Posts

Showing posts from October, 2016
Image
जिंकलेल्यांचे अभिनंदन व पराजितांनी जास्त परिश्रम घेवून यश मिळवा पोलिस अधिक्षक लखमी गौतम * राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न           अमरावती, दि.27 (जिमाका): स्पर्धेमध्ये जय आणि पराजय हे सुरुच असते. विजयी संघांचे अभिनंदन तसचे स्पर्धेत अयशस्वी ठरलेल्या संघांनी खचुन न जात येणाऱ्या स्पर्धांमध्ये अधिक परिश्रम घेवून यश संपादन करावे असे प्रतिपादन पोलिस अधिक्षक लखमी गौतम यांनी केले.           येथील विभागीय क्रीडा संकुल येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेच्या पुरस्कार वितरण समारोह प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा क्रीडा व युवक संचालनालयाच्या उपसंचालक प्रतिभा देशमुख, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष जयंत देशमुख, पंजबाराव देशमुख बँकचे अध्यक्ष संजय वानखडे, युबीए बास्केटबॉलचे संचालक विवेक मेहता, बास्केटबॉल संघटनेचे सहसच
राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील दि.26 व 27 सप्टेंबर रोजी  अमरावती जिल्हा दौऱ्यावर           अमरावती, दि.26 (जिमाका): गृह (शहरे), नगरविकास, सामान्य प्रशासन, नगरविकास, बंदरे, विधी व न्याय, संसदिय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील दि.26 व 27 सप्टेंबर, 16 रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत असुन दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.           दि.26 सप्टेंबर, 16 रोजी सोयीनुसार बुलडाणा येथून मोटारीने अमरावती कडे प्रयाण. अमरावती येथे आगमन व शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे मुक्काम. दि. 27 सप्टेंबर 16 रोजी दिवसभर अमरावती येथील विविध स्थानिक कार्यक्रमांस उपस्थिती. सायं 7.05 वा. अमरावती येथून अमरावती एक्सप्रेसने मुंबई कडे प्रयाण. 00000 वृत्त क्र.988                                                                         दिनांक 26-09-2016 राज्यमंत्री दादाजी भुसे दि.28 सप्टेंबर रोजी  अमरावती जिल्हा दौऱ्यावर           अमरावती, दि.26 (जिमाका): ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे दि.28 सप्टेंबर, 16 रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत असुन दौरा कार
43 शासकीय ग्रंथालयांना ई-सेवेत रुपांतर करणार ग्रंथालय संचालक किरण धांडोरे             अमरावती, दि.26 (जिमाका): ग्रंथालय संचालक, म.रा. मुंबई यांच्या वतीने येणाऱ्या काळात 18 कोटी निधी खर्च करुन 43 शासकीय ग्रंथालयांना ई-सेवा मध्ये रुपांतरीत करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात अ वर्ग तसेच ब वर्ग वाचनालय ई-सेवेशी जोडले जातील. हा उपक्रम पुढील 6 वर्षात पुर्ण केला जाईल,असे प्रतिपादन म.रा. मुंबई चे ग्रंथालय संचालक किरण धांडोरे यांनी केले. राजा राम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान व ग्रंथालय संचालनालय (म.रा.), जिल्हा ग्रंथालय अधिकारी, अमरावती कार्यालयाच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमांचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले. अध्यक्ष स्थानी ग्रंथालय संचालक किरण धांडोरे, विशेष अतिथी म्हणुन मनपा आयुक्त हेमंतकुमार पवार, अप्पर कोषागार अधिकारी ग. म. चौधरी, सहायक क्षेत्रीय अधिकारी दिपांजन चॅटर्जी, डॉ. महेंद्र मेटे, ग्रंथालयाचे कार्यवाह राम देशपांडे, सहायक ग्रंथालय संचालिका मिनाक्षी कांबळे, शासकीय विभागीय ग्रंथपाल राजेश पाटील तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत कर्जासाठी संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन           अमरावती, दि.26 (जिमाका): पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेंतर्गत सन 2016-17 या आर्थिक वर्षाकरीता अनुसुचित जाती/जमाती प्रवर्गातील ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जासाठी कार्यबल समितीची बैठक दि. 30 सप्टेंबर 2016 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. सदर योजनेतंर्गत उद्योग करीता रु. 25 लाख व सेवा उद्योगाकरीता रु. 10 लाखापर्यत पात्र व सक्षम प्रकल्पांना बँकामार्फत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत असुन शासनाकडुन प्रवर्ग निहाय 35 टक्के पर्यत अनुदान देण्यात येते.           सदर योजनेतंर्गत अर्ज करण्यास इच्छुक सुशिक्षीत बेरोजगार युवक/युवतींनी www.kviconline.gov.in या संकेत स्थळावर लॉगऑन करुन PMEGP ePortal वर Online अर्ज सादर करावे, असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, यांनी केले आहे. 00000 वृत्त क्र.985                                                                            दिनांक 26-09-2016 धामणगांव रेल्वे येथे दि.22 ते 29 सप्टेंबर पर्यत सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यत जड वा
Image
राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल क्रीडास्पर्धेचे पालकमंत्री पोटे यांच्याहस्ते उद्घाटन           अमरावती, दि.25 (जिमाका): अमरावती येथील विभागीय क्रीडा संकुल येथे 28 सप्टेंबर 2016 पर्यंत घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल क्रीडास्पर्धा-2016-17 चे थाटात उद्घाटन पालकमंत्री प्रविण पोटे यांच्या हस्ते झाले. यावेळी ना.पोटे यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.           क्रीडा व युवकसेवा, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी, राज्य बास्केटबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेस  आ.डॉ.सुनिल देशमुख, आ.डॉ.अनिल बोंडे, जिल्हाधिकारी किरण गिते, शिवछत्रपती पुरस्कार विजेते मुकुंद धस, शत्रुघ्न भोसले, चांदुरकर आदि उपस्थित होते.           या स्पर्धा 28 सप्टेंबर, 16 चालणार असून राज्यातील नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, मुंबई, नाशिक, कोल्हापूर व पुणे या 8 विभागातील 14,17,19 वर्षे वयोगटातील मुलामुलींचे 48 संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येक संघात 12 खेळाडू असून सुमारे 1 हजार बास्केट बॉलपटू उपस्थित होते. अशी माहिती क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशम
Image
पालकमंत्री प्रविण पोटे यांच्या हस्ते रस्ते भूमिपूजन कामाचा शुभारंभ              अमरावती, दि.25 (जिमाका): येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने 373.51 लक्ष रुपये अंदाजित खर्चाच्या अमरावती-कठोरा-नांदुरा-शिराळा-चांदुरबाजार या 27 किलोमीटर रस्त्यांचे रुंदीकरणासह सुधारणा बांधकामाचे कठोरा, नांदुरा गावाजवळ पालकमंत्री प्रविण पोटे यांनी फलकाचे अनावरण करुन भूमिपूजन केले.           आ.यशोमती ठाकूर, कार्यकारी अभियंता जाधव कठोरा व नांदुराचे ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. 00000
Image
पालकमंत्री प्रविण पोटे यांची छायाचित्र प्रदर्शनीस भेट सुप्त गुणांना वाव देण्यासाठी स्पर्धा आवश्यक            अमरावती, दि.25 (जिमाका): येथील  अंबानगरी फोटा-व्हिडीओग्राफर्स असोशिएशन, अमरावती प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने महापालिकेच्या श्रीसंत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मधील आर्ट गॅलरी येथे दिनांक 26 सप्टेंबर 2016 पर्यंत आयोजित राज्यस्तरीय भव्य छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनीस पालकमंत्री प्रविण पोटे यांनी भेट देऊन छायाचित्रांची पाहणी केली.           यावेळी सर्वश्री राजेश वाडेकर, राहुल आंबेकर, रुपेश फासाटे, निलेश चौधरी, मनिष जगताप आदि सदस्य उपस्थित होते.           या प्रदर्शनात राज्यभरातील निसर्गवेड्या छायाचित्रकारांनी अप्रतिम छायाचित्र काढून यात सहभागी झाले होते. या छायाचित्र प्रदर्शनीतून राज्यातील तसेच मेळघाटातील पक्षी व निसर्गसंपदा पहावयास मिळते. पक्षीवैभव हे समृद्ध वनसंपदेचे लक्षण असून अमरावती जिल्ह्यातील विविध प्रकारच्या दुर्मिळ पक्ष्यांची छायाचित्रे छायाचित्रकारांनी टिपले असून ती सर्वांना उद्यापर्यंत पहावयास मिळणार आहे. या प्रदर्शनास आतापर्यंत 30 हजा
Image
माहेश्वरी महिला मंडळांचा स्तुत्य उपक्रम शहिद पंजाब उईके यांना श्रद्धांजली म्हणून रक्तदान महायज्ञ पालकमंत्री-प्रविण पोटे           अमरावती, दि.25 (जिमाका): जम्मू कश्मीर भागातील उरी येथे अतिरेक्यांकडून झालेल्या हल्ल्यात शहिद झालेला  अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील भूमीपूत्र पंजाब उर्फ विकास जानराव उईके यांना श्रद्धांजली म्हणून येथील माहेश्वरी महिला मंडळाने रक्तदान महायज्ञ हा स्तुत्य उपक्रम सुरु करुन राज्यभरात चांगला पायंडा पाडला आहे असे प्रतिपादन पालकमंत्री प्रविण पोटे यांनी केले. येथील माहेश्वरी भवन मध्ये आयोजित रक्तदान महायज्ञ शिबीराचे उद्घाटन ना. पोटे यांच्याहस्ते झाले यावेळी ते बोलत होते. आमदार श्रीकांत देशपांडे, शहिद पंजाब उईके यांच्या मातोश्री बेबीताई, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, माहेश्वरी पंचायतचे अध्यक्ष सुभाष राठी, रक्तदान महायज्ञ समितीचे प्रमुख महेंद्र भुतडा, सुरेश साबु, पुष्पलता, प्रभा झंवर व माहेश्वरी समाजातील मान्यवर उपस्थित होते. ना.पोटे यांनी यावेळी शहिद पंजाब यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली. ते म्हणाले की, माहेशवरी महिला मंडळ
केबल जोडण्या संदर्भात विनाक्रम (रॅण्डम) सर्वेक्षण सोडत दि.1 ऑक्टोबर रोजी           अमरावती, दि.23 (जिमाका): दि.25 मार्च 2015 रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्यात केबल जोडण्यांचे संदर्भात विनाक्रम (रॅण्डम) सर्वेक्षण करण्याकरीता प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी सोडत काढून प्रत्येक जिल्ह्यातुन तीन केबल ऑपरेटर व एक बहूविध यंत्रणा परीचालक (एमएसओ) यांची केबल जोडण्यांचे सर्वेक्षणाकरीता निवड करावयाची आहे. याकरीता सोडत क्र. 17 दि.1 ऑक्टोबर 16 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती येथे दुपारी 12.30 वा. सभागृह क्र. 1 मध्ये काढण्यात येणार आहे. या सोडतीकरीता अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा व वाशिम या जिल्ह्यातील सर्व केबल ऑपरेटर व बहूविध यंत्रणा परीचालक (एमएसओ) यांनी उपरोक्त ठिकाणी वेळेवर हजर राहण्याचे आवाहन विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. 00000
राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील दि.26 व 27 सप्टेंबर रोजी  अमरावती जिल्हा दौऱ्यावर           अमरावती, दि.26 (जिमाका): गृह (शहरे), नगरविकास, सामान्य प्रशासन, नगरविकास, बंदरे, विधी व न्याय, संसदिय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील दि.26 व 27 सप्टेंबर, 16 रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत असुन दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.           दि.26 सप्टेंबर, 16 रोजी सोयीनुसार बुलडाणा येथून मोटारीने अमरावती कडे प्रयाण. अमरावती येथे आगमन व शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे मुक्काम. दि. 27 सप्टेंबर 16 रोजी दिवसभर अमरावती येथील विविध स्थानिक कार्यक्रमांस उपस्थिती. सायं 7.05 वा. अमरावती येथून अमरावती एक्सप्रेसने मुंबई कडे प्रयाण. 00000
21 वर्षाची सोनु विनायकराव कावलकर बेपत्ता           अमरावती, दि.23 (जिमाका): पोलिस आयुक्तालय अमरावती, शहर पोलिस ठाणे फ्रेजरपुरा हद्दीतील कु. सोनु विनायकराव कावलकर ही राहणार पिंपरी निपानी ता. नांदगांव खंडेश्वर, जि.अमरावती (हल्ली मुक्काम-तांत्रीक कॉलनी, अमरावती) दि.19 ऑगस्ट, 16 पासुन बेपत्ता आहे. फिर्यादी बेपत्ता मुलीचे पिता विनायक मो. कावलकर यांनी दिलेल्या माहिती नुसार सोनू ही नेहमी प्रमाणे घराला कुलुप लावुन युवा शक्ती कॉलेज येथे सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यत गेली होती. फिर्यादी हे गावावरुन परत आल्यावर त्यांना घरी कुलुप लागलेले दिसले. त्यांनी आपल्या मुलीची वाट पाहिली, परंतु ती घरी परत आली नाही. तिचा आजुबाजुला व नातेवाईकांकडे शोध घेतला, तरीपण ती मिळुन आली नाही. पोलिस ठाणे फ्रेजरपुरा येथे दि.19 ऑगस्ट, 16 रोजी मिसींग रजिस्टर क्र. 92/2016 प्रमाणे बेपत्ता असल्याची नोंद घेण्यात आली आहे. अद्यापर्यंत तिचा शोध लागला नाही, असे सहा.पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा, अमरावती शहर यांनी कळविले आहे.           बेपत्ता कु. सोनु विनायकराव कावलकर ही 21 वर्षाची असुन तिची उंची 5 फुट 2 इंच आहे. तिचा रंग सावळा,
ग्रंथालयाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी दि.25 सप्टेंबरला कार्यशाळा *जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या हस्ते उद्घाटन *राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता           अमरावती, दि.23 (जिमाका): राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता अंतर्गत अनुदान योजनेतुन ग्रंथालयासाठी राबविण्यात येणाऱ्या व असमान अर्थसाह्याच्या विविध योजनांच्या व ग्रंथालय संचालनालयाकडुन राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्याच्या उद्देशाने रविवार, दि.25 सप्टेंबर 16 रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. राजकमल चौक येथील मनपा टाऊन हॉल येथे होणाऱ्या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या हस्ते सकाळी 11 वा. करण्यात येईल. राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय अमरावतीच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे ग्रंथालय संचालक किरण धांडोरे, विशेष अतिथी म्हणुन मनपा आयुक्त हेमंतकुमार पवार, अप्पर कोषागार अधिकारी कि. ग. चौधरी, राजा राममोहन रॉय ग्रंथालय कोलकाताचे पश्चिम विभागाचे सह
राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील दि.21 सप्टेंबर रोजी  अमरावती जिल्हा दौऱ्यावर           अमरावती, दि.21(जिमाका): गृह (शहरे), नगरविकास, सामान्य प्रशासन, नगरविकास, बंदरे, विधी व न्याय, संसदिय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील दि.21 सप्टेंबर, 16 रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत असुन दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.           दि.21 सप्टेंबर, 16 रोजी दिवसभर अमरावती येथील विविध स्थानीक कार्यक्रमास उपस्थिती. सोयीनुसार अमरावती येथुन मोटारीने अकोला कडे प्रयाण.   00000
अमरावती जिल्ह्यातील रेती स्थळांचे ई-निविदा-ई-लिलाव (पहिला टप्पा-पहिली फेरी)             अमरावती, दि.21 (जिमाका): सन 2016-17 (30 सप्टेंबर 2017 अखेर पर्यत) वर्षाकरीता अमरावती जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील 10 तालुक्यामधील 54 रेती स्थळांचे लिलाव प्रक्रिया ई-निविदा-ई-लिलाव (पहिला टप्पा-पहिली फेरी) ऑनलाईन प्रणाली द्वारे दि.20 सप्टेंबर 2016 पासुन सुरु होत आहे. ई-निविदा बाबतचा संपूर्ण तपशील हा https://eauctioncollamr.abcprocure.com तसेच ई-लिलाव बाबतचा संपूर्ण तपशील https://www.eauctioncollamr.abcprocure.com या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. रेतीघाटा संबंधीची विस्तृत माहिती उपरोक्त वेबसाईटवर तसेच सर्व संबंधित कार्यालयात तसेच amravati.nic.in वेबसाईट वर उपलब्ध राहील. ई-निविदा-ई-लिलाव मध्ये भाग घेण्यापूर्वी सदर प्रक्रियेत भाग घेणाऱ्यांन नव्याने नोंदणी करणे तसेच डिजीटल सर्टीफिकेट काढणे आवश्यक आहे. ई-निविदाधारक तसेच लिलावधारकाकडे पॅन कार्ड, व्हॅट रजिस्ट्रेशन (टीन कार्ड) असणे आवश्यक आहे. त्याशिवाय त्यांना रेती ई-निविदा प्रक्रियेत भाग घेता येणार नाही. रेती लिलावच्या ई-निविदा-ई-लिलाव