शहरातील विकासकामांबाबत मंत्रालयात आढावा 
कामांना गती देण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

बेलोरा विमानतळा करीता 15 कोटी

अमरावती राज्यात अव्वल ठरेल -  पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील

अमरावती, दि. 22 : शहराची भविष्यातील लोकसंख्या व वाढीच्या शक्यता लक्षात घेऊन शासनाने विविध विकासकामांचे नियोजन केले आहे. विमानतळ, रस्तेविकास, भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठी योजना, विविध स्थळांचे सौंदर्यीकरण यामुळे अमरावती शहर व जिल्हा राज्यात अव्वल ठरेल, असे प्रतिपादन उद्योग राज्यमंत्री तथा पालकमंत्री पोटे- पाटील यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत केले.  
श्री. पोटे- पाटील यांनी अमरावती शहर व जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणा-या विविध विकासकामांचा आढावा मंत्रालयात  घेतला. मुख्यमंत्र्यांचे    अपर मुख्य सचिव  प्रवीणसिंह परदेशी, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, अमरावती मनपा आयुक्त हेमंतकुमार पवार, मनपा स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बेलोरा विमानतळा करीता 15 कोटी  यावर्षी मिळणार असून, 60 कोटी रुपये पुढील आर्थिक वर्षात ‍मिळणार आहेत.  या निधीचा प्रस्ताव  मंत्रीमंडळाच्या बैठकीत लवकरच  मांडणार असल्याचे अपर मुख्यसचिव प्रविणसिंह परदेशी यांनी बैठकीत सांगीतले. 
पूरग्रस्तांचे पुर्नवसन होण्याकरीता तात्काळ ब्लू ‍ लाईन  हटविण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश  पुनर्वसन विभागाला देण्यात आले.प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत 3561 घरांच्या सुधारित आराखड्याला मान्यता देण्याचे  निर्देश नगरविकास विभागाला यावेळी देण्यात आले. .जिल्हयातील 9 नगरपालिका व 1 नगरपंचायतला  प्रत्येकी 1 ते 1.50 कोटींचा निधी देण्यासाठी लवकरच नगरविकास सचीव यांची बैठक  आयोजीत करण्यात आली  आहे, तसेच  ब्रिटीशकालीन उडडाण पुलांचे सर्वेक्षण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम  सचिवांना    निर्देश देण्यात आले.

    अमरावतीतील बेलोरा विमानतळ, दादासाहेब गवई स्मारक, स्मार्ट सिटी प्रकल्प, नगरोत्थान योजना, अमृत योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शिवटेकडी व भीमटेकडी सौंदर्यीकरण, राजापेठ उड्डाण पूल, अकोली रिंग रोड, शहरातील रस्त्यांचा विकास, छत्री व वडाळी तलाव विकास  आणि जिल्ह्यातील उद्योग आदी विविध विषयांवर आढावा बैठकीत सांगोपांग चर्चा झाली. सर्व कामांचा तात्काळ  निकाली काढण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांचे सचिव  प्रवीणसिंह परदेशी यांनी  दिले.

या कामांमुळे अमरावती शहर व जिल्ह्याच्या विकासाला दिशा मिळणार आहे, पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.  
गृहनिर्माण विभागाचे उपसचिव रा. कों. धनावडे, नगरपरिषद प्रशासनाचे उपसंचालक डी. पी. मोरे, सहसचिव पां. जो. जाधव, उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीना, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुहास मेत्रे, एमएडीसीचे उपाध्यक्ष सुरेश काकाणी, शहर अभियंता जीवन सदार आदी उपस्थित होते.  

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती