तयार करत असते. कवीच्या म्हणण्याखेरीज इतरही अनेक कलांतून हे विचार पोहोचत असतात. कार्ल मार्क्सचा ‘दास कॅपिटल’ हे परिवर्तनाला चालना देणा-या पुस्त
Image
जलयुक्त शिवार योजना राज्यासाठी वरदान योजना अधिक व्यापक करण्यासाठी लोकसहभाग वाढवावा -जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे अमरावती, दि. 9 :     दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी   जलयुक्त शिवार अभियान वरदान ठरले आहे. यंदा अपु-या पर्जन्यमानाची झळ कमी करण्यात योजनेतील कामे महत्वपूर्ण ठरली. हे अभियान यापुढेही अधिक व्यापकपणे राबविण्यासाठी व लोकसहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज येथे दिले. चांदूर रेल्वे तालुक्यातील धानोरा (म्हाली), रांजणा व नेकनामपूर या गावांत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या बंधारे आदी कामांचे जलपूजन श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. उपजिल्हाधिकारी (रोहयो) डी. आर. काळे, उपविभागीय अधिकारी वनश्री लाभसेटवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, प्रताप अडसड, धानो-याच्या सरपंच भारती नरसेकर, चंद्रमणी गजभिये यांच्यासह अनेक अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते.   श्री. शिंदे म्हणाले की,   जलयुक्त शिवार योजनेमुळे शे तकऱ्यांना शाश्वत पाणी मिळण्यास मदत होत असून, कृषी उत्पादकतेत भर पडली आहे. हे अभ
Image
पालकमंत्र्यांकडून विविध विभागांच्या कामाचा आढावा प्रलंबित कामांबद्दल जबाबदार अधिका-यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस काढा     पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील अमरावती, दि. 4 : शेतक-यांच्या हितासाठी शासनाने घेतलेल्या चांगल्या निर्णयांची अंमलबजावणी न करणा-या अधिकारी- कर्मचा-यांना कठोर कारवाई करण्यात येईल. सोयाबीनचे यापूर्वी जाहीर केलेले 200 रुपये अनुदान अद्याप मिळत नसल्याबाबत तक्रारी येत आहेत. या अनुदानवाटपाची कार्यवाही तत्काळ करावी व विलंबासाठी जबाबदार व्यक्तींना ‘कारणे दाखवा’ नोटीस काढावी, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी आज येथे दिले. सोयाबीन, उदीड, मूग आदी पीक अनुदान, खरेदी व इतर विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी बैठक पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी अनिल खर्चान यांच्यासह अनेक अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.         श्री. प्रवीण पोटे- पाटील म्हणाले की, सोयाबीन, मूग, उडीद पीक खरेदीची प्रक्रिया
ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून अमरावतीत अवयवदान शक्य अमरावती, दि. 05 :  येथील ब्रेन डेड म्हणून घोषित झालेल्या एका व्यक्तीचे अवयवदान करण्याचा त्याच्या कुटुंबीयांनी केलेला संकल्प आज ‘ग्रीन कॉरिडॉर’च्या माध्यमातून पूर्ण होऊ शकला.            हमालपुरा येथील रहिवाशी मनोज गुप्ता यांना प्रारंभी जिल्हा सामान्य रुग्णालयात व तद्नंतर डॉ. अविनाश चौधरी यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.   तथापि, ते ब्रेन डेड झाल्याने डॉ. चौधरी यांनी  गुप्ता यांच्या परिवाराला अवयवदान प्रक्रियेविषयी माहिती दिली. सामाजिक भान जोपासत गुप्ता कुटुंबियांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यामुळे स्व. गुप्ता यांची किडनी, यकृत व डोळे हे अवयव गरजू रुग्णांना मिळू शकतील.        ब्रेनडेड अवस्थेतील मनोज गुप्ता यांचे यकृत व मूत्रपिंड बुधवारी  एअर अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे मुंबईला पाठविण्यात आले व नेत्रपटल सुरक्षित ठेवण्यात आले आहे. मुंबई व नागपूर येथील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार  ही शस्त्रक्रिया पार पडली.   अवयव मुंबईला पाठविण्यासाठी खापर्डे बगिचा येथील चौधरी रुग्णालयापासून ते विमानतळापर्यंत ‘ग्रीन कॉरिडॉर’ करण्यात आला.  शस्त्रक्रिय